Posts

Showing posts with the label Sakal
Image
 पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुका     उद्या रविवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुका आहेत.  निवडणुका होणार आहेत म्हणून बरे वाटले.   पुणे युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस (Puwj) त निवडणुका मी सुरु केल्या.   मी पुण्यात आलो तेव्हा या संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व्हायच्या. ही पद्धत बंद व्हावी म्हणून १९९१ आणि ,१९९२ ला मी सलग दोन वर्षे अध्यक्ष आणि इतर पदांसाठी अर्ज भरले. त्यामुळे निवडणूक घ्यावीच लागली.    सहमतीने धोरण सोडून मी सहकारी साखर कारखान्याच्या प्रमाणे निवडणूक लादली म्हणून वरुणराज भिडे यासारखे त्यावेळचे अनेक बुजुर्ग पत्रकार माझ्यावर खवळले होते. (सहकारी साखर कारखाने म्हणजे सर्व दुर्गुणांचा पुतळे अशी भावना फार आधीपासूनच आहे. )   अर्थात निवडणुकीत सपाटून पडलो. पहिल्या वेळेस सकाळ चे राजीव साबडे यांच्याविरुद्ध तेरा मते मिळाली, दुसऱ्या वेळेस सत्तावीस.   तिसऱ्या निवडणुकीत मी आणि पराग रबडे मिळून अख्खे पॅनल निवडून आणले.    गेल्या तीस वर्षांत त्यानंतर आजपर्यंत दुसरी कुणी महिला सरचिटणीस झालीच नाही.   पुण्यात puwj...
Image
  श्रीरामपुरातल्या ‘लोकमान्य टिळक वाचनालया’ने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली! ‘अक्षरनामा’    ग्रंथनामा  - वाचणारा लिहितो कामिल पारखे प्रातिनिधिक चित्र Fri , 04 June 2021 ग्रंथनामा वाचणारा लिहितो पुस्तके Books गो. नि. दांडेकर G. N. Dandekar वि. स. खांडेकर V. S. Khandekar साने गुरुजी Sane Guruji श्यामची आई Shyamchi Aai साने गुरुजी कथामाला Sane Guruji Kathamala चांदोबा Chandoba हंस Hans नवल Naval किर्लोस्कर Kirloskar ललित Lalit अनिल बर्वे Anil Barve द. मा. मिरासदार D. M. Mirasdar पु. ल. देशपांडे P. L. Deshpande केशवसुत Keshavsut आचार्य अत्रे Aachary Atre श्रीरामपुरात मेन रोडवरील सोनार आळीतील आमच्या ‘पारखे टेलर्स’ या दुकानासमोर नगरपालिकेचे लोकमान्य टिळक वाचनालय होते. अगदी जुनाट दिसत असलेल्या या वाचनालयात पाचव्या इयत्तेत असल्यापासून मी नियमितपणे जायला सुरुवात केली. संध्याकाळी साडेपाचला शाळा सुटली की, मी आमच्या दुकानाकडे येई आणि वाचनालयाच्या सहा वाजता खुला होणाऱ्या बालविभागाच्या कक्षात जाऊन बसे. १९७०-७१सालची ही घटना. त्या काळात महाराष्ट्रातील सर्वांत उत्तम पद्धतीने चालवल्या ...

पगारी नोकरीतील लॉगआऊट

Image
  त्या दिवशी सकाळी मुंबई-पुणे हमरस्त्यावरील पिंपरीचिंचवडच्या मोरवाडी इथल्या `सकाळ’च्या ऑफिसात जाऊन `pcamil’ या नावाने लॉग इन केले. डेस्क टॉपवर असलेला माझा वैयक्तिक मराठी आणि इंग्रजी मजकूर, लेख, वगैरे स्वतःला मेल केला, काही मजकूर आणि फोटो पेन ड्राईव्हवर सेव्ह करुन मग तिथले सर्व डिलीट केले. डेस्कमधील सगळ्या ड्रॉवर्सतील पुस्तके वगैरे बॅगांत भरल्या. त्या जवळजवळ नव्या, वातानुकूलित ऑफिसमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत, मधल्या त्या माझ्या आवडत्या टिव्हीसेटकडे, स्वतःच्या खुर्चीवरुन एकदाचे भरभरुन पाहून घेतले. पुन्हा एकदा आता कोऱ्या झालेल्या डेस्कटॉपवर अखेरची नजर टाकली आणि `pcamil’ या सकाळ माध्यमसमूहातील एका व्यक्तीला कायमसाठी लॉगआऊट केले. गेली सोळा वर्षे म्हणजे २००४च्या फेब्रुवारीपासून हा `pcamil’ सकाळच्या शनिवारवाड्याजवळच्या इमारतीत, शिवाजीनगरच्या वातानुकूलित आणि बाहेर हिरवागार परीसर असलेल्या सुंदर संकुलात, नंतर बाणेर येथे एसआयएलसीच्या हिरव्यागर्द परिसरात आणि मागील दोन वर्षांपासून पिंपरीच्या मुंबई-पुणे हमरस्त्यावरच्या ऑफिसात कार्यरत होता. खरे म्हटले तर तीन वर्षांपूर्वीच सकाळ म...

पत्रकारितेचा श्रीगणेशा

Image
  सर, आर यु एम्प्टी नाऊ ?" माझ्या या प्रश्नावर गोव्यातील मिरामारच्या धेम्पे कॉलेजमधील त्या स्टाफ रुममध्ये एकदम शांतता पसरली. एकदोन महिला शिक्षकांनी टेबलावरील आपली पुस्तके उचलून ताबडतोब दाराकडे वाटचाल केली. बाकीच्यांनी आपसातील संभाषण थांबवून क्षणभर माझ्याकडे रोखून पाहून लगेचच माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे दाखवत समोरचे वृत्तपत्र चाळण्यास सुरुवात केली. ज्यांना मी हा प्रश्न विचारला ते प्राध्यापक अफ़ॉन्सो तसे ज्येष्ठ शिक्षक असल्याने स्टाफ रूममधील कुणीही या प्रश्नावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले होते. प्राध्यापक अफ़ॉन्सो यांनी मात्र प्रसंगावधान राखत त्यांना मी विचारलेला हा अवघड प्रश्न अगदी कुशलतेने हाताळला होता. ''यस जॉन, आय एम फ्री नाऊ... टेल मी, व्हाट डू यु वॉन्ट ?" त्यांनी लगेचच मला प्रतिसाद दिला होता. त्यांच्या त्या उत्तराने कॉलेजच्या त्या स्टाफ रुममध्ये माझ्या प्रश्नानंतर एकदम सन्नाटा का पसरला होता हे मला लगेच कळाले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या स्टाफ रुममधील उपप्राचार्य आणि रसायनशास्त्राचे विभागप्रमुख साखरदांडे सर, इंग्रजीच्या शिक...