ईद मुबारक... आज सकाळी जरा उशीराच म्हणजे साडेदहाच्या सुमारास लक्षात आले की ईदच्या शुभेच्छा कुठल्याच ग्रुपवर तोपर्यंत दिसल्या नव्हत्या याचे एक खरे कारण म्हणजे या ग्रुपवर मुसलमान लोक एकतर नसतात किंवा त्यांची संख्या खूप कमी म्हणजे अगदी नगण्य असते. खरे तर नाताळ वगळता इतर कुठल्याही सणाच्या, वाढदिवसांच्या, जयंतीच्या आणि पुण्यतिथीनिमित्त मी पोस्ट टाकत नसतो. इतरांच्या सर्वांच्या शुभेच्छा असतात, मग त्यात गर्दी कशाला? असा एक विचार असतो. मात्र रमझान ईद असून सगळ्या ग्रुपवर ती शांतता पाहून मीच मग चारपाच ग्रुपवर ईद मुबारक च्या शुभेच्छा दिल्या. झाले, त्याबरोबर त्या सर्व ग्रुपवर ईद मुबारक च्या अनेक शुभेच्...
Posts
Showing posts with the label New Year
- Get link
- X
- Other Apps
नूतन वर्षाचा आरंभ. गोव्यात मी शिकत असताना तिथल्या कॅथोलिक म्हणजे किरिस्ताव लोकांसाठी तीन दिवस किंवा फेस्त खूप महत्त्वाचे असायचे. हे तीन फेस्त म्हणजे २५ डिसेंबरचा ख्रिसमस, सेंट फ्रान्सिस झेव्हियरचा तीन डिसेंबरला येणारा आणि पब्लिक हॉलिडे असणारा फेस्त आणि 31st डिसेंबरची रात्र म्हणजेच नूतन वर्षाचा आरंभ. तर पणजीतल्या The Navhind Times या इंग्रजी दैनिकात मी बातमीदार होतो तेव्हाची ही गोष्ट. आमच्या या इंग्रजी दैनिकात अनेक कामगार लायनो मशिन ऑपरेटर, फोरमन, वगैरे ख्रिस्ती होते आणि या पेद्रु, मिंगेल, कॅजिटन, रिबेलो वगैरे मंडळींना ख्रिसमसची २५ डिसेंबरला मध्यरात्री होणाऱ्या प्रार्थनाविधीसाठी सुट्टी द्यावी अशी मागणी असायची. या दिवशी गोव्यात इंग्रजी दैनिकातील जाहिराती वगैरे आर्थिक बाबी विचारात घेता हे शक्य नसायचे. .. मग या सर्व कामगारांना तडजोड म्हणून ३१ डिसेंबरच्या न्यु इयर बॉलला म्हणजे डान्सला हजेरी लावण्यासाठी पाने लवकर लावून जाण्याची मुभा असे आणि १ जानेवारी रोजी The Navhind Times आणि मराठी जुळे दैनिक 1नवप्रभा' कामगारांना चक्क सुट्टी असायची. . नववर्षाला बंद असणारे द नवहिंद टाइम...
- Get link
- X
- Other Apps
'मेरी ख्रिसमस' वयाच्या पंधराव्या वर्षी गोव्यात राहायला गेल्यापासून ख्रिस्तमस व कुठल्याही फेस्तला म्हणजे सणाला माझा ब्रेकफास्टचा मेन्यू कायम राहिला आहे. बनपाव किंवा बर्गरला भरपूर बटर लावून, त्यात चीज आणि हाफ-फ्राईड अंडे टाकून गरमगरम कॉफी पित सणाच्या सेलेब्रेशन मूडमध्ये जाता येते. (बल्गेरियात असताना आणि अलीकडच्या युरोप दौऱ्यावर हा माझा दररोजचा नाश्ता असायचा !) तर आज सकाळी शेजारच्या बेकरीत गेलो आणि बनपाव मागितला तर तिथल्या युपीमधून गेल्या वर्षी आलेल्या मुलाने सकाळीच एकाने तीसचाळीस बनपाव नेले आणि आता एकही बनपाव राहिला नाही म्हणून सांगितले ! त्या बेकरीत सगळीकडे अनेक प्रकारच्या केकचे ढिग रचून ठेवले होते, त्या मुलाला आज एव्हढ्या केकचे कारण काय विचारले तर अस्लम डोके खाजवायला लागला. त्याला आजच्या सणाचे नाव माहित नव्हते. ''आज कोई बहुत केक खाते है ना, इसलिए बनाये है'' असे तो म्हणाला. मागच्याच वर्षी पुण्यात आलेल्या अस्लमने बहुधा ख्रिसमस वा नाताळ हा शब्द कधी ऐकलाही नसावा. नंतर चिंचवडगावातल्या आमिर बेकरीत बर्गर, बनपाव घ्यायला तेव्हा तिथेही केकचे ढिग लावलेले दिसले. बेकरीचा...