महाबळेश्वरचे होली क्रॉस चर्च
महाबळेश्वरचे होली क्रॉस चर्च महाबळेश्वरला तुम्ही कधी भेट दिली असेल तर या पर्यटक स्थळाच्या मुख्य बाजारपेठेत अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेले एक छोटेसे टुमदार बंगलीवजा बांधकाम तुम्ही नक्कीच पाहिले असणार. गेटपाशीच मदर मेरीचा डोंगर म्हणजे ग्रोटो आहे आणि बंगलीच्या शिखरवजा टोकावर क्रूस आहे. यावरुन हे एक कॅथोलिक चर्च आहे हे माहितगार व्यक्तीला लगेच कळते. महाबळेश्वर एसटी बसडेपोपासून एक मिनिटाच्या अंतरावर आणि टुरिस्ट टॅक्सींच्या वाहनतळापाशी हे महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अनेक कारणांनी आगळेवेगळे असलेले असलेले होली क्रॉस चर्च आहे. मुंबई आणि वसई परीसर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील हे सर्वात जुने कॅथोलिक चर्च आहे. ब्रिटिश अमदानीत 1831 साली या चर्चची स्थापना झाली होती. जुन्या वास्तुशास्त्राच्या धर्तीवर बांधलेले हे ...