Posts

Showing posts with the label सृजनाचा मळा राजहंस प्रकाशन

निसर्गानं बहरलेला ‘सृजनाचा मळा’ पुस्तक - परिचय Fr Francis D'Britto

निसर्गानं बहरलेला ‘सृजनाचा मळा’ - कामिल पारखे Esakal, रविवार, 3 ऑगस्ट 2014 - 01:26 PM IST पुस्तक - परिचय आपण सदैव निसर्गाच्या सान्निध्यात असतो, मात्र या समृद्ध निसर्गाच्या वैविध्याची अनुभूती आणि आस्वाद घेणाऱ्या व्यक्ती क्वचितच आढळतात. नेहमीच उगवणाऱ्या आणि मावळणाऱ्या सूर्यात काय नावीन्य आणि सौंदर्य, असं बहुसंख्य लोकांना वाटलं तरी संवेदनाशील व्यक्तीला प्रत्येक सूर्योदयात आणि सूर्यास्तात वेगवेगळ्या रंगछटांचं नावीन्य दिसत असतं. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सृष्टीच्या या वेगवेगळ्या रूपांवर केलेलं चिंतन ‘सृजनाचा मळा’ या पुस्तकात आहे. कविमनाचे फादर दिब्रिटो संवेदनाशील, हळवे आहेतच, त्याशिवाय धर्मगुरू असल्याने आपल्या आसपास असलेल्या सृष्टीतील प्रत्येक बाबीवर चिंतन आणि मनन करण्याची त्यांची वृत्तीही आहे. त्यांच्या याआधीच्या पुस्तकांतून या प्रवृत्तीची वाचकांना ओळख झाली आहे. ‘सृजनाचा मळा’ हे पुस्तक सृष्टीच्या, निसर्गाच्या वेगवेगळ्या छटांवर लिहिलेले गद्य काव्य आहे. लेखकाचं बालपण निसर्गाची हरित देणगी असलेल्या वसईतील एका खेड्यात गेलं. त्यामुळे सृष्टीच्या, निसर्गाच्या विविध रूपांची त्यांना चांगली ओ...