Posts

Showing posts with the label Kopargaon
Image
  महाराष्ट्रात भौगोलिकदृष्ट्या हरेगावचे स्थान काय आहे हे फार लोकांना माहित नाही. हरेगाव हल्लीच्या हमरस्त्यावर नाही, मात्र याच हरेगावामुळे या परिसरात हमरस्ते आणि रेल्वे स्टेशने तयार झाले, औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला आणि आसपास श्रीरामपूरसारखे त्याकाळात अस्तित्वात नसलेले शहर निर्माण झाले. ही बाबसुद्धा लोकांना माहित नसणार अहमदनगर जिल्ह्यातच आणि श्रीरामपूरजवळ असलेले शिर्डी हे स्थळ जगाच्या नकाशावर आपली जागा राखून आहे. मात्र शिर्डी हे नावारुपाला आले ते अलीकडच्या काळात, म्हणजे सत्तरच्या दशकात. त्याकाळात श्रीरामपूरहून मी आणि माझा एक मित्र सायकलने शिर्डीला जायचो, तिथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मुले आणि इतर भाविक लोक थेट साईबाबांच्या मूर्तीसमोर बसायचो. देवदर्शन झाल्यावर काही क्षण मंदिरात किंवा पायऱ्यांवर स्वस्थ बसायचे असते, हे मी त्यावेळी शिकलो. आजूबाजूला भिंतीही नव्हत्या आणि अजिबात गर्दी नसायची यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. याउलट हरेगाव मात्र फार पूर्वीपासून एक गजबजलेले ठिकाण होते. समाजमाध्यमावर ``आम्ही हरेगावकर'' या ग्रुपचा गेली काही वर्षे मी सभासद आहे. हरेगावशी म...
Image
संजीवनी साखर कारखाना संस्थापक शंकरराव कोल्हे   ''तुम्ही मुंबई-पुण्याकडची आणि इतर शहरांतले पत्रकार, तुम्हाला आमच्याकडच्या प्रश्नांची काय माहिती असते ? इकडे येण्याआधी तुम्ही चारदोन स्थानिक पत्रकारांशी बोलता, जुनी वार्तापत्रे नजरेकडून घालता आणि आमच्यासारख्या लोकांना तेच-तेच प्रश्न विचारता. शेतीसाठी पाणीवाटपाचा वाद, अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण वाद आणि शंकरराव काळे -शंकरराव कोल्हे वाद, बस्स, हे विषय सोडून तुमची गाडी पुढे ढळतच नाही. हा, घ्या तुम्ही तो नाश्ता आणि चहा,,,'' कोपरगावातल्या संजीवनी साखर कारखान्याच्या आवारात साखर कारखाना संस्थापक शंकरराव कोल्हे यांची मुलाखत घेताना अगदी सलामीला झडलेला हा संवाद. माझ्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने तर खूप मोठे असलेल्या शंकरराव कोल्हे यांच्या समोर मी बसलो होतो आणि माझ्याकडून एकदोन प्रश्न विचारले गेल्यानंतर या साखरसम्राटांनी अशी तोफ डागली होती. अर्थात `इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी आणि राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकाचे मी प्रतिनिधीत्व करत असल्याने समोरच्या व्यक्तीच्या कर्तृत्वाने किंवा नुसत्या बोलण्याने मी दबून जाण्याचा...