Posts

Showing posts from June, 2019

गोव्यातल्या सर्वात लोकप्रिय नाश्त्याच्या चमचमीत आठवणी.. Goa Bhaji Pao .

Image
गोव्यातल्या सर्वात लोकप्रिय नाश्त्याच्या  चमचमीत आठवणी... ... गोव्यात सगळीकडे नवीन पहाट उगवते ती एका विशिष्ट आवाजाने. 'पुई-पुई' यासारखा तो आवाज असतो. तुमच्या परिसरात पाववाला आल्याची ती वर्दी असते. पूर्वी ऑटोरिक्षांना हॉर्नसाठी हवेच्या दाबावर काम करणारे उपकरण असते, त्याचा गोलाकार रबरी भाग दाबला कि त्या 'पुई-पुई' असा आवाज यायचा. तेच उपकरण आपल्या सायकलच्या हँडलवर बसवून, त्यातून आवाज काढत गोव्यात हे पाववाले किंवा पोदेर घरोघरी आपल्या आगमनाची खबर देत असतात. आपल्या सायकलवर विविध प्रकारचे पाव प्लास्टिकच्या कापडांत झाकून पाववाला यावेळी येतो. पोर्तुगीज भाषेत पाववाल्याला किंवा बेकरी मालकास पोदेर म्हटले जाते. पुण्यात दुधाच्या पिशव्यांसाठी फ्लॅटच्या बाहेर ग्रिलमध्ये सकाळी पिशव्या लटकवलेल्या असतात तसे गोव्यात प्रत्येक घराच्या कुंपणाच्या दरवाजापाशी पावांसाठी पिशव्या टांगलेल्या असतात. प्रत्येक घराचा सकाळचा आणि संध्याकाळचा वेगवेगळ्या पावांचा रतीब ठरलेला असतो. कमीजास्त मागणी असेल तर आधी तसे सांगावे लागते. मागे अंजुना-वागातोर समुद्रकिनारी असलेल्या बहिणीच्या घरी सुट्टीसाठी आ

तियात्र

Image
तियात्र पोर्तुगिज भाषेत त्रियात्रो म्हणजे नाटक. गोव्यात कोकणीतील संगीतनाटकाला तियात्र म्हणतात. त्रियात्रवर युरोपीयन प्रभाव असला, तरी संहितेचा गाभा मात्र स्थानिक मातीशी निगडित असतो.   by   टिम बिगुल   October 13, 2018 in   संस्कृती आज रात्री अंजुना स्कुलच्या ग्राऊंडवर तियात्र आहे, तू येतोस का पाहायला?” माझ्या बहिणीने मला विचारले अन मी एकदम खुश झालो. गोव्यात वागातोरला सुट्टीवर आलो होतो आणि आज शनिवारी रात्री तियात्रचा शो आहे असे ऐकले आणि मी ताबडतोब होकार दिला. खूप वर्षांनंतर तियात्र पाहण्याचा योग आला होता आणि मी ही संधी सोडणार नव्हतो. तियात्र (Tiatr) म्हणजे कोकणी भाषेतील संगीतमय नाटक. पोर्तुगीज भाषेत तियात्रो म्हणजे नाटक. वागातोरहून चालत रात्री साडेनऊच्या दरम्यान अंजुना येथील शाळेच्या मैदानावर पोहोचलो. तेथेच तियात्र आयोजित करण्यात आले होते. देणगी कुपन्सवर प्रवेश देण्यात येत होता. खुल्या मैदानात फोल्डिंगच्या लोखंडी खुर्च्यांवर बसण्याची सोय होती. अगदी पुढच्या रांगेत पांढऱ्या झग्यातील काही फादर बसले होते. बहुतेक त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि स्थानिक चर्चचे धर्मगुरू अस