तुम्ही कधी उघडी प्लास्टिक टोपली म्हणजे बास्केट किंवा कुलुपबंद, सील केलेलं दानपत्र घेऊन लोकांमध्ये, गर्दीत जाऊन रक्कम गोळा केली आहे का? अशी कामे मी स्वतः अनेकदा करत आलो आहे. या दोन्ही प्रकारांत नंतर गोळा केलेली नाणी, नोटा आणि मूल्यवान ऐवज यांची मोजदाद करावी लागते. गोळा झालेलूया रकमेची आणि ऐवजांची रीतसर नोंद करून त्यावर सह्या आणि शिक्का लावून ते नंतर मुख्य आयोजकांकडे सोपवावे लागते. एकदा रक्कम आणि कागदपत्रे संबंधितांकडे सोपवल्यानंतर तुमची जबाबदारी संपते आणि ती जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा त्या संस्थेच्या विश्वस्तांकडे जाते. कधीकधी देवळांत उपासनाविधीदरम्यान दानपात्र घेऊन भाविकांमध्ये फिरून दान गोळा करावे लागते. आता सवयीने अशावेळी कसे वागावे, कुणापुढे दानपत्र न्यावे याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. दानपत्र सभोवताली फिरत असताना एखाद्याची झाकलेली मूठ पाहून, एखादी व्यक्ती खिशांत किंवा पर्समध्ये हात घालताना पाहिल्यानंतरच तिकडे त्या दिशेने दानपत्र नेले जाते. एखादी व्यक्ती पॅन्टच्या आणि शर्टच्या खिशांत चाचपडून नंतर शांत बसते. एखादी व्यक्ती मात्र अगदी स्थितप्रज्ञपणे बसून राहिली असली...
Posts
Showing posts from July, 2026