बारामतीकर. तसे पाहिले तर आम्ही मूळचे बारामतीकर. अगदी अलीकडच्या काळापर्यंत पुणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ होते. पुणे, बारामती आणि खेड. तर या बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या पिंपरी चिंचवड शहराचा अंतर्भाव होता. गोवा सोडून मी पुण्यात तात्पुरता स्थायिक झालो, डेक्कन जिमखाना येथे रानडे इन्स्टिट्युटसमोर लॉजमध्ये मंथली कॉट बेसिसवर चांगली तीनचार वर्षे राहिलो. लग्नानंतर मात्र सेटल व्हावे लागले. जॅकलिनची नोकरी चिंचवडला म्हणून तेथेच घर घेतले आणि अशाप्रकारे आम्ही निदान लोकसभा मतदार संघापुरते बारामतीकर बनलो. त्यावेळी खेड मतदारसंघात अशोक मोहोळ, विदुरा नवले, निवृत्ती शेरकर खासदार होते, नंतर किसनराव बाणखेले खासदार बनले, पुण्यातले खासदार मंडळी तर सर्वपरिचित आहेत. आमच्या बारामती मतदारसंघात मात्र खासदारांचे नेहेमीच एकच आडनाव असायचे. फक्त पहिले नाव बदलायचे. शरद पवार, अजित पवार, पुन्हा शरद पवार. त्यांच्या विरोधात नेहेमीच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असल्याने लोकसभा निवडणुकीत मतदान कुणाला करायचे याचा विचार करण्याची कधी गरजच भासली नाही. पण एकदा ती वेळ आली. त्याआधीची ही घटना सांगतो. उन्...
Posts
Showing posts with the label Congress
- Get link
- X
- Other Apps
निवडणूक चिन्हे टी एन शेषन निवडणूक आयुक्त होण्याआधीची ही गोष्ट आहे. काळ साधारणतः सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीचा. श्रीरामपुरात काही मोक्याच्या जागी आणि रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या घरांच्या भिंतींवर आणि इतर बांधकामांवर पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर काही चिन्हे आणि घोषणा लिहिलेल्या असायच्या. त्यापैकी एक बैलजोडी असायची, गायवासरू असायचे, शहरी भागांत मिणमिणता दिवा असायचा. अनेक चित्रांत लाल रंगातलं विळा-कणीस हें चिन्ह असायचं, काही ठिकाणी विळा आणि हातोडा हे चिन्ह असायचं. देशातल्या लोकसभा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत रंगवलेल्या या चित्रांवर विविध पक्षांची ही निवडणूक चिन्हे, पक्षांची आणि उमेदवारांची नावे असायची. तर यापैकी बैलजोडी हे चिन्ह होतं मोरारजी देसाई वगैरे नेत्यांच्या संघटना काँग्रेसचं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये फार मोठी म्हणजे सरळसरळ उभी फूट पडली होती आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या गटासाठी बैलजोडीऐवजी नवे गायवासरू हे चिन्ह घ्यावं लागलं होतं. सन १९७१च्या सार्वत्रिक निवडणुका इंदिरा गांधींनी हे नवे निवडणुक चिन्ह घेऊन लढवल्या आणि...
संसदेतील राजकीय सत्तांतराच्या चक्राचा ‘रोलर कोस्टर’ वेध!
- Get link
- X
- Other Apps
संसदेतील राजकीय सत्तांतराच्या चक्राचा ‘रोलर कोस्टर’ वेध! पडघम - देशकारण कामिल पारखे पं. नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी, गुलझारीलाल नंदा, विश्वनाथ प्रताप सिंग, मनमोहनसिंग, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी Tue , 07 May 2019 पडघम देशकारण पं. नेहरू Nehru इंदिरा गांधी Indira Gandhi राजीव गांधी Rajiv Gandhi पी. व्ही. नरसिंहराव P. V. Narasimha Rao चंद्रशेखर Chandra Shekhar अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee मनमोहनसिंग Manmohan Singh नरेंद्र मोदी Narendra Modi स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे १९५२ नंतर झालेल्या मध्यवर्ती आणि विविध राज्यांतल्या निवडणुकांत सुरुवातीची काही वर्षं सगळीकडे काँग्रेस पक्षाचीच सरशी झालेली दिसून येते. देशातील आणि विविध राज्यांतील जनता काँग्रेसच्या राजवटीवर खूश होती किंवा या राजवटीला दुसरा चांगला, सक्षम पर्याय देण्यास विरोधक अयशस्वी ठरले असावेत, असं अनुमान काढता येतं. काँग्रेसच्या राजकीय सत्तेच्या या मक्तेदारीस महाराष्ट्रात पहिला जोराचा धक्का लागला, तो १९५७च्या निवडणुकांत. या वेळी काँग्रेसविरोधी पक्ष संयुक्त महार...
United opposition euphoria: Proceed with caution
- Get link
- X
- Other Apps
Monday, June 25, 2018, 1:41 PM | e-paper HOME PUNE MAHARASHTRA ART AND CULTURE SPORTS BUSINESS WORLD OPINION Home Opinion United oppn euphoria: Proceed with caution United oppn euphoria: Proceed with caution Camil Parkhe Saturday, 23 June 2018 goo.gl/GZEVMq It is true that for the first time in recent years, leaders of various main political parties across various states who normally do not even see eye to eye, had shared a common platform at the Bengaluru oath taking ceremony. The body language of these leaders including Congress leaders Sonia Gandhi and Rahul Gandhi, Bahujan Samaj Party’s Mayawati, Samajwadi Party’s Akhilesh Yadav, Telugu Desam Party’s N Chandrababu Naidu, Trinamool Congress’ Mamata Banerjee, and CPM’s Sitaram Yechuri revealed a bonh...