Posts

Showing posts with the label Thomas Stephens
Image
पोप फ्रान्सिस सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत आणि जगभरातील नियतकालिके त्यांच्या या दौऱ्यावर लक्ष ठेऊन आहेत. जगभर धर्म आणि शासन यांची फारकत होत असताना आजही कॅथोलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु असलेल्या पोपमहाशयांना आजही महत्त्व दिले जाते हे मान्य करावेच लागेल. पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याहून लहान असलेल्या आणि सातशे नागरिक असलेल्या व्हॅटिकन सिटीला आज एक सार्वभौम देश म्हणून मान्यता आहे आणि या देशाचे पोप राष्ट्रप्रमुख आहेत. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर असताना मुद्दाम व्हॅटिकन सिटीला गेले आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारत भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले आहे. गेली काही दशके तीन पदांवरील व्यक्तींविषयीं जगातील अनेक लोकांमध्ये अपार कुतूहल असते. या तीन पदांवरील व्यक्ती वर्षभर या ना त्या कारणाने, निमित्ताने जगभरातील प्रसार माध्यमांत सतत झळकत असतात. या तीन व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या आणि रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख पोप. पोप हे ख्रिस्तमंडळाचे म्हणजे कॅथोलिक चर्चचे प्रमुख, येशू ख्र...

`टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

Image
  टाइम्स ऑफ इंडियाने २००० साली पुण्यात नव्यानेच स्वतंत्र आवृत्ती सुरु केल्यानंतर तेथे महाराष्ट्र पानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी `इंडियन एक्सप्रेस'मधून माझी निवड करण्यात आली होती. पत्रकारितेतील माझा मित्र अभय वैद्य आणि निवासी संपादक शेरना गांधी यांनी माझी यासाठी निवड केली होती. अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगैरे परिसरात आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पोहोचणाऱ्या या खास म्हाफुसिल आवृत्तीतील महाराष्ट्र पान असलेल्या पान दोनला सर्व मजकूर पुरवण्याची माझी जबाबदारी होती. टाइम्स ऑफ इंडिया'च्या जुळ्या भावंडाच्या म्हणजे `महाराष्ट्र टाइम्स'च्या पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बातमीदारांनी फॅक्सवर पाठवलेल्या मराठी बातम्यांचे मी भाषांतर करुन आणि वृत्तसंस्थांच्या बातम्यांनी हे पूर्ण पान भरले जायचे. सांगलीचे रविंद्र दफतरदार, कोल्हापुरचे प्रभाकर कुलकर्णी, सोलापूरचे रजनीश जोशी आणि शिर्डीचे ताराचंद म्हस्के यांच्याकडून रोज बातम्यांचा रतीब यायचा. अधूनमधून मी स्वतंत्र म्हणजे माझ्या बायलाईनच्या बातम्याही लिहित असायचो. तर त्यादिवशी मी माझा एक मजकूर न्यू...