Posts

Showing posts from September, 2020

भारतीय ठशातील ख्रिस्ती कला

  भिन्न धर्मपरंपरा आणि संस्कृती असलेल्या लोकांचा परस्परांशी संबंध आला कि या संबंधातून नकळत एकमेकांच्या धार्मिक मूल्यांची आणि सांस्कृतिक ठेव्यांची देवाणघेवाण होते. मध्ययुगीन काळात ख्रिस्ती धर्मपरंपरेतील कलेचे भारतात आगमन झाले. तेव्हा असाच प्रकार घडला. खास युरोपियन ठसा असलेल्या ख्रिस्ती धर्मपरंपरातील कला आणि भारतीय कला यांचा या वेळेस सुंदर मिलाप घडला आणि त्यातून जन्मास आली भारतीय ठशातील ख्रिस्ती कला. ख्रिस्ती धर्माचा उगम इस्राएल राष्ट्रात झाला व त्यामुळे हा धर्म मूळचा आशिया खंडातलाच. पण मध्ययुगीन काळापूर्वीच यूरोपातील सर्व राष्ट्रांत या धर्माचा खूप प्रचार झाला व भारतात हा धर्म मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला तो युरोपिअन   मिशनरींमार्फतच . त्यामुळे ख्रिस्ती धर्म म्हटलं की   तो पाश्चिमात्य संस्कृतीत घडलेला अशीच बहुतेकांची समजूत असते. युरोपियनांनी हा धर्म भारतात आणला. त्याबरोबरच त्यांनी आपापल्या देशातील परंपरेत वाढलेली कलादेखील येथे आणली. या पाश्चिमात्य कलेचा स्थानिक कलापरंपरेशी संबंध आल्यानंतर परस्पर प्रभावातून उगम पावलेल्या भारतीय ख्रिस्ती कलेची मुळे भारताच्या संपन्न विविधतापूर्ण संस्क

नावात काय नाही?

                   कामिल पारखे हे माझे नाव ऐकून अशा अनेक व्यक्तींची उत्सुकता चाळवली गेल्याचे मी अनेकदा अनुभवतो. या नावाचा अर्थ काय येथपासून मग  प्राथमिक चौकशी सुरू होते. प्रत्येक नावामागे , आडनावामागे विशिष्ट भौगोलिक , सामाजिक , सांस्कृतिक आणि  धार्मिक  संदर्भ असतो आणि तो जाणून घेण्याच्या उत्सुकतेने विचारलेल्या या  प्रश्‍नाला मला नेहेमीच सामोरे जावे लागते. मात्र ही सर्व पूर्वपिठिका सांगण्याच्या मूडमध्ये  मी प्रत्येकवेळी असतोच असे नाही.  त्यामुळे आमच्याकडे मराठी ख्रिस्ती कुटुंबात त्याकाळी असलेल्या प्रथेप्रमाणे मला ये नाव मिळाले हा सारा इतिहास अशावेळी सांगत बसणे प्रत्येक वेळी शक्य नसते. अशावेळी समोरची व्यक्ती कोण आहे आणि अशा चर्चेसाठी त्याप्रसंगी माझ्याकडे किती वेळ आहे हे पाहून मग मी प्रत्येक वेळ निभावून घेत असतो.                 गोव्यात बारा वर्षे स्थायिक असतांना मला माझ्या   ’कामिल’ या नावामुळे कधीच अवघडल्यासारखे झाले नाही कारण तेथे हे नाव आपल्याकडील   रमेश , वसंत या नावांसारखे. बसमध्ये कुणी कामिल म्हणून हाक मारली तर   हाक मारणारया व्यक्तीच्यादिशेने लगेच   चार डोकी वळून   पाहणार इतके

शतकवीर ’ निरोप्रा ’ मासिक

    15) शतकवीर ’ निरोप्रा ’ मासिक       ’ निरोप्रा’च्रा 100 वर्षांच्रा वाटचालीचा आढावा घेणार्‍रा ’ निरोप्रा: संपादकीर स्पंदने ( 1903-2003)’ रा पुस्तकाची निर्मिती हा खरोखर एक आनंदाचा आणि अभिमानाचा रोग आहे. आनंदाचा रोग अशासाठी कि असे आनंदाचे आणि अभिमानाचे क्षण मराठी निरतकालिकांच्रा इतिहासात फार दुर्मिळ आहेत. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली सुरू केलेल्रा ’दर्पण’ रा निरतकालिकाने सुरू होतो. सव्वादोनशे वर्षांच्रा रा इतिहासात ’निरोप्रा’ला लाभलेला हा रोग आतापर्रंत केवळ तिनच निरतकालिकांना लाभलेला आहेत. प्रोटेस्टंट मिशनरींनी सुरू केलेला आणि अजूनही प्रकाशित होत असलेला ’ज्ञानोदर’ , समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्र टिळकांनी सुरू केलेला ’ केसरी’ आणि ’निरोप्रा’ ही ती तीन निरतकालिके. रापैकी शंभरी ओलांडलेला ’निरोप्रा’ अजूनही तरूणाईतच आहे राबद्दल कुणाचे दुमत नसावे.       ’ निरोप्रा’चा इतिहास म्हणजेच एका अर्थाने अहमदनगर जिल्ह्यातील दलित खिस्ती समाजाचा इतिहास असे ’निरोप्रा’चे संपादक फादर ज्रो. मा. पिठेकर रांनी जरंत गारकवाड रांनी लिहिलेल्रा ’ निरोप्र