साधारणतः १९८२चा काळ. गोव्यात पणजीतल्या The Navhind Times (‘नवहिंद टाइम्स’) चा ‘कॅम्पस रिपोर्टर’ म्हणून मी नुकतीच सुरुवात केली होती. पणजीतले धेम्पे आर्टस् आणि सायन्स कॉलेज, डेम्पो कॉमर्स कॉलेज, बांबोळीचे गोवा मेडिकल कॉलेज, फार्मागुडीचे सरकारी गोवा इंजिनियरिंग कॉलेज, मडगावचे दामोदर कॉमर्स कॉलेज, म्हापशाचे डीएमसी आणि वॉस्कोचे एमईएस कॉलेज, अशी काही मोजकीच पदवी आणि व्यावसायिक महाविद्यालये तेव्हा गोव्यात होती. आठवड्यातून या प्रत्येक महाविद्यालयात जाऊन गरजेनुसार तेथील प्राचार्यांना, काही शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांच्या नेत्यांना भेटून शिक्षणक्षेत्रातील बातम्या दररोज किंवा ‘कॅम्पस रिपोर्टर’ या प्रत्येक सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक सदरात द्यायच्या, हा माझा नेहमीचा शिरस्ता होता. त्याशिवाय नोकरी करत असतानाच मी एम.ए.च्या तत्त्वज्ञान विषयाचा विद्यार्थी म्हणून नियमितपणे लेक्चर्सला हजर राहत असे. त्या वेळी मुंबई विद्यापिठाचे पदव्युत्तर केंद्र पणजीतल्या १८वा जून रोडवरील सुशिला बिल्डिंगमध्ये होते. गोवा विद्यापीठाची स्थापना होण्यास अजून अवकाश होता. या पोस्ट-ग्र...
Posts
Showing posts with the label Times of India
- Get link
- X
- Other Apps
बॉसच्या फार जवळ जाऊ नये, फार पुढेपुढे, सलगी करु नाही असे शहाणी माणसे म्हणतात. हा मंत्र मी फार कसोशीने पाळत आलो आहे. चार दशकांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत एकदोन जणांचा किंवा अख्ख्या टीमचा बॉस होण्याची आपत्ती माझ्यावर फार कमी काळ -अगदी नोकरीच्या शेवटच्या टप्प्यावर - आली. माझे कनिष्ठ सहकारी किंवा माझ्याबरोबरीचे कालांतराने माझे बॉस झाले तेव्हाही मी वरचा हा मंत्र सतत ध्यानात ठेवला. माझ्या अगदी पडझडीच्या काळात संपूर्ण जग नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर असताना पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकीय विभागाच्या बॉसने शेरना गांधी (आणि मुख्य वार्ताहर अभय वैद्य ) यांनी मला इंडियन एक्स्प्रेसमधून बोलावले. कॉनी मस्कारेन्हास याने म्हटले आहे की शेरना यांना फक्त कामाशी मतलब होता, एखाद्या व्यक्तीच्या खासगी किंवा पूर्वायुष्याशी नाही. पुण्यात टाइम्समध्ये दोन वर्षे शेरना गांधी Sherna Gandhy बॉस होत्या. (Gandhy हे नाव गांधी असे लिहिले जाऊ नये असा एक मुद्दा इथे मागच्या वर्षी एका पुस्तकाविषयी वाद झाला तेव्हा मांडला गेला होता.) वर म्हटल्याप्रमाणे मी कधीही शेरना मॅडमच्या घरी खाण्यापि...
- Get link
- X
- Other Apps
आज थोडं विषयांतर, थोडं स्मरणरंजन आणि little Narcissism..... या सहस्रकाच्या सुरुवातीला त्यावेळी नव्यानेच सुरु होणाऱ्या `टाइम्स ऑफ इंडिया'च्या पुणे आवृत्तीत रुजू झालो. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी म्हणजे डेक्कन जिमखान्यात ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीच्या (बीसीएल) च्या मागे सडाफटिंग असलेला मी राहायचो आणि त्यावेळी कॅम्पात अरोरा टॉवरमध्ये असलेल्या इंडियन एक्सप्रेसच्या कार्यालयात मी येथून जायचो. बीसीएल समोरच असलेल्या `टाइम्स ऑफ इंडिया'त लागलो तेव्हा ( लग्नानंतर ! ) थेट चिंचवडहून मी इथं यायचो. त्यावेळी टाइम्सची ही इमारत अगदी नवीकोरी होती, शिवाजीनगरच्या बैठ्या इमारतीतून कार्यालय नुकतेच स्थलांतरित झाले होते. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून पालखीची मिरवणूक आम्ही पाहायचो, संत ज्ञानेश्वरांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन इथून अगदी व्यवस्थित व्हायचे, हे आजही आठवते. तसे टाइम्सचे माझे संबध अगदी १९९१ च्या पुणे प्लस पासूनचे. पण हे सर्व डिटेल्स नंतर कधीतरी. परवा एका कामानिमित्त इथं गेलो होतो, राहवले नाही म्हणून . म. टा. च्या एका तरुण पत्रकाराला विन...
- Get link
- X
- Other Apps
मुकुंद भुते. दैनिक `केसरी'त मधुकर प्रभुदेसाई आणि प्रमोद जोग यांच्या पत्रकारितेच्या तालमीत तयार झालेला छायाचित्रकार. मी पुण्यात आलो, गोव्यात गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा जसा सक्रिय कार्यकर्ता होतो तसाच मग पुणे श्रमिक पत्रकार संघात सक्रिय झालो तेव्हा मुकुंद भुतेशी ओळख झाली. आणि तशीच ओळख कायम राहिली. पत्रकारितेत नव्या पिढीला आम्हा दोघांचं नातेसंबंध सांगताना मुकुंद हमखास नव्वदच्या दशकातील पत्रकार संघातील त्या घडामोडी आणि प्रभुदेसाई आणि प्रमोद जोग यांचं नाव घ्यायचा. काही काळानंतर टाइम्स ऑफ इंडियात मी रुजू झालो तेव्हा मुकुंद भुते माझा सहकारी होता, `टाइम्स' सोडून मी सकाळ वृत्तसमूहाच्या `महाराष्ट्र हेराल्ड'ला जॉईन झालो, तेव्हा तिथेही मुकुंद आला. महाराष्ट्र हेराल्डचे सकाळ टाइम्समध्ये रूपांतर झाले आणि कोविडकाळात या दैनिकाची शेवटची आवृत्ती निघाली तोपर्यंत म्हणजे तब्बल चौदा-पंधरा वर्षे मुकुंद आणि मी सहकारी होतो. ख्रिसमसच्या आठवड्यात दरवर्षी माझ्या घरी बातमीदार मंडळींसाठी होणाऱ्या सेलेब्रेशनला मुकुंद कधी गैरहजर नसायचा. पार्टीच्या उशिरापर्यंतच्या शेवटपर्यंत त्याची साथ असायची. कार्य...
- Get link
- X
- Other Apps
न्यूड फोटोज वाद आपल्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्या चित्रपटाचे अभिनेते आणि अभिनेत्री पुण्यातल्या 'सकाळ टाइम्स'च्या कार्यालयात येत असत. अशा मुलाखती देणे हा त्या चित्रपट कलावंतांनी चित्रपट निर्मात्यांशी केलेला कराराचा भागच असतो, हे चित्रपट कलाकार अशा मुलाखतीला सामोरे जाण्यास नकार देऊ शकत नाही हे नंतर लक्षात आले. विशेष म्हणजे सर्वच दैनिके आणि नियतकालिके अशा प्रकारच्या अरेंजड मुलाखतीसाठी काही लाख रुपयांचे पॅकेज निर्मात्यांकडून घेत असतात हे कळले तेव्हा मी आश्चर्याने तोंडात बोट घातले आणि त्याचवेळी एक पत्रकार म्हणून शरमेने मान खाली घातली होती. अशा प्रकारच्या जाहिराती सॉफ्ट बातम्यांच्या स्वरूपांत देण्याची परंपरा पुण्यात सर्वप्रथम 'टाइम्स ऑफ इंडिया' ग्रुपने म्हणजे बेनेट अँड कोलेमान वृत्तसमुहाने सुरु केली आणि हे अभिनव आर्थिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर धोरण मग इतर वृत्त समुहांनीसुद्धा लगेचच आपलेसे केले. अशा प्रकारच्या प्रायोजित मुलाखती संपादकीय विभागातील फीचर्स टीममधले सहकारी घ्यायचे. फीचर्स विभाग म्हणजे सॉफ्ट बातम्या देणारे लोक म्ह...
पगारी नोकरीतील लॉगआऊट
- Get link
- X
- Other Apps
त्या दिवशी सकाळी मुंबई-पुणे हमरस्त्यावरील पिंपरीचिंचवडच्या मोरवाडी इथल्या `सकाळ’च्या ऑफिसात जाऊन `pcamil’ या नावाने लॉग इन केले. डेस्क टॉपवर असलेला माझा वैयक्तिक मराठी आणि इंग्रजी मजकूर, लेख, वगैरे स्वतःला मेल केला, काही मजकूर आणि फोटो पेन ड्राईव्हवर सेव्ह करुन मग तिथले सर्व डिलीट केले. डेस्कमधील सगळ्या ड्रॉवर्सतील पुस्तके वगैरे बॅगांत भरल्या. त्या जवळजवळ नव्या, वातानुकूलित ऑफिसमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत, मधल्या त्या माझ्या आवडत्या टिव्हीसेटकडे, स्वतःच्या खुर्चीवरुन एकदाचे भरभरुन पाहून घेतले. पुन्हा एकदा आता कोऱ्या झालेल्या डेस्कटॉपवर अखेरची नजर टाकली आणि `pcamil’ या सकाळ माध्यमसमूहातील एका व्यक्तीला कायमसाठी लॉगआऊट केले. गेली सोळा वर्षे म्हणजे २००४च्या फेब्रुवारीपासून हा `pcamil’ सकाळच्या शनिवारवाड्याजवळच्या इमारतीत, शिवाजीनगरच्या वातानुकूलित आणि बाहेर हिरवागार परीसर असलेल्या सुंदर संकुलात, नंतर बाणेर येथे एसआयएलसीच्या हिरव्यागर्द परिसरात आणि मागील दोन वर्षांपासून पिंपरीच्या मुंबई-पुणे हमरस्त्यावरच्या ऑफिसात कार्यरत होता. खरे म्हटले तर तीन वर्षांपूर्वीच सकाळ म...
`टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन
- Get link
- X
- Other Apps
टाइम्स ऑफ इंडियाने २००० साली पुण्यात नव्यानेच स्वतंत्र आवृत्ती सुरु केल्यानंतर तेथे महाराष्ट्र पानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी `इंडियन एक्सप्रेस'मधून माझी निवड करण्यात आली होती. पत्रकारितेतील माझा मित्र अभय वैद्य आणि निवासी संपादक शेरना गांधी यांनी माझी यासाठी निवड केली होती. अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगैरे परिसरात आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पोहोचणाऱ्या या खास म्हाफुसिल आवृत्तीतील महाराष्ट्र पान असलेल्या पान दोनला सर्व मजकूर पुरवण्याची माझी जबाबदारी होती. टाइम्स ऑफ इंडिया'च्या जुळ्या भावंडाच्या म्हणजे `महाराष्ट्र टाइम्स'च्या पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बातमीदारांनी फॅक्सवर पाठवलेल्या मराठी बातम्यांचे मी भाषांतर करुन आणि वृत्तसंस्थांच्या बातम्यांनी हे पूर्ण पान भरले जायचे. सांगलीचे रविंद्र दफतरदार, कोल्हापुरचे प्रभाकर कुलकर्णी, सोलापूरचे रजनीश जोशी आणि शिर्डीचे ताराचंद म्हस्के यांच्याकडून रोज बातम्यांचा रतीब यायचा. अधूनमधून मी स्वतंत्र म्हणजे माझ्या बायलाईनच्या बातम्याही लिहित असायचो. तर त्यादिवशी मी माझा एक मजकूर न्यू...
पत्रकारितेचा श्रीगणेशा
- Get link
- X
- Other Apps
सर, आर यु एम्प्टी नाऊ ?" माझ्या या प्रश्नावर गोव्यातील मिरामारच्या धेम्पे कॉलेजमधील त्या स्टाफ रुममध्ये एकदम शांतता पसरली. एकदोन महिला शिक्षकांनी टेबलावरील आपली पुस्तके उचलून ताबडतोब दाराकडे वाटचाल केली. बाकीच्यांनी आपसातील संभाषण थांबवून क्षणभर माझ्याकडे रोखून पाहून लगेचच माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे दाखवत समोरचे वृत्तपत्र चाळण्यास सुरुवात केली. ज्यांना मी हा प्रश्न विचारला ते प्राध्यापक अफ़ॉन्सो तसे ज्येष्ठ शिक्षक असल्याने स्टाफ रूममधील कुणीही या प्रश्नावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले होते. प्राध्यापक अफ़ॉन्सो यांनी मात्र प्रसंगावधान राखत त्यांना मी विचारलेला हा अवघड प्रश्न अगदी कुशलतेने हाताळला होता. ''यस जॉन, आय एम फ्री नाऊ... टेल मी, व्हाट डू यु वॉन्ट ?" त्यांनी लगेचच मला प्रतिसाद दिला होता. त्यांच्या त्या उत्तराने कॉलेजच्या त्या स्टाफ रुममध्ये माझ्या प्रश्नानंतर एकदम सन्नाटा का पसरला होता हे मला लगेच कळाले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या स्टाफ रुममधील उपप्राचार्य आणि रसायनशास्त्राचे विभागप्रमुख साखरदांडे सर, इंग्रजीच्या शिक...