Posts

Showing posts with the label Christianity
Image
  "माणुसकी हाच धर्म' मुसलमान आणि ख्रिस्ती लोकांचा वर्षातील पवित्र मानला जाणारा उपवासकाळ सद्या चालू आहे. ख्रिस्ती लोकांचे कॅलेंडर ग्रेगरियन म्हणजे सौरवर्षीय आहे तर मुस्लीम धर्मियांचे कॅलेंडर चांद्रवर्षीय असते. त्यामुळे ख्रिस्तीजनांचा लेन्ट सिझन किंवा उपवासकाळ नेहेमीच फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला सुरु होतो आणि सुमारे चाळीस दिवसानंतर एप्रिलमध्ये गुड फ्रायडे या सणाने संपतो. तर मुस्लिमांचा रमझान महिना ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये वर्षभर कधीही असू शकतो. कुठल्याही धर्मात उपवासाच्या पवित्र काळात जे करावयाचे असते ते या काळात मुसलमान आणि ख्रिस्ती लोकसुद्धा करतात. उपवास धरतात, प्रार्थना करतात आणि त्यांनी याकाळात दानधर्म आणि इतर सत्कार्य करावे अशीही अपेक्षा असते. तर पुण्यातील रास्ता पेठेत राहणाऱ्या जावेद खान आणि मायकल साठे या दोघांनी त्यांच्या भिन्न धर्मांच्या या चालू पवित्र काळात एक वेगळ्या प्रकारचे पुण्यकर्म केले. त्यांच्या इमारतीशेजारी असलेल्या सुधीर किंकळे ( वय ७० वर्षे) नावाच्या माणसाचे निधन झाले, तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी एका बहिणीशिवाय इतर कुणीही ह...
Image
एके काळी भारतात आणि जगातील अनेक भागांत ख्रिस्ती धर्मगुरु आणि नन्स विविध क्षेत्रांत सेवाभावी वृत्तीने कार्यरत होते. अव्वल ब्रिटिश अमदानीत तर देशातील अनेक समाजसुधारकांनी ख्रिस्ती मिशनरी लोकांनी सुरु केलेल्या शाळांत शिक्षण घेतले. पुण्यात स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत शिकलेले जोतिबा फुले हे त्यापैकी एक प्रमुख नाव. एक काळ असा होता की समाजातील अनेक क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींनी ख्रिस्ती शाळांत आणि कॉलेजात शिक्षण घेतलेले असायचे. कारण त्यावेळेस भारतात सरकारी शाळानंतर सर्वाधिक मोठ्या संख्येने चालवल्या जाणाऱ्या शाळा ख्रिस्ती संस्थांच्या असत. त्याशिवाय शहरांत आणि ग्रामीण भागांत अनेक छोटेमोठे दवाखाने ख्रिस्ती मिशनरी चालवत असत. येथे आजारी लोकांना नाममात्र खर्चात आरोग्य सेवा मिळायची. त्या काळात शिक्षण क्षेत्रांचे आणि आरोग्य सेवांचे आजच्यासारखे बाजारीकरण किंवा खासगीकरण झालेले नव्हते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील संत लूक इस्पितळ किंवा शेवगाव येथील नित्य सेवा हॉस्पिटल ही काही वानगीदाखल नावे. या शाळांचा किंवा दवाखान्याचा धर्मांतरासाठी वापर केला जातो असा सर्रा...
Image
जातीव्यवस्था आणि चातुर्वर्ण्य हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत, केवळ हिंदू धर्माचीच ती मक्तेदारी नाही… हे खरं नाही! पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे चरणजित सिंग छन्नी, बुटासिंग, बाबा पद्मनजी, रॉबर्ट डी नोबिली, पंडिता रमाबाई, ना. वा. टिळक, अमरिंदर सिंग आणि फादर फ्रान्सिस दीब्रिटो Tue , 12 October 2021 पंजाब Punjab चरणजित सिंग छन्नी Charanjit Singh Channi दलित Dalit ना. वा. टिळक Narayan Waman Tilak अमरिंदर सिंग Amarinder Singh बुटासिंग Buta Singh बाबा पद्मनजी Baba Padamji रॉबर्ट डी नोबिली पंडिता रमाबाई Pandita Ramabai फादर फ्रान्सिस दीब्रिटो Father Francis Dibrito काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये सत्ताबदल झाला. दुसऱ्या दिवशी बहुतेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवरचा मथळा पुढील आशयाचा होता – ‘पंजाबमध्ये पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री’. काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची उचलबांगडी होऊन चरणजित सिंग चन्नी यांची त्या जागी निवड करण्यात आली होती. वस्तुतः कॅप्टन अमरिंदर सिंग आणि चन्नी दोघंही धर्मानं शीख. १९५६ साली पंजाबची निर्मिती झाल्यापासून या राज्यात आतापर्यंत एकदाही बिगर-शी...

‘घरवापसी’ आणि ‘लव जिहाद’च्या गोष्टी... पण वेगळ्या प्रकारच्या

‘घरवापसी’ आणि ‘लव जिहाद’च्या गोष्टी... पण वेगळ्या प्रकारच्या पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे ‘घोगरगावचे जाकियरबाबा - मराठवाड्यातील ख्रिस्ती मिशन कार्य : इ  स. १८९२ पासून’ या माझ्या पुस्तकात आतील पानावर एक रंगीत छायाचित्र आहे. मराठवाड्यात विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यात ख्रिस्ती धर्माचा पाया रचणारे फ्रेंच फादर गुरियन जाकियर यांच्या कार्यावर आणि पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या ख्रिस्ती समाजाविषयीचं हे पुस्तक आहे. ‘घोगरगावातील एक ख्रिस्ती कुटुंब’ असं त्या छायाचित्राखाली लिहिलेलं आहे. त्यात नऊवारी पातळ घातलेली माझी आई, मार्थाबाई आपला भाचा, नाथू शिनगारे आणि त्याची बायको-मुलं-नातवंडं आणि माझ्या एका पुतणीबरोबर आहे. आम्ही श्रीरामपूरला परतताना नाथुने स्वतः जमिनीतून भराभरा उपटून हरभऱ्याच्या टहाळीचा वानवळा आम्हाला दिला होता, तेव्हा त्याच्या हिरव्यागार शेतात मी ते छायाचित्र काढलं होतं.   फ्रान्समधून १८९२ साली येऊन औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात घोगरगाव येथे ग्रामीण लोकांच्या सेवेत स्वतःला वाहून, ५० वर्षांच्या काळात शेकडो लोकांना बाप्तिस्मा देणारे जाकियरबाबा आज संत मानले जा...

भव्य दिव्य सेंट पिटर स्क्वेअर

Image
  भव्य दिव्य सेंट पिटर स्क्वेअर   को वाडीस? बायबलमध्ये एक कथा आहे. येशू ख्रिस्त आपल्या खांद्यावर क्रूस घेऊन जातो आहे आणि त्यावेळेस आपल्या   होणाऱ्या छळापासून   सुटका घेण्यासाठी रोममधून पळ काढणाऱ्या सेंट पिटरची   त्याची गाठ पडते. रोमकडे निघालेल्या आपल्या प्रभूला पाहून पिटर थक्क होतो. ''दोमिनी,   को वाडीस ?''   'प्रभूं, तू कुठे चाललास ? असे तो विचारतो. ''मी पुन्हा एकदा क्रुसावर मरायला निघालो आहे!''   येशू आपल्या सर्वात लाडक्या शिष्याला सांगतो आणि सेंट पिटरला आपली चूक समजते. येशू ख्रिस्ता च्या  अनुयायांची रोममध्ये होणाऱ्या छळाची पर्वा न करता तो माघारी वळतो आणि रोमन साम्राज्याच्या या राजधानीत तो हौतात्म्य कवटाळतो.  लॅटिन   भाषेतील 'को वाडीस'   (कुठे निघालास?) हा वाक्प्रचार त्यातील गर्भित आशयामुळे अनेक भाषांत रुढ झाला आहे. (बायबलमधील जुना   करार हिब्रू भाषेत तर नवा करार ग्रीक भाषेत आहे. नंतरच्या काळात बायबलची आणि चर्चची अधिकृत भाषा लॅटिन बनली.) सेंट पिटरने आणि इतर अनेक ख्रिस्ती लोकांनी रोममध्ये हौतात्म्य   स्वीकारल...