Posts

Showing posts with the label Baba Adhav
Image
महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारसरणी   देशात आणि राज्यात आज काहीही परिस्थिती असली तरी महाराष्ट्रात आजही महात्मा फुले, शा\'हू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रागतिक वारसा चालू आहे याचा प्रत्यय काल आला. महाराष्ट्रात वर्षांतून अनेक शहरांत काही ठराविक दिवशी प्रागतिक विचारसरणीच्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते, त्यापैकी एक दिवस म्हणजे सहा डिसेंबर काल होता. कोरोना काळात मोठा खंड पडल्यानंतर काल पहिल्यांदाच पुन्हा एकदा या पुस्तक महोत्सवात गेलो आणि खूप बरं वाटलं. महाराष्ट्र देशी वेळोवेळी होणाऱ्या विविध राज्यस्तरीय, प्रादेशिक आणि इतर साहित्य संमेलनात भरपूर पुस्तक विक्री होते. पण केवळ महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारसरणीला वाहिलेल्या ग्रंथाची आणि पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते ती ठिकाणे आणि दिवस विशिष्ट आहेत. हे दिवस म्हणजे एप्रिल बाबासाहेबांची १४ एप्रिलची जयंती, दसरा किंवा नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचे आपल्या अनुयायांबरोबर नागपूरला दीक्षाभूमीवर झालेले धर्मांतर, आणि सहा डिसें...
Image
 पुण्याने राष्ट्रपातळीवर केलेले  नेतृत्व  पुण्यात इंडियन एक्सप्रेसला मी १९८९ ला जॉईन झालो तेव्हा पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या एका वादळी चर्चेला मी हजर होतो. विषय होता एरंडवणे परिसरातल्या सर्व्हे नंबर ४४ मध्ये टेकडीवर बांधकामास परवानगी देण्याबाबत. या प्रस्तावाला विरोध करत सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्याच नगरसेविका वंदना चव्हाण यांनी अत्यंत आक्रमकतेतेने हा विषय लावून धरला होता.  इंडियन एक्सप्रेसचे पुणे निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांच्यासह आम्ही इतर काही बातमीदार या सभेला उपस्थित असण्याचे कारण म्हणजे इंडियन एक्सप्रेस फोरमने हा पर्यावरणाचा विषय हाती घेतला होता. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजर राहण्याची ही माझी पहिली आणि एकमेव वेळ.  राज्यपातळीवर, देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या स्थानिक संस्थेच्या सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कारभाऱ्यांनी नेतृत्व केले आहे हे नंतर माझ्या लक्षात आले.  डॉ मं पा मंगुडकर यांनी पुणे महापालिकेच्या शंभराव्या वर्धापनानिमित्त संपादित केलेल्या स्मरणिकेत या संस्थेच्या आणि पुणे शहराच्या इतिहासाचा मागोवा घेतला ...
Image
मुस्लीम समाजासाठी मोलाचे योगदान देणारे सय्यदभाई तीन वर्षांपूर्वी नरेन्द्र मोदी सरकारने पुण्यातले सय्यदभाई यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला तेव्हा अनेकांच्या - अगदी पत्रकारांच्या- सुध्दा भुवया उंचावल्या गेल्या होत्या. कोण हे सय्यदभाई? असाच त्यापैकी अनेकांचा प्रश्न होता. त्यापूर्वी कितीतरी वर्षे पुण्यातल्या सामाजिक वर्तुळात आणि त्यामुळे प्रसारमाध्यमांतही हे नाव झळकत नव्हते. जुन्या पिढीतल्या लोकांना आणि माझ्यासारख्या काही पत्रकारांना मात्र सय्यदभाई हे नाव आणि हे व्यक्तिमत्त्व चांगलेच परिचित होते. सय्यदभाईचे पुण्यात ८ एप्रिल २०२२ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मुस्लीम समाजासाठी मोलाचे योगदान देणारे सय्यदभाई हे समाजवादी नेते डॉ बाबा आढाव, दाऊदी बोहरा समाजाचे कार्यकर्ते ताहेर पुनावाला आणि भाई वैद्य यांच्या बरोबरीने काम करणारे कार्यकर्ते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या निधनानंतर या सामाजिक संघटनेची झुल समर्थपणे सांभाळणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमध्ये सय्यदभाई यांचा समावेश होता. सय्यदभाई महाराष्ट्रात आणि देशातही एकदम प्रकाशझोतात आले ते पंतप्रधान राजीव गांधी...