पंतप्रधान पंडित नेहरु यांनी १९ डिसेंबर १९६१ला भारतीय फौजा पाठवून गोवा, दमण आणि दिवची पोर्तुगीज सत्तेतून मुक्तता केली. तेव्हापासुन हा प्रदेश भारतीय संघराज्यात सामिल झाला.
ऐंशीच्या दशकात कोकणी भाषेचा भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्ठात समावेश करण्यात आला. अशाप्रकारे एक स्वतंत्र भाषा म्हणून कोकणी भाषेला मान्यता मिळाली.
त्यानंतर कोकणी भाषेला गोव्याची अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता मिळाली. सन १९८७ ला गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला.
कोकणी भाषेत हा पुरस्कार मिळवणारे दामोदर मावजो हे दुसरे साहित्यिक. याआधी रविंद्र केळेकार यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला होता.
कोकणी भाषा देवनागरी, रोमन तसेच कन्नड़ लिपित लिहिली जाते. गोव्यातील ख्रिस्ती समाज रोमन लिपिचा वापर करतो तर कर्नाटकातील किनारपट्टीवर कन्नड लिपित लिहितात. सरकारी पुरस्कारसाठी मात्र देवनागरी लिपितील कोकणी साहित्याचाच विचार होती.
मराठी भाषेतल्या चार साहित्यिकांना आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. वि. स. खांडेकर, वि. वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे हे ते ज्ञानपीठ सन्मान मिळवणारे साहित्यिक
Comments
Post a Comment