Posts

बोलावणे मिशनरीसेवा व्रताचे आणि पत्रकारीतेचे

Image
          विशेष लेख   बोलावणे मिशनरीसेवा व्रताचे आणि पत्रकारीतेचे   July 20, 2019     lokmarathi  Camil parkhe ,  Journalism कामिल पारखे रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्वशैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना ‘जय ख्रिस्त’ म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी बोलू लागले. बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, ”पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?” माझ्या वडिलांचे श्रीरामपुरात मुख्य बाजारपेठेत सोनार लेनमध्ये टेलरिंगचे दुकान होते. शहरातील दोन-तीन प्रसिद्ध टेलरिंगच्या दु...

भारतीय ठशातील ख्रिस्ती कला

  भिन्न धर्मपरंपरा आणि संस्कृती असलेल्या लोकांचा परस्परांशी संबंध आला कि या संबंधातून नकळत एकमेकांच्या धार्मिक मूल्यांची आणि सांस्कृतिक ठेव्यांची देवाणघेवाण होते. मध्ययुगीन काळात ख्रिस्ती धर्मपरंपरेतील कलेचे भारतात आगमन झाले. तेव्हा असाच प्रकार घडला. खास युरोपियन ठसा असलेल्या ख्रिस्ती धर्मपरंपरातील कला आणि भारतीय कला यांचा या वेळेस सुंदर मिलाप घडला आणि त्यातून जन्मास आली भारतीय ठशातील ख्रिस्ती कला. ख्रिस्ती धर्माचा उगम इस्राएल राष्ट्रात झाला व त्यामुळे हा धर्म मूळचा आशिया खंडातलाच. पण मध्ययुगीन काळापूर्वीच यूरोपातील सर्व राष्ट्रांत या धर्माचा खूप प्रचार झाला व भारतात हा धर्म मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला तो युरोपिअन   मिशनरींमार्फतच . त्यामुळे ख्रिस्ती धर्म म्हटलं की   तो पाश्चिमात्य संस्कृतीत घडलेला अशीच बहुतेकांची समजूत असते. युरोपियनांनी हा धर्म भारतात आणला. त्याबरोबरच त्यांनी आपापल्या देशातील परंपरेत वाढलेली कलादेखील येथे आणली. या पाश्चिमात्य कलेचा स्थानिक कलापरंपरेशी संबंध आल्यानंतर परस्पर प्रभावातून उगम पावलेल्या भारतीय ख्रिस्ती कलेची मुळे भारताच्या संपन्न विवि...

नावात काय नाही?

                   कामिल पारखे हे माझे नाव ऐकून अशा अनेक व्यक्तींची उत्सुकता चाळवली गेल्याचे मी अनेकदा अनुभवतो. या नावाचा अर्थ काय येथपासून मग  प्राथमिक चौकशी सुरू होते. प्रत्येक नावामागे , आडनावामागे विशिष्ट भौगोलिक , सामाजिक , सांस्कृतिक आणि  धार्मिक  संदर्भ असतो आणि तो जाणून घेण्याच्या उत्सुकतेने विचारलेल्या या  प्रश्‍नाला मला नेहेमीच सामोरे जावे लागते. मात्र ही सर्व पूर्वपिठिका सांगण्याच्या मूडमध्ये  मी प्रत्येकवेळी असतोच असे नाही.  त्यामुळे आमच्याकडे मराठी ख्रिस्ती कुटुंबात त्याकाळी असलेल्या प्रथेप्रमाणे मला ये नाव मिळाले हा सारा इतिहास अशावेळी सांगत बसणे प्रत्येक वेळी शक्य नसते. अशावेळी समोरची व्यक्ती कोण आहे आणि अशा चर्चेसाठी त्याप्रसंगी माझ्याकडे किती वेळ आहे हे पाहून मग मी प्रत्येक वेळ निभावून घेत असतो.                 गोव्यात बारा वर्षे स्थायिक असतांना मला माझ्या   ’कामिल’ या नावामुळे कधीच अवघडल्यासारखे झाले नाही कारण...