गेली काही दिवस कर्मधर्मसंयोगाने डेक्कन जिमखाना पुन्हा एकदा माझ्या नेहेमीच्या वहिवाटीचा परिसर बनला आहे.

या जागी मी आलो, इथलाच रहिवासी झालो ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी, ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस.
इंडियन एक्सप्रेसला रुजू झाल्यावर इथेच ब्रिटिश कौंसिल लायब्ररीच्या (बीसीएल) च्या मागे मंथली कॉट बेसिसवर चार वर्षे राहिलो
तेव्हा हॉटेल गुडलक जिवाभावाचे स्थळ बनले होते.
काही महिन्यांपूर्वी वाचले होते कि हॉटेल गुडलकच्या इमारतीचे रिनोव्हेशन होणार असल्याने हे हॉटेल काही काळ बंद राहणार आहे.
काल संघ्याकाळीच इथे गेलो तिथली आत बाहेरची नेहेमीची वर्दळ पाहिली तेव्हा ही घटिका आता इतकी जवळ आली अशी पुसटशी शंकाही मनात नव्हती.
आज दुपारी आम्ही दोघेही इथे जात होते आणि गुडलक बंद दिसले आणि मनात चर्रर्र झाले.
पण दारापाशी काहीच लिहिलेले नव्हते,
थोड्या वेळाने परत तिथे आलो तेव्हा ती सूचना चारपाच ठिकाणी लिहिलेली दिसली.
रिनोव्हेशनसाठी बंद आहे म्हणून.

आता कळते कि अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे हे हॉटेल तात्पुरते बंद करण्यात आले आहे
आता हॉटेल गुडलकच्या अनेक ठिकाणी शाखा उघडल्या आहेत,
तिथे गेल्यावर या मूळ हॉटेलची आठवण येतेच.
चार दशकांपूर्वी गोव्यातून येऊन मी इथे स्थायिक झालो तेव्हा अनुभवलेला डेक्कन जिमखाना आता राहिलेला नाही.
कॅफे गुडलक Since 1935
इथला आणखी एक मोठा लँडमार्क लवकरच बदलला जाणार आहे.
मग लगेच पटापटा काही फोटो काढून घेतले.
Camil Parkhe, July 12, 2025

Comments

Popular posts from this blog

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime