`ज्ञानोदय' मासिकात सिंथिया फरारबाईंच्या निधनाचे आणि अंत्यविधीचे १ फेब्रुवारी १८६२ च्या अंकात छापलेले वृत्त

मागच्याच आठवड्यात १६ ऑकटोबर २०२६ रोजी अभिजित एकनाथ वाघ, भैरवनाथ वाकळे आणि असिफ खान दुलेखान यांनी अहिल्यानगर येथील सेंट झेव्हियर्स कॅथेड्रल आणि ख्राईस्ट चर्च यांच्या बुऱ्हाणनगर रस्त्यावरील दफनभूमीतली फरारबाईंची चिरनिद्रेची जागा शोधून काढली.
अहिल्यानगर येथील पास्टर विक्रांत लोंढे यांनी अहमदनगर कॉलेजच्या ग्रंथालयातील `ज्ञानोदय' मासिकाच्या अर्काईव्हमधून फरारबाईंच्या निधनाचे आणि अंत्यविधीचे १ फेब्रुवारी १८६२ च्या अंकात छापून आलेले मूळ इंग्रजीतील आणि मराठी भाषांतर शोधून काढले आहे.
हा दुर्मिळ दस्तऐवज मिळवल्याबद्दल आणि त्याद्वारे पर्यायाने सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांचे चरित्र अधिक परिपूर्ण बनवण्यात मदत केल्याबद्दल पाळक विक्रांत लोंढे यांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार
येथे तूर्त फक्त मराठी भाषांतर देत आहे.
Camil Parkhe October 22, 2026

०फे. ता. ० १ सन १८६२ `ज्ञानोदय पान ४१ आणि ४२

फरार मडम साहेबांचे मरण

शनवार तारीख २५ माहे ज्यानुएरी रोजी प्रातःकाळी अहमदनगर एथील अमेरिकन मिशनांतील फरार मडम साहेब इला देवाने पृथ्वीवरील श्रमांपासून आकाशांतील विसाव्यांत नेले.
३४ वषीमार्गे ह्मणजे सन १८२७च्या दिसेंवर महिन्यांत ती प्रथमतः मुंबईस आली, आणि लागलीच या शहरांत हिंदूंच्या मुलीस विद्या शिकविण्याच्या कामांत श्रम करूं लागली.
तिच्या हाताखाली पुष्कळ शाळा होत्या, त्या स्वतां जाऊन पाहण्याविषयी व मुलींत शिकविण्याविषयी तिने पराकाष्ठचे श्रम केले; आणि या कामांत तिला एथे राहणाऱ्या इंग्लिश लोकानी उत्तेजन व द्रव्याश्रय दिल्हा, त्यावरून तिला फार हर्ष वाटला.
एथील परोपकारी आर्च दिकन कार साहेब (जे पुढे एथील लार्ड विशप झाले) त्यानी, व मेहेरबान जे. फारिश साहेब जे पुढे सर राबट ग्रांत साहेब मरण पावल्यावर मुंबईचे गवर्णर झाले त्यानी, व दुसन्या कित्येक परोपकारी साहेबानी व मडमीनी फरार मडम साहेवांच्या योजना व श्रम पसंत करून तिच्या कामास पष्कळ आश्रय दिल्हा.
तिचे काम इतके कठीण होते कां, त्यावरून तिची शरीरप्रकृति बिघडली,आणि ह्मणून प्रकृति नीट व्हावी यासाठी सन १८३६-३७ च्या हिवाळ्पांत ती मुंबईहून अमेरिकेस गेली.
ती सन १८३९ मध्ये परत आली, आणि लागलीच अहमदनगरास गेली; आणि तेथे तेंच काम करूं लागली, आणि दुखण्यावरून थोडा अटकाव झाला त्याशिवाय दुसरा कांही अटकाव न होतां तिने मरेपर्यंत त्या कामांत श्रम केले.
तिने शेकडों हिंदु मुलींस शिकविले, आणि तिच्या हातून शिकलेल्या मुलींपैकी कित्येक जणी अशा योग्यतेस चढल्या की, त्या फार उपयोगी झाल्या आणि स्त्रीशिक्षणाविषयीचे तिचे हे उद्योग पाहून नेटिव लोकानी पुणे व अहमदनगर एथे मुलींस शिकविण्यासाठी शाळा स्थापिल्या.
जेव्हां मरणाकडून तिच्या या श्रमांचा अंत झाला आणि ती आकाशांत विसावा व फळ पावण्यास गेली, तेव्हां तिचे वय सुमारे सत्तर वर्षींचे होत आले होते, मरणापूर्वी ती कित्येक महिने आजारी होती परंतु मरण जवळ आले तोवर तिला फारसे शरिरीक दुःख नव्हते.
पुढे ३६ तासानी किंवा १२ प्रहरानी मृत्यु येणार तेव्हांपासून मात्र तिला फार दुःख सोसावे लागले, तरी त्यांत देखील ती शुद्धीवर होती, आणि तिचा सर्व विश्वास तिचा तारणारा जो प्रभु येशू ख्रीस्त त्यावर होता.
तो माझा अंगिकार करील याविषयीं तिला कांहीं संशय नव्हता, आणि मरण हे वर माझ्या बापाच्या घरांत जाण्याचा दरवाजा आहे असे तिला वाटत होतें.
तिच्या उत्तरक्रियेच्या वेळेस पुष्कळ बाया जमल्या होत्या. आणि तिच्या मरणावरून त्यांस फार दुःख झाले असे दिसून आले.
त्या बायानी समजावे की, जी त्यांच्या कल्याणासाठी शक्ति आणि बळ खर्चिण्यासाठी सर्वदां सिद्ध असे असी मैत्रीण मरण पावली.
तिच्या मरणावरून पुष्कळ बाया ह्मणोत की "म्या प्रमाणिकांच्या मरणासारिखे मरावे व त्यांच्या सारिखा माझा परिणाम व्हावा. ''

(बायबलच्या जुन्या करारातील) `गणना' (अध्याय) २३:१०..


Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction