आज थोडं विषयांतर, थोडं स्मरणरंजन आणि little Narcissism..... या सहस्रकाच्या सुरुवातीला त्यावेळी नव्यानेच सुरु होणाऱ्या `टाइम्स ऑफ इंडिया'च्या पुणे आवृत्तीत रुजू झालो. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी म्हणजे डेक्कन जिमखान्यात ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीच्या (बीसीएल) च्या मागे सडाफटिंग असलेला मी राहायचो आणि त्यावेळी कॅम्पात अरोरा टॉवरमध्ये असलेल्या इंडियन एक्सप्रेसच्या कार्यालयात मी येथून जायचो. बीसीएल समोरच असलेल्या `टाइम्स ऑफ इंडिया'त लागलो तेव्हा ( लग्नानंतर ! ) थेट चिंचवडहून मी इथं यायचो. त्यावेळी टाइम्सची ही इमारत अगदी नवीकोरी होती, शिवाजीनगरच्या बैठ्या इमारतीतून कार्यालय नुकतेच स्थलांतरित झाले होते. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून पालखीची मिरवणूक आम्ही पाहायचो, संत ज्ञानेश्वरांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन इथून अगदी व्यवस्थित व्हायचे, हे आजही आठवते. तसे टाइम्सचे माझे संबध अगदी १९९१ च्या पुणे प्लस पासूनचे. पण हे सर्व डिटेल्स नंतर कधीतरी. परवा एका कामानिमित्त इथं गेलो होतो, राहवले नाही म्हणून . म. टा. च्या एका तरुण पत्रकाराला विन...
Posts
- Get link
- X
- Other Apps
. मराठी पुस्तकां चा खप - आचार्य अत्रे यांना १९६६ साली `नोबेल' पारितोषिक मिळाले. मराठी साहित्यिकाला नोबेल पारितोषक मिळेल, तेव्हा मिळेल, पण आता त्याबाबत जनमताची चुणूक जाणून घ्यावी म्हणून `ललित' मासिकाने वाचकांचा प्रतिसाद मागवला तेव्हा प्रल्हाद केशव अत्रे यांना प्रथम क्रमांकाची मते मिळाली. पु. ल. देशपांडे आणि वि. स. खांडेकर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. `ललित' मासिकाच्या वतीने जयवंत दळवी आणि इतरांनी हा बिनपैशाचा नोबेल पुरस्कार अत्रे यांना दिला तेव्हा अत्रे त्यांच्या स्वभावानुसार याबाबत जाम खुशीत होते. दळवी लिहितात कि ``उत्साहाच्या भरात अत्रे यांनी आम्हाला दहाबारा दिवस पुरतील, एव्हढे खाद्यपदार्थ मागवले होते'' ( विषय अत्रे यांच्या संदर्भात असल्याने ही बहुधा जयवंत दळवी यांची अतिशयोक्ती असावी असं मला वाटतं ) यावेळी अत्रे यांची दीर्घ मुलाखत घ्यावी असं जयवंत दळवी यांना वाटलं पण तसा योग दोनतीन वर्षे आला नाही. अन एक दिवस म्हणजे १२ जून १९६९ला प्रकाशक ग. पां. परचुरे यांचा दळवी यांना फोन आला : ``आता साहेबांची आशा नाही'' असं म्हणून फोनवरची व्यक्ती हमसाहमशी रडू...
- Get link
- X
- Other Apps
महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारसरणी देशात आणि राज्यात आज काहीही परिस्थिती असली तरी महाराष्ट्रात आजही महात्मा फुले, शा\'हू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रागतिक वारसा चालू आहे याचा प्रत्यय काल आला. महाराष्ट्रात वर्षांतून अनेक शहरांत काही ठराविक दिवशी प्रागतिक विचारसरणीच्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते, त्यापैकी एक दिवस म्हणजे सहा डिसेंबर काल होता. कोरोना काळात मोठा खंड पडल्यानंतर काल पहिल्यांदाच पुन्हा एकदा या पुस्तक महोत्सवात गेलो आणि खूप बरं वाटलं. महाराष्ट्र देशी वेळोवेळी होणाऱ्या विविध राज्यस्तरीय, प्रादेशिक आणि इतर साहित्य संमेलनात भरपूर पुस्तक विक्री होते. पण केवळ महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारसरणीला वाहिलेल्या ग्रंथाची आणि पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते ती ठिकाणे आणि दिवस विशिष्ट आहेत. हे दिवस म्हणजे एप्रिल बाबासाहेबांची १४ एप्रिलची जयंती, दसरा किंवा नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचे आपल्या अनुयायांबरोबर नागपूरला दीक्षाभूमीवर झालेले धर्मांतर, आणि सहा डिसें...
- Get link
- X
- Other Apps
मुकुंद भुते. दैनिक `केसरी'त मधुकर प्रभुदेसाई आणि प्रमोद जोग यांच्या पत्रकारितेच्या तालमीत तयार झालेला छायाचित्रकार. मी पुण्यात आलो, गोव्यात गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा जसा सक्रिय कार्यकर्ता होतो तसाच मग पुणे श्रमिक पत्रकार संघात सक्रिय झालो तेव्हा मुकुंद भुतेशी ओळख झाली. आणि तशीच ओळख कायम राहिली. पत्रकारितेत नव्या पिढीला आम्हा दोघांचं नातेसंबंध सांगताना मुकुंद हमखास नव्वदच्या दशकातील पत्रकार संघातील त्या घडामोडी आणि प्रभुदेसाई आणि प्रमोद जोग यांचं नाव घ्यायचा. काही काळानंतर टाइम्स ऑफ इंडियात मी रुजू झालो तेव्हा मुकुंद भुते माझा सहकारी होता, `टाइम्स' सोडून मी सकाळ वृत्तसमूहाच्या `महाराष्ट्र हेराल्ड'ला जॉईन झालो, तेव्हा तिथेही मुकुंद आला. महाराष्ट्र हेराल्डचे सकाळ टाइम्समध्ये रूपांतर झाले आणि कोविडकाळात या दैनिकाची शेवटची आवृत्ती निघाली तोपर्यंत म्हणजे तब्बल चौदा-पंधरा वर्षे मुकुंद आणि मी सहकारी होतो. ख्रिसमसच्या आठवड्यात दरवर्षी माझ्या घरी बातमीदार मंडळींसाठी होणाऱ्या सेलेब्रेशनला मुकुंद कधी गैरहजर नसायचा. पार्टीच्या उशिरापर्यंतच्या शेवटपर्यंत त्याची साथ असायची. कार्य...
- Get link
- X
- Other Apps
एकमेव प्रवेशद्वार पाटो ब्रिज गोव्याची राजधानी पणजी येथे चारशे-पाचशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या काही वास्तू आणि इतर बांधकाम आहेत. पोर्तुगीज राजवटीची पहिली राजधानी असलेल्या ओल्ड गोवा येथे तर त्याहून अधिक जुनेपुराणे बांधकामे आहेत. पोर्तुगिजांनीं आपली राजधानी नोवे गोवा किंवा पणजी येथे १८४३ या साली हलवली आणि त्यानंतर इथला आधीच असलेला आदिलशाहचा राजवाडा मग पोर्तुगीज इंडियाचे मुख्यालय बनला. त्यानंतर या पणजी येथे पोर्तुगीजांनी पाश्चात्य धर्तीच्या अनेक इमारती बांधल्या, पोर्तुगीज राजवटीच्या वेगवेगळ्या खात्यांची आणि संस्थांची कामकाज या इमारतींतून चालायचे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतीय लष्कर पाठवून गोवा, दमण आणि दीव पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केला आणि मग पोर्तुगीजकालीन या इमारती विविध सरकारी खात्यांची, लष्करी विभागांची कार्यालये बनल्या. मांडवीच्या तिरावरचे आदिलशाह पॅलेस अनेक वर्षे गोवा, दमण आणि दिवचें सचिवालय आणि विधानसभा भवन होते. पणजी येथे फॉन्टइनेस, कंपाल आणि अल्तिन्हो येथे सहज एक फेरफटका मारला तर पोर्तुगीजकालीन तीनशे-चारशे वर्षे जुनी असलेल्या आणि आजही अगदी सुस्थितीत अ...
- Get link
- X
- Other Apps
पोप फ्रान्सिस सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत आणि जगभरातील नियतकालिके त्यांच्या या दौऱ्यावर लक्ष ठेऊन आहेत. जगभर धर्म आणि शासन यांची फारकत होत असताना आजही कॅथोलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु असलेल्या पोपमहाशयांना आजही महत्त्व दिले जाते हे मान्य करावेच लागेल. पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याहून लहान असलेल्या आणि सातशे नागरिक असलेल्या व्हॅटिकन सिटीला आज एक सार्वभौम देश म्हणून मान्यता आहे आणि या देशाचे पोप राष्ट्रप्रमुख आहेत. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर असताना मुद्दाम व्हॅटिकन सिटीला गेले आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारत भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले आहे. गेली काही दशके तीन पदांवरील व्यक्तींविषयीं जगातील अनेक लोकांमध्ये अपार कुतूहल असते. या तीन पदांवरील व्यक्ती वर्षभर या ना त्या कारणाने, निमित्ताने जगभरातील प्रसार माध्यमांत सतत झळकत असतात. या तीन व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या आणि रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख पोप. पोप हे ख्रिस्तमंडळाचे म्हणजे कॅथोलिक चर्चचे प्रमुख, येशू ख्र...
- Get link
- X
- Other Apps
निवडणूक चिन्हे टी एन शेषन निवडणूक आयुक्त होण्याआधीची ही गोष्ट आहे. काळ साधारणतः सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीचा. श्रीरामपुरात काही मोक्याच्या जागी आणि रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या घरांच्या भिंतींवर आणि इतर बांधकामांवर पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर काही चिन्हे आणि घोषणा लिहिलेल्या असायच्या. त्यापैकी एक बैलजोडी असायची, गायवासरू असायचे, शहरी भागांत मिणमिणता दिवा असायचा. अनेक चित्रांत लाल रंगातलं विळा-कणीस हें चिन्ह असायचं, काही ठिकाणी विळा आणि हातोडा हे चिन्ह असायचं. देशातल्या लोकसभा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत रंगवलेल्या या चित्रांवर विविध पक्षांची ही निवडणूक चिन्हे, पक्षांची आणि उमेदवारांची नावे असायची. तर यापैकी बैलजोडी हे चिन्ह होतं मोरारजी देसाई वगैरे नेत्यांच्या संघटना काँग्रेसचं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये फार मोठी म्हणजे सरळसरळ उभी फूट पडली होती आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या गटासाठी बैलजोडीऐवजी नवे गायवासरू हे चिन्ह घ्यावं लागलं होतं. सन १९७१च्या सार्वत्रिक निवडणुका इंदिरा गांधींनी हे नवे निवडणुक चिन्ह घेऊन लढवल्या आणि...