त्यांचा 'त्या'च्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग
द नवहिंद
टाइम्स पणजी, गोवा डिसेंबर ३, १९८२
त्यांचा
'त्या'च्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग
कामिल पारखे
पणजी,
डिसेंबर ३ – जुन्या गोव्यातील बॉम जिझस बॅसिलिका परिसरातील हजारो यात्रेकरूंमध्ये आज
एक 'अपरिचित' यात्रेकरूंचा छोटा समूह सेंट फ्रान्सिस झेवियरच्या दर्शनाला आला होता.
या छोट्या समूहाने खूप लोकांच्या कित्येक वर्षांच्या ख्रिश्चन धर्माविषयी असलेल्या
धारणांना, समजुतींना धक्का दिला.
हा २७ जणांचा
समूह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा ह्या गावावरुन आला होता व त्याचे नेतृत्व जेसुईट धर्मोपदेशक
फादर प्रभूधर आणि संताजी नावाच्या तरुणाकडे होते. त्यांपैकी बहुसंख्य कॉलेजचे विद्यार्थी
होते, तर काही फक्त १७ वर्षांचे होते. दररोज सुमारे ३५ कि.मी. अंतर कापत त्यांनी १४०
कि.मी.चा प्रवास केला, तो देखील चारदिवसांत, पायी! त्यांचं वेगळेपण ते कट्टर कॅथॉलिक
असले तरी लोकांना ते गात असलेल्या मराठी व कोंकणी भजनांवरून जाणवत होतं. विशेष म्हणजे
ते भजनं टाळांच्या साथीने म्हणत होते.
हे वारकरी
मराठी संत नामजप करत होते व तुकारामांचे अभंगदेखील म्हणत होते. त्यामुळे ते सर्वांचं
लक्ष वेधून घेत होते. काही ठिकाणी, जसे नार्वे आणि दिवर येथे, त्यांना हा
'मूर्खपणा' बंद करा असे सांगण्यात आले. तथापि, जराही विचलित न होता हे यात्रेकरू डिसेंबर २ च्या
रात्री जुन्या गोव्यात पोहोचले. आनंदाने गात असलेल्या ह्या यात्रेकरूंना पश्चिम महाराष्ट्रातून
आलेल्या इतरांनी बॉम जिझस बॅसिलिकाच्या आवारात साथ दिली. यात्रेच्या पहिला टप्प्याची
सांगता रात्री ११ वाजता होली फॅमिली ऑफ नाझरेथ कॉन्व्हेंटच्या आवारातील मोकळ्या जागेत
कृतज्ञता व्यक्त करण्याच्या सामूहिक प्रार्थनेने (a thanks giving mass)
झाली. यात्रेकरू उद्या आपापल्या गावी जसे आले तसेच जातील.
गत साली
सुद्धा फादर प्रभूधर यांच्या नेतृत्वाखाली एक दहाजणांचा समूह आजऱ्याहून जुन्या गोव्यात
पायी आला होता.
ऊंच,
धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या शेहेचाळीस वर्षीय धर्मोपदेशकांच्या हातात जरी काठी असली
तरी थकव्याचे कोणते हि चिन्ह त्यांच्या चेहेऱ्यावर नव्हते. ते मला म्हणाले कि यात्रेचा
मुख्य हेतू त्याग करणे आणि लोकांच्या सर्वांगीण विकासाकरीता देवाची मदत मागणे हा आहे.ते
म्हणाले, "संपूर्ण वर्षभर आम्हाला अध्यात्मिक समाधान लाभते आणि आम्ही पुन्हा येऊ."
कोल्हापूर,
बेळगांव, सावंतवाडी, इ. ठिकाणी स्थायिक झालेल्या या लोकांचा इतिहास मनोरंजक आहे. बार्देस
तालुक्यातील कित्येक कॅथॉलिक समूह १७६१ ते १७८५ याकाळात या सीमावर्ती परिसरात स्थलांतरित
झाले. त्यांच्या स्थलांतराच्या कारणांविषयी इतिहासकारांत वाद आहेत. सुमारे ७० वर्षे
एकही धर्मोपदेशक नसूनसुद्धा स्वतःला अभिमानाने 'बार्देसकर' म्हणविणाऱ्या या लोकांनी
आपली श्रद्धा टिकवून ठेवली. त्याला कारण त्यांना लाभलेला कोंकणी भाषेचा वारसा आणि आंतरजातीय
विवाहांचा अभाव.
आता यांपैकी
९० टक्के जणांच्या स्थावर मालमत्ता ते राहतात त्याठिकाणी आहेत. त्यांनी सेंट फ्रान्सिस
झेवियरच्या मेजवानीला दरवर्षी उपस्थित राहून गोव्याशी असलेलं नातं कायम टिकवलं आहे.
इतर धार्मिक समूहांशीमिळून-मिसळून राहिल्याने इतरांच्या काही प्रथा त्यांनी आपल्या
विधींचा भाग म्हणून स्वीकारल्या आहेत.
वाचकांचापत्रव्यवहार
१. गोयेंकरांचंनिर्गम
महोदय,
आपल्या ४. १२. १९८२ च्या अंकातील बातमीत (देअर वे ऑफ रीचिंग हिम) लिहिल्याप्रमाणे एका
'अपरिचित' यात्रेकरूंच्या छोट्या समूहाने ख्रिश्चन धर्माविषयी असलेल्या समजुतींना धक्का
दिला. कामिल पारखींनी लिहिल्यानुसार ह्या लोकांनी कोल्हापूर, बेळगाव आणि सावंतवाडीच्या
विविध भागात १७६१ आणि १७८५ च्या दरम्यान स्थलांतरकेले. परंतु त्यांच्या स्थलांतराच्या
कारणांविषयी इतिहासकारांत वाद आहेत.
१७६१ च्या
दरम्यान, उच्चवर्गीय गोयेंकरांनी पोर्तुगालमधील घटनात्मक क्रांतीत सक्रिय सहभाग घेतला.
तर कनिष्ठ वर्गातील लोक बार्देसकर या नांवाने एकत्रआले ज्यामुळे त्यांना आपला वांशिक
संबंध अब्राहमच्या काळाशी आणि बाराजमातींशी जोडता आला. सतराव्या शतकाच्या अखेरीस,
संभाजीच्या नेतृत्वाखाली ह्या गोयेंकरांनी उत्तरेकडील सरंजाम भोंसले आणि पूर्वेकडील
सरंजाम राणे यांच्याविरुद्ध लढा दिला.
परंतु १७६१मध्ये,
बरोबर शंभरवर्षांपूर्वी गोव्याच्या फ्रांसिस्को लुई गोम्स याने ब्रिटिशांना भारत सोडायला
लावला होता. गोव्याला भारतात सामील करण्याच्या १००वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी गोवा पादाक्रांत
करण्याची पोर्तुगीजांच्याविरुद्ध योजना केली होती. तिच्यात सत्तारीचे राणे सांकलिम
आणि बिचोलिम येथून ब्रिटिशांची साथ देत होते. पोर्तुगीजांनी प्रतिकार करत
सशस्त्र लोकांना पकडले आणि त्यांची कापलेली शरीरं टांगून ठेवली.
त्यामुळे
लोकांच्यात दहशत निर्माण झाली आणि कनिष्ठ वर्गातील लोकांनी सामूहिक पलायन केले.
त्यांनी कोल्हापूर, बेळगांव आणि सावंतवाडी परिसरात आश्रय घेतला.
पोर्तुगीज
गोव्यावरील कब्जा सोडत नाहीत हेलक्षात आल्यावर भोसल्यांनी त्यांना पेरनेमचा भाग कोल्हापूरशी
न लढण्याच्या बदल्यात ताब्यात दिला. नंतर नेपोलियनच्या युद्धाचा फायदा घेत ब्रिटिशांनी
पुन्हा गोवा काबीज करण्याची योजना आखली. परंतु नेपोलियनने ब्रिटिशांचा बिमोड करण्यास
ब्रेस्टहून समुद्रमार्गे गोव्याकडे फौज धाडली, जी गोव्याला कधी पोहचलीच नाही.
फ्रेंचांना गोव्याबाहेर ठेवण्याच्या निमित्ताने ब्रिटिशांनी गोव्याचा ताबा घेतला.
तथापि पोर्तुगीज गव्हर्नरने संपूर्ण मुलकी कारभारावरील त्याचा हक्क सोडला नाही.
अमिनच्या शांतता करारानंतर ब्रिटिशांनी नाईलाजाने गोवा
सोडले. कोल्हापूर, बेळगांव आणि सावंतवाडीला गेलेले काही गोयेंकर परत आले पण बहुसंख्य
त्यांच्या नवीन ठिकाणीच राहिले. त्यांच्या कट्टर कॅथॉलिक श्रद्धा टिकून राहणे काही
भारतीय-पोर्तुगीज इतिहासकारांच्या सोळाव्या व सतराव्या शतकांत झालेल्या धर्मांतराच्या
सिद्धांतांना छेद देतं.’
विसेंट कोरिया
आफोंसो (पणजी)
प्रिय
कामिल,
मी बार्देसकर
समाजावर तुम्ही लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लेखांचं मनापासून कौतुक करतो.
मी कुतूहल
आणि व्यक्तिगत रस असल्यामुळे बार्देसकरांवर संशोधन करत आहे. माझा विशिष्टर सहा बार्देसकरांनी
कोणत्या साली स्थलांतर केलं; कोणत्या मार्गे केलं; आणि मूळ बार्देस खेड्याचा दुवा घाटावरील
खेड्यांशी लावणे यात आहे.
एका लेखात
आपण असा उल्लेख केला यकि स्थलांतराचा कालावधी हा १७६१ पासून १७८० पर्यंतचा आहे.
मी जाणून घेऊ इच्छितो कि हा संदर्भ तुम्हाला कोठे मिळाला?
आमचे बरेच
समाज बांधव म्हणतात कि स्थलांतर ३००-४०० वर्षांपूर्वी झालं आहे. पण पुराव्याअभावी अशी
विधानं संदिग्ध आहेत. स्थलांतराच्या ४०० वर्षेपूर्ती निमित्त खानापूर येथे २००० साली
मोठा सोहळा झाला होता. ‘१६०० साली स्थलांतर झाले’ या मताशी मी सहमत नाही. मी संयोजकांना
याविषयी विचारले पण ते याच्या पुष्ट्यर्थ काही पुरावा देऊ शकले नाहीत.
माझ्याकडे
काही संदर्भपुस्तके आहेत. 'मिशन हिस्टरी ऑफ फ्रांसिकॅन्स' हे त्यातील एक.
(बार्देस
हा फ्रांसिस्कन संघटनेच्या देखरेखीखाली होता). तुम्ही उल्लेख केलेला कालावधी ह्या दस्तऐवजात
असणाऱ्या काळाशी जुळत नाही. म्हणून मी तुम्हाला
विनंती करतो कि आपल्या संदर्भांची माहिती मला द्या जेणेकरून मला काही मौल्यवान माहिती
मिळेल. माझी माहिती जर खरी असेल तर जेसुइटांना १७४७च्या सुमारास अटक करण्यात आली आणि
हाकलून देण्यात आलं. इतर धार्मिकपंथाना देखील
पोम्बल काळात बंदी होती.
मी आपल्या
मताला आव्हान देऊ इच्छित नाही तर प्रामाणिकपणे बार्देसकारांविषयी असलेले संदर्भ गोळा
करत आहे.
मला खात्री
आहे आपण माझ्या शोधात मला मदत कराल. कारण आपण मराठीत पुस्तके लिहिली आहेत, जसे
'मिशनऱ्यांचे योगदान' आणि बरेच लेख देखील 'निरोप्या'त लिहिले आहेत.
शुभेच्छा
अल्फी मोंतेरो
Comments
Post a Comment