Posts

Image
  ‘टिपंवणी’ : सामाजिक इतिहासाचा आणि धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतराचा ऐवज ग्रंथनामा  - वाचणारा लिहितो कामिल पारखे पालघर जिल्ह्यातील वसई हे माझे एक आवडते सुट्टीचे ठिकाण. वर्षांतून किमान दोन-तीन दिवस माझा तेथे मुक्काम असतोच. याचे एक कारण म्हणजे माझ्याशी अत्यंत जवळचे, स्नेहाचे संबंध असलेली कुटुंबे तेथे आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे वसईचे गोव्याशी अनेक बाबतीत असलेले साम्य. या दोन्ही किनारपट्टीवरील प्रदेशांमध्ये एकेकाळी पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. वसईतली नारळांची झाडे, अनेक गावांत अजूनही राहिलेली हिरवाई, फळझाडे आणि फुलझाडांमध्ये असलेली टुमदार घरे, अरुंद रस्त्यांच्या चौकाचौकांत असलेले क्रूस आणि या क्रुसांसमोर दररोज संध्याकाळी तेवणाऱ्या मेणबत्त्या, बाजारांत आणि रस्त्यांवर विक्रीला असलेली मासळी, यामुळे आपण क्षणभर गोव्यातच आहोत, असे मला अनेकदा वाटते. गोव्याचे आणि वसईचे ख्रिस्ती लोक यांच्या संस्कृतीतही खूप साम्य आहे. सिसिलिया कार्व्हालो यांचे ‘टिपंवणी’ हे आत्मचरित्र वाचताना वसईच्या या आगळ्यावेगळ्या समाजजीवनात खोलवर डोकावण्याचा अनुभव आला. कार्व्हालो या मराठी साहित्यक्षेत्रात एक कवयित्री...
  त्यांचा 'त्या'च्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग द नवहिंद टाइम्स पणजी, गोवा डिसेंबर ३, १९८२   त्यांचा 'त्या'च्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कामिल पारखे पणजी, डिसेंबर ३ – जुन्या गोव्यातील बॉम जिझस बॅसिलिका परिसरातील हजारो यात्रेकरूंमध्ये आज एक 'अपरिचित' यात्रेकरूंचा छोटा समूह सेंट फ्रान्सिस झेवियरच्या दर्शनाला आला होता. या छोट्या समूहाने खूप लोकांच्या कित्येक वर्षांच्या ख्रिश्चन धर्माविषयी असलेल्या धारणांना, समजुतींना धक्का दिला. हा २७ जणांचा समूह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा ह्या गावावरुन आला होता व त्याचे नेतृत्व जेसुईट धर्मोपदेशक फादर प्रभूधर आणि संताजी नावाच्या तरुणाकडे होते. त्यांपैकी बहुसंख्य कॉलेजचे विद्यार्थी होते, तर काही फक्त १७ वर्षांचे होते. दररोज सुमारे ३५ कि.मी. अंतर कापत त्यांनी १४० कि.मी.चा प्रवास केला, तो देखील चारदिवसांत, पायी! त्यांचं वेगळेपण ते कट्टर कॅथॉलिक असले तरी लोकांना ते गात असलेल्या मराठी व कोंकणी भजनांवरून जाणवत होतं. विशेष म्हणजे ते भजनं टाळांच्या साथीने म्हणत होते. हे वारकरी मराठी संत नामजप करत होते व तुकारामांचे अभंगदेखील म्हणत हो...

‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर

Image
‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर   October 12, 2020     lokmarathi  Camil parkhe   October 12, 2020     lokmarathi  Camil parkhe कामिल पारखे रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्व शैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना ‘जय ख्रिस्त’ म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी – दादांशी – बोलू लागले. बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, “पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?” माझ्या वडिलांचे श्रीरामपुरात मुख्य बाजारपेठेत सोनार लेनमध्ये ‘पारखे टेलर्स’ हे टेलरिंगचे दुकान होते. शहरातील दोन-तीन प्र...

गोव्याचा कार्निव्हल : हा उत्सव भारतीय पर्यटकांना अपरिचितच राहिला आहे!

Image
गोव्याचा कार्निव्हल : हा उत्सव भारतीय पर्यटकांना अपरिचितच राहिला आहे! पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे गोव्याच्या कार्निव्हलचे एक संग्रहित छायाचित्र Wed , 12 February 2020 पडघम सांस्कृतिक कार्निव्हल Carnival गोवा Goa किंग मोमो King Momo गोवा कार्निव्हल Goa Carnival कार्निव्हल हा गंमतीदार उत्सव भारतात फक्त गोव्यातच साजरा होतो. या उत्सवाचा प्रमुख असलेला किंग मोमो पणजीमध्ये जनतेसमोर जाहीरनामा वाचून शहरात चार दिवसांचा आपला अंमल जारी करतो आणि सर्वांना आपापल्या हौसमजा पूर्ण करून घेण्याची परवानगी वा आज्ञा देतो. थोडक्यात ‘खाओ, फिरो, मजा करो’ असाच या किंग मोमोचा हुकूम असतो. त्याची जनताही या औटघटकेच्या राजाची आज्ञा (मुकाट्याने नव्हे तर) अगदी आनंदाने, हसत-खेळत पाळते. ख्रिस्ती धर्मातील चाळीस दिवसांच्या उपवासकाळाच्या म्हणजे लेंट सिझनच्या चार दिवस आधी कार्निव्हल या उत्सवाची सुरुवात होते. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवार वा अ‍ॅश वेन्सडे या दिवसापासून हा उपवासकाळ सुरू होतो आणि येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरणाच्या दिवसापर्यंत म्हणजे गुड फ्रायडेला त्याची समाप्ती हो...