Posts

Showing posts from April, 2022
Image
संजीवनी साखर कारखाना संस्थापक शंकरराव कोल्हे   ''तुम्ही मुंबई-पुण्याकडची आणि इतर शहरांतले पत्रकार, तुम्हाला आमच्याकडच्या प्रश्नांची काय माहिती असते ? इकडे येण्याआधी तुम्ही चारदोन स्थानिक पत्रकारांशी बोलता, जुनी वार्तापत्रे नजरेकडून घालता आणि आमच्यासारख्या लोकांना तेच-तेच प्रश्न विचारता. शेतीसाठी पाणीवाटपाचा वाद, अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण वाद आणि शंकरराव काळे -शंकरराव कोल्हे वाद, बस्स, हे विषय सोडून तुमची गाडी पुढे ढळतच नाही. हा, घ्या तुम्ही तो नाश्ता आणि चहा,,,'' कोपरगावातल्या संजीवनी साखर कारखान्याच्या आवारात साखर कारखाना संस्थापक शंकरराव कोल्हे यांची मुलाखत घेताना अगदी सलामीला झडलेला हा संवाद. माझ्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने तर खूप मोठे असलेल्या शंकरराव कोल्हे यांच्या समोर मी बसलो होतो आणि माझ्याकडून एकदोन प्रश्न विचारले गेल्यानंतर या साखरसम्राटांनी अशी तोफ डागली होती. अर्थात `इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी आणि राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकाचे मी प्रतिनिधीत्व करत असल्याने समोरच्या व्यक्तीच्या कर्तृत्वाने किंवा नुसत्या बोलण्याने मी दबून जाण्याचा...
Image
  महारांना पौराहित्य द्यावे का? असे दचकावून जाऊ नका.                                                  Fr. Gurien Jacquier (MSFS) महारांना पौराहित्य द्यावे का? त्यांना धर्मगुरुची दीक्षा दिल्याने धर्मद्रोह होतो का? समाजातील अगदी खालच्या पातळीवर असलेल्या जातीच्या या लोकांना पौरोहित्याचे अधिकार दिल्यास समाजातल्या वरच्या जातींतले लोक त्यांना स्विकारतील का? याबाबत धर्मशास्त्रांचे मत अजमावून घ्यावे लागेल का? धर्माचार्यांचे याबाबत मार्गदर्शन आणि परवानगी घ्यावे लागेल का? असे दचकावून जाऊ नका. हे प्रश्न एक शतकापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात विदर्भात आणि मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात विचारले गेले होते. आणि त्याबाबत नक्की काय निर्णय घ्यावा, त्याचे पडसाद काय उमटतील याविषयी प्रश्नचिन्ह होते. भारतातील समाजजीवनाविषयी, येथील अस्पृश्यांविषयी लोकांमध्ये असलेल्या तिरस्काराच्या भावनेची कल्पना असल्याने काही युरोपियन लोक याबाबत विचार करत होते. आणि त्या...
Image
  गोव्याला पर्यटक म्हणून गेल्यावर तिथे काय करावे, काय पाहावे   गोव्याला पर्यटक म्हणून गेल्यावर तिथे काय करावे, काय पाहावे असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. माझा अनुभव असा आहे कि गोव्याला अनेकदा जाऊन आणि तिथे काही वर्षे राहूनही अनेक लोकांनी खराखुरा गोवा पाहिलाच नसतो किंवा अनुभवला नसतो. गोव्यात सुट्टीला गेले म्हणजे समुद्रकिनारी जायचे, मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांचा यथेच्छ आस्वाद घ्यायचा आणि पिण्याचा कार्यक्रम करायचाअशीच अनेकांची कल्पना असते. खरे पाहिले तर याहून अधिक कितीतरी गोष्टी गोव्यात असताना पाहायच्या आणि अनुभवयाच्या असतात. या महिन्यात चार सुट्ट्या सलग आलेल्या आहेत, आणि तेव्हापासून गोव्यात पर्यटक हंगामही जोमाने सुरु होईल. कोरोनाचा लॉकडाऊन संपला आहे. करोनामुळे दोनअडीच वर्षे घरात आणि शहरांत अडकलेली मंडळी यावेळी बाहेर पडणार आहेत. गोव्यात पर्यटनासाठी पहिल्यांदाच जाणाऱ्या लोकांना गोव्याची तोंडओळख करून घेण्यासाठी मी त्यांना दोन दिवसांच्या गोवा दर्शन टूरमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत असतो. या दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोवा असे पूर्ण गोवा राज्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे,...
Image
मुस्लीम समाजासाठी मोलाचे योगदान देणारे सय्यदभाई तीन वर्षांपूर्वी नरेन्द्र मोदी सरकारने पुण्यातले सय्यदभाई यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला तेव्हा अनेकांच्या - अगदी पत्रकारांच्या- सुध्दा भुवया उंचावल्या गेल्या होत्या. कोण हे सय्यदभाई? असाच त्यापैकी अनेकांचा प्रश्न होता. त्यापूर्वी कितीतरी वर्षे पुण्यातल्या सामाजिक वर्तुळात आणि त्यामुळे प्रसारमाध्यमांतही हे नाव झळकत नव्हते. जुन्या पिढीतल्या लोकांना आणि माझ्यासारख्या काही पत्रकारांना मात्र सय्यदभाई हे नाव आणि हे व्यक्तिमत्त्व चांगलेच परिचित होते. सय्यदभाईचे पुण्यात ८ एप्रिल २०२२ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मुस्लीम समाजासाठी मोलाचे योगदान देणारे सय्यदभाई हे समाजवादी नेते डॉ बाबा आढाव, दाऊदी बोहरा समाजाचे कार्यकर्ते ताहेर पुनावाला आणि भाई वैद्य यांच्या बरोबरीने काम करणारे कार्यकर्ते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या निधनानंतर या सामाजिक संघटनेची झुल समर्थपणे सांभाळणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमध्ये सय्यदभाई यांचा समावेश होता. सय्यदभाई महाराष्ट्रात आणि देशातही एकदम प्रकाशझोतात आले ते पंतप्रधान राजीव गांधी...
Image
तंत्रज्ञानाची अविश्वसनीय दौड -भवताल २७ मार्च २०२२    ``कामिल सर, मी सोनाली बोलतेय. आमच्या न्यूज चॅनेलवर निवडणूक निकालाच्या दिवशी १० मार्चला बोलायला स्टुडियोत याल का?' काही दिवसांपूर्वी असे फोनवर विचारले गेले आणि मी चमकलो. कशावर बोलायचे असे विचारल्यावर 'गोव्यातल्या निवडणूक निकालावर विश्लेषण ' असे उत्तर आले आणि मी काय ते समजून घेतले. गेली दोनअडीच महिने म्हणजे निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासून गोव्यातील राजकीय घडामोडींवर, तिथल्या राजकारणावर समाजमाध्यमांवर अनेक लेख टाकल्याचा हा परीपाक होता हे उघडच होते. गोव्यातले राजकारण मी सत्तरच्या दशकापासून जवळून पाहत आलो आहे. गेली अनेक वर्षे सत्तेच्या खेळात केवळ तोंडी लावण्यापुरता उरलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तेव्हा गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशात सत्तेवर होता, पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या कन्या शशिकला काकोडकर या तेव्हा मुख्यमंत्री होत्या. पदवीशिक्षणानंतर लगेचच नवहिंद टाइम्सचा बातमीदार म्हणून रुजू झालो होतो त्यामुळे मग गोव्यातले राजकारण, समाजकारण आणि संस्कृती यावर वेळोवेळी लिहिणे झालेच. पुण्याला र...