शतकवीर ’ निरोप्रा ’ मासिक
15) शतकवीर ’ निरोप्रा ’ मासिक
’निरोप्रा’च्रा 100 वर्षांच्रा वाटचालीचा आढावा घेणार्रा ’ निरोप्रा: संपादकीर स्पंदने (1903-2003)’ रा पुस्तकाची निर्मिती हा खरोखर एक आनंदाचा आणि अभिमानाचा रोग आहे. आनंदाचा रोग अशासाठी कि असे आनंदाचे आणि अभिमानाचे क्षण मराठी निरतकालिकांच्रा इतिहासात फार दुर्मिळ आहेत. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली सुरू केलेल्रा ’दर्पण’ रा निरतकालिकाने सुरू होतो. सव्वादोनशे वर्षांच्रा रा इतिहासात ’निरोप्रा’ला लाभलेला हा रोग आतापर्रंत केवळ तिनच निरतकालिकांना लाभलेला आहेत. प्रोटेस्टंट मिशनरींनी सुरू केलेला आणि अजूनही प्रकाशित होत असलेला ’ज्ञानोदर’, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्र टिळकांनी सुरू केलेला ’ केसरी’ आणि ’निरोप्रा’ ही ती तीन निरतकालिके. रापैकी शंभरी ओलांडलेला ’निरोप्रा’ अजूनही तरूणाईतच आहे राबद्दल कुणाचे दुमत नसावे.
’निरोप्रा’चा इतिहास म्हणजेच एका अर्थाने अहमदनगर जिल्ह्यातील दलित खिस्ती समाजाचा इतिहास असे ’निरोप्रा’चे संपादक फादर ज्रो. मा. पिठेकर रांनी जरंत गारकवाड रांनी लिहिलेल्रा ’ निरोप्रा: संपादकीर स्पंदने (1903-2003)’ रा पुस्तकाच्रा प्रस्तावनेत म्हटले आहे.1 ’निरोप्रा’ जन्माला आला तेव्हा महाराष्ट्रात आणि भारतात वृत्तपत्रे नुकतीच कुठे जन्माला रेत होती, त्रापैकी अनेकांच्रा नशिबी बालमृत्रूच लिहिला होता. राच काळात अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक रा जिल्ह्यांच्रा परिसरात एक वेगळाच समाज, मराठी दलित ख्रिस्ती समाज, उदरास रेत होता. मराठी भाषेचे जुजुबी ज्ञान असलेल्रा परदेशी धर्मगुरूंच्रा संपादकत्वाखाली ’ निरोप्रा’ चाचपडत पुढे पाऊल टाकत होता, आणि त्राचे बोट धरून बाल्रावस्थेत असलेला दलित ख्रिस्ती समाज हळूहळू उभा राहण्राचा प्ररत्न करत होता. हे वास्तव्र लक्षात घेतले म्हणजे रा काळात ’निरोप्रा’ तून प्रगल्भ म्हणता रेईल अशा स्वरूपाचे साहित्र का निर्माण झाले नाही अथवा स्थानिक लेखकांची परंपरा का निर्माण झाली नाही राचे उत्तर मिळते.
फादर प्रभुधर यांनी 1971 च्या जानेवारीत ’ निरोप्या ’चे संपादक म्हणून सूत्रे हाती घेईपर्यंत हे मासिक केवळ अहमदनगर, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजापुरतेच मर्यादित राहिले होते. फादर प्रभुधर यांनी पुण्यातील डी नोबिली कॉलेजात तत्त्वज्ञान शिकणार्रा ब्रदरांना एकदोन वर्षांसाठी सहाय्यक संपादक म्हणून नेमणूक करून त्यांना लिहिते केले. हे सर्व ब्रदर पालघर जिल्ह्यातील वसई परिसरातील होते आणि त्यामुळे तेव्हापासून ’निरोप्या’ अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याची हद्द पार करून वसईतील वाचकांपर्यंत पोहोचला. राआधीच वसईत ’सुवार्ता’ मासिक सुरू झाले होते. आज रा दोन्ही मासिकांनी आपापल्रा जिल्ह्यांच्रा भौगोलिक सीमा पार करून एकमेकांच्रा वाचकक्षेत्रांत अतिक्रमण केले आहेच. गंमतीने असेही म्हणता रेईल कि हे अतिक्रमण आता तर संपादकीर पातळीवरही पोहोचले आहे. सध्राचे ’निरोप्रा’चे संपादक फादर पिठेकर हे मूळचे वसईचे आहेत, त्राशिवार राज्रातील इतर भागांतील मराठी ख्रिस्ती वाचकांपर्रंतही ही मासिके पोहोचली आहेत. असे असले तरी ’सुवार्ता’ हे वसईतील ख्रिस्ती समाजाचे आणि ’निरोप्रा’ हे अहमदनगर, पुणे. औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील दलित ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र अशीच त्रांची तोंडओळख कारम राहिली आहे.
शंभर वर्षांच्रा रा काळात ’निरोप्रा’ने कोणती मोठी कामगिरी केली आहे आणि विसावे शतक पार केल्रानंतर एकविसाव्रा शतकात रा मासिकाचे प्ररोजन कार असा प्रश्न रा निमित्ताने उपस्थित होणे शक्र आहे. मराठी वृत्तपत्रांच्रा इतिहासात ’सत्रकथे’सारर्खी अनेक दर्जेदार निरतकालिके काळाच्रा प्रवाहात बंद झाली. कुठल्राही मासिकाचे अस्तित्व चालू राहावे कि नाही राबाबतीत वाचकांची भूमिका फार महत्त्वाची ठरत असते. अनुदान, देणगी आणि सबसिडीच्रा ऑक्सिजनवर ही मासिके फार तर काही काळ चालू राहू शकत नाहीत. अनेक प्रचारी थाटाची निरतकालिके, मासिके फुकटात मिळाल्राने हाती पडतात पाकिट न उघडता कचर्राच्रा पेटीत टाकली जातात. ’निरोप्रा’चे तसे झालेले नाही.’ निरोप्रा’ अजून तग धरून राहिला आहे राचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे वाचकाना तो हवा आहे.
हरेगावच्रा मतमाऊलीच्रा रात्रेत दरवर्षी ’ निरोप्रा’चा एक स्टॉल असतो. तेथे ’निरोप्रा’ची वर्गणी देण्रास रेणार्रा वाचकांबी गर्दी पाहिली म्हणजे मी कार म्हणतो आहे राची तुम्हांला थोडीफार कल्पना रेऊ शकेल. गेली काही वर्षे मी आणि ’निरोप्रा’चे एक धडाधडीचे कार्रकर्ते रो. शा. गारकवाड ’ निरोप्रा’चा हा स्टॉल हरेगावच्रा रात्रेत चालवत आहोत. वर्गणी न भरल्राने किंवा वर्गणी भरूनही काही कारणाने काही वाचकांना ’निरोप्रा’ पोहोचत नाही अशावेळी चिडलेल्रा वाचकांच्रा प्रक्षोभास तोंड देण्राची वेळ रेते. ही अवघड जबाबदारी मी तातडीने गारकवाड रांच्राकडे सोपवीत असतो. निरमितपणे ’ निरोप्रा’ न मिळाल्राबद्दल संतापलेल्रा रा वाचकांकडे पाहिले म्हणजे शंभर वर्षांनंतरही हे मासिक वाचकांना हवे आहे राबद्दल काही संशर राहत नाही.
’ निरोप्रा’ दर्जेदार लेखकवर्ग तरार करू शकला नाही अशी एक खंत फादर पिटेकरांनी रा पुस्तकाच्रा प्रस्तावनेत व्रक्त केली आहे. त्रात बरेचसे तथ्र आहे. ’निरोप्रा’ कधीही केवळ साहित्रक्षेत्राच्रा सेवेसाठी चालविला जात नव्हता. त्राची उद्दिष्टे आणि कार्रक्षेत्रच वेगळे आहे. असे असले तरी आज मराठी साहित्रक्षेत्रात आपल्रा कर्तृत्वाने नाव कमावलेल्रा फादर फ्रान्सिस दिब्रिटोंचा पहिला लेख ’निरोप्रा’नेच छापला होता. विद्रोही साहित्रिक आणि संपादक आचार्र सत्रवान नामदेव सूर्रवंशी, मराठी शालेर पाठ्यपुस्तकात ज्रांच्रा कवितांचा समावेश झाला ते संपत विश्वास गारकवाड उर्फ कवि विश्वासकुमार, कैतान दोडती अशा नामवंत लेखक-कविंनी ’ निरोप्रा’त दीर्घकाळ लिहिले आहे.
’निरोप्रा’चे आणि माझे अगदी शालेर जीवनापासूनचे नाते आहे 1970च्रा दशकात रा मासिकाचे संपादक फादर प्रभुधर शब्दकोडे छापित असत, रा शब्दकोड्यांची बरोबर उत्तरे देण्रार्रांची नावे ते प्रकाशित करत असत.अनेकदा सर्व उत्तरे बरोबर देणारे कुणीच नसत. मग फादर फक्त एक क़िवा दोनच चुकीची उत्तरे देणार्राची नावे छापत असत. अशाच लोकांबरोबर तेव्हा पहिल्रांदाच माझे नाव ’निरोप्रा’त छापून आले. तेव्हापासून आपले नाव छापून आणण्राचा छंदच सुरू झाला आज मी पूर्णवेळ पत्रकार आणि लेखक म्हणून कार्ररत आहे रा व्रवसाराचे बीज ’निरोप्रा’नेच माझ्रामध्रे रूजवले होते.
’निरोप्रा’ने शंभरी पार केली राचे बरेचसे श्रेर रेशूसंघीर अधिकार्रांना द्यावे लागेल. ’आपण’ सारखे एक दर्जेदार मराठी साप्ताहिक रेशूसंघीरांनी जवळजवळ दहा वर्षे चालविले होते मात्र ते नंतर बंद करावे लागले. ’सुवार्ता’ मासिकाप्रमाणे ’ निरोप्रा’च्रा संपादकपदी पूर्णवेळ धर्मगुरू देणे त्रांना शक्र झालेले नाही, मात्र हे मासिक चालू राहिल राची रेशूसंघीर अधिकार्रांनी सर्वतोपरीने काळजी घेतली आहे. दहा वर्षापूर्वी ’ निरोप्रा’चे संपादक बदलत वा त्रा संपादकाची दुसरीकडे बदली होई तसे रा मासिकाचे कार्रालराचे गाव किंवा शहर बदलत असे. त्रामुळेच ’विंचवाचे बिर्हाड पाठीवर असते तसे ’ निरोप्रा’चे आहे’ असे रा मासिकाचे माजी संपादक फादर प्रभुधर रांनी एका संपादकिरात लिहिले आहे. फादर प्रभुधर दिड दशके संपादक होते. त्रांच्राआधी फादर जोसेफ स्टार्क रा मासिकाचे 22 वर्षे संपादक होते. फा. प्रभुधरांच्रा बदलीनुसार ’ निरोप्रा’ श्रीरामपूर, कर्हाड, आजरा अशा ठिकाणी हिंडला. आता ’ निरोप्रा’ला पुण्रात ’स्नेहसदन’ आश्रमाचे घर मिळाले आहे.
संदर्भ:
1) जरंत गारकवाड, ’निरोप्रा संपादकीर स्पंदने (1903-2003)’ , प्रकाशक, ’निरोप्रा’ मासिक (2006)
(पूर्वप्रसिध्दी: ’ निरोप्रा’ मासिक, एप्रिल 2006)
Comments
Post a Comment