पोलादी पडद्यामागे
पोलादी पडद्यामागे
“तर राष्ट्रप्रमुख आणि कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे सरकारी निवासस्थान कुठे आहे ? मॉस्कोच्या भेटीवर असणाऱ्या आम्हा भारतीय पत्रकारांच्या तुकडीतील एका सदस्याने विचारले.
तो प्रश्न तसा अगदी साधासुधा होता. दिवसभराच्या आमच्या मॉस्को दर्शन सहलीमध्ये आमच्या टिमच्या गाईड आणि अनुवादक असलेल्या युवतीने आम्हाला सोव्हिएत युनियनच्या राजधानीतील अनेक ऐतिहासिक, प्रेक्षणिय आणि पर्यटन स्थळांकडे नेले होते. त्यादिवशी मॉस्को शहरात उणे बारा तापमान होते. त्या कडकडीत थंडीत आम्ही मॉस्को शहरात हिंडत होतो. मॉस्कोतील तो ऐतिहासिक भव्य रेड स्केअर किंवा लाल चौक, ब्लादिमीर लेनिनचे थ्री-पीस सूटमधले शव प्रदर्शनास ठेवले होते ते लेनिन मुसोलियम खरेच पाहण्यासारखे होते. त्यामुळे मिखाईल गोर्बाचेव्ह या सर्वोच्च रशियन नेत्याच्या निवासस्थानासंबंधी प्रश्न विचारण्यास मला स्वतःला वा आमच्या तुकडीतील एकाही पत्रकाराला काहीच वावगे दिसले नाही. असे असूनही तो प्रश्न कानावर पडताच टुरिस्ट गाईडचे काम करणारी ती रशियन युवती चपापली होती. क्षणभर आपण तो प्रश्न ऐकलाच नाही असे तिने दर्शविले. नंतर ताबडतोब स्वतःला सावरून ती आम्हाला तो लाल चौक, लेनिन स्मारक, क्रेमलिन वगैरे स्थळांविषयी पूर्वीच्याच उत्साही स्वरात माहिती सांगू लागली.
ही घटना होती 1986 सालची. रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी मिखाईल गोर्बाचेव्ह यांची नियुक्ती होऊन केवळ वर्षभराचा काळ लोटला होता. ग्लसनॉस्त आणि पेरेत्रोईका हा त्रांच्रा दोन आवडीच्रा विषरांची रशिरात आणि संपूर्ण जगभर कौतुकमिश्रीत चर्चा होण्रास तोपर्रंत सुरूवात झाली नव्हती. साम्रवादी जगातील पोलादी पडदा अजून कारमच होता. त्रामुळे रशिरन नेत्राच्रा निवासस्थानाविषरी माहिती देण्रासंबंधी त्रा रशिर रुवतीच्रा मनातील संभ्रम सहज समजण्रासारखा होता.
रशिरात पाऊल ठेवण्राआधीच साम्रवादी देशातील पोलादी पडद्याविषरी मी भरपूर काही ऐकले होते. 1917 साली जगातील पहिली साम्रवादी क्रांती रशिरात झाल्रानंतर काही वर्षातच जोसेफ स्टॅलिन आणि नंतर लिओनिद ब्रोझनेव्ह वगैरे हुकूमशहा सत्ताधार्राच्रा कारकीर्दीत रशिरन जनतेने कित्रेक दशके स्वातंत्र्राची हवा अनुभवली नव्हती. दुसर्रा महारुद्धाच्रा काळात साम्रवादी रशिराच्रा कोंदट आणि बंदिस्त वातावरणाचे विस्टन चर्चिल रांनी ’पोलादी पडदा’ असे सार्थ नामकरण केले होते. माझ्रा पत्रकार मित्राच्रा त्रा साध्रासुध्रा प्रश्नास उत्तर देण्रास त्रा टुरिस्ट गाईडने का टाळाटाळ केली हे समजण्रास मला फारसा उशीर लागला नाही.
काही दिवसांपूर्वी मिखाईल गोर्बाचेव्ह रांना पदच्रुत करण्राचा अरस्वी प्ररत्न काही सुधारणाविरोधी मंडळींनी केला होता. त्रानिमित्ताने ग्लासनॉस्त आणि पेरेस्त्रोईका अमलात रेण्रापूर्वी रशिरातील आणि बल्गेरिरा रा दुसर्रा एका साम्रवादी राष्ट्रातील माझ्रा जुन्रा आठवणी जाग्रा झाल्रा.
मार्च 1985 मध्रे रशिरातील एकपक्षीर राजवटीत कम्रुनिस्ट पक्षाच्रा सरचिटणीसपदाची सूत्रे हाती घेतल्रनंतर मिखाईल गोर्बाचेव्ह रांनी आपल्र देशाची कवाडे विविध सुधारणांसाठी आणि मुक्त विचारांसाठी खुली करून दिली होती. पण त्रांच्रामागे रशिरातील जवळजवळ सहा दशकाच्रा एकाधिकारशाहीची परंपरा होती. ते स्वतः सुधारणावादी असले तरी त्रांच्र पक्षात आणि सरकारमध्रे कट्टर पोथीनिस्ट माक्क्सवाद्यांचे आणि सुधारणाविरोधी मंडळींचे वर्चस्व होतेच. त्रामुळे राजकीर आर्थिक वा इतर कुठल्राही क्षेत्रात तडकाफडकी रशस्वी सुधारणा करणे त्रांना शक्रच नव्हते. गोर्बाचेव्ह विरोधी झालेल्रा अगदी अलीकडच्रा उठावाने त्रांच्रा पक्षात आणि सत्तेवर असणार्रा काही मंडळीचा सुधारणेस असलेला सुप्त विरोध प्रकर्षाने उघडकीस आला.
विशेष म्हणजे विस्टन चर्चिलने संबोधलेला पोलादी पडदा केवळ सोविएत रशिराशीच मर्रादित नव्हता. रशिराच्रा प्रभावाखाली असणार्रा पूर्व रुरोपातील अनेक साम्रवादी देशातील परिस्थिती रापेक्षा काही वेगळी नव्हती. बल्गेरिरातील माझ्रा दीर्घ वास्तव्रात राची मला प्रकर्षाने जाणीव झाली.
इंटरनॅशनल ऑर्गनारझेशन ऑफ जर्नालिस्टने बल्गेरिराची राजधानी सोफिरा रेथे आरोजित केलेल्रा पत्रकारितेच्रा अभ्रासक्रमााठी गोवा श्रमिक पत्रकार संघाचा सरचिटणीस रा नात्राने माझी निवड झाली होती. अभ्रासक्रमाच्रा निमित्ताने आणि एक पत्रकार म्हणून भारतीर तुकडीतील आम्ही देशातील आणि बल्गेरिरातील पत्रकारितेच्रा व्रवसाराची तुलना करणे साहजिकच होते. बल्गेरिरातील वृत्तपत्रांवरील बंधने कुणाच्राही सहज लक्षात रेण्रासारखे होते. असे असले तरी तेथील कुणीही पत्रकार रा बंधनाचे अस्तित्व अगदी अप्रत्रक्षरीत्राही मान्र करावरास तरार नव्हता. स्वतःवर लादून घेतलेले बंधन नैतिक अथवा सामाजिक बांधिलकी वगैरे गोंडस नावाखाली काही बंधनाचे काही जण समर्थनही करीत.
ग्लास्तनोस्तचे वारे फैलावण्राआधी बल्गेरिरातील बहुतेक सर्वच वृत्तपत्रे सरकारी माध्रमामार्फत पुरविलेली राजकीर नेत्रांची अधिकृत छाराचित्रे वापरत. बग्लेरिरातील एका साप्ताहिकाच्रा संपादकाने आम्हाला सांगितले की, रशिरात गोर्बाचेव्ह सत्तेवर आल्रानंतर सुरूवातीचे काही दिवस बल्गेरिरातील सर्वच वृत्तपत्रे रा रशिरन नेत्राची एका विशिष्ट पोझमधील छाराचित्रेच वापरत. मिखाईल गोर्बाचेव्ह रांच्रा थोडेसे टक्कल असणाच्रा डोक्क्रावर लाल रंगाचा एक चट्टा स्पष्टपणे दिसतो. त्रामुळे गोर्बाचेव्ह राची जनमानसातील प्रतिमेस धक्का लागू नरे म्हणून बहुतेक वृत्तपत्रे हा लाल चट्टा अगदी कौशल्रर्वक लपवून त्राचे छाराचित्र प्रसिद्ध करीत असत.
सार्वजनिक समारंभात राजकीरपुढार्रांनी वा मंत्र्रांनी डुलक्क्रा घेण्राचे वा जांभरा देण्राचे प्रकार अपवादानेच घडतात असे नाही. पण असल्रा प्रकारची छाराचित्रे छापण्राचेही धाडस बल्गेरिरातील वृत्तपत्रे करत नाहीत असे त्रावेळेस त्रा संपादकाने आम्हास सांगितले.
बल्गेरिराचे त्रा वेळचे अध्रक्ष झव्हकॉव्ह हे आपल्रा नातवासमवेत विमानतळावरून परतताना घेतलेले एक छाराचित्र रा संपादकाने आपल्रा साप्ताहिकात छापले तेव्हा रा घटनेने एक मोठीच खळबख उडवून दिली होती. तेथील वृत्तपत्र स्वातंत्र्रातील ही एक मोठीच घटना होती.
बग्लेरिरातील माझ्रा वास्तव्रत तेथील अनेक मंत्र्रांचे आणि राजकीरपुढार्राच्रा उपस्थितीत पार पडलेल्रा समारंभात हजर राहण्राची संधी मला मिळाली. रा देशातील विचार स्वातंत्र्राविरूद्ध वा एकाधिकारशाहीविरूद्ध निषेधाचा एकही शब्द तेथील नागरिकांनी उच्चारल्राचे माझ्रा कानावर एकदाही आले नाही. एकाधिकारशाहीविरूद्ध तेथील नागेरिकांच्रा मनात असंतोष खदखदत असेल असे दर्शविणारे कसलेही चिन्ह माझ्रा नजरेत आले नाही.
मात्र सुधारणावादी विचारांचे वारे वाहू लागल्यानंतर एक दोन वर्षातच बग्लेरिरातील झेव्हकॉव्ह रांच्रा जवळपास दोन दशकांच्रा हुकूमशाही कारकीर्दीचा शेवट झाला. आज रा हुकूमशहाच्रा अनेक कृत्राविरूद्ध खटले भरण्रात आले आहेत.
बल्गेरिरातील पूर्व रुरोपातील इतर अनेक साम्रवादी राष्ट्रात हुकूमशाही कारकीर्दींचा शेवट झाला आहे. सुधारणांचे हे वारू कुठवर पोहोचेल हे आत्ताच कळणे मुश्कील आहे. मात्र साम्रवादी देशात सद्या होणार्रा अनेक घडामोडीस कारणीभूत असलेली मिखाईल गोर्बाचेव्ह ही एकमेव व्रक्ती आहे.
(सौजन्र दैनिक मराठवाडा ( औरंगाबाद) ( 1 सप्टेंबर 1991)
Comments
Post a Comment