Posts

Showing posts from 2025
Image
  फार जुनी परंपरा असलेली दोन साहित्य संमेलने यंदा २०२६च्या आरंभालाच लागोपाठ होणार आहेत. मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात तर त्या पाठोपाठ शंभर वर्षांची परंपरा असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिकला सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विशेष म्हणजे एक शतकापूर्वी नाशिकलाच पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन भरले होते. मराठी साहित्य संमेलनांपासून वेगळे अस्तित्व मांडणारी ही पहिली भुमिका होती. पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १८ आणि १९ एप्रिल १९२७ रोजी नाशिकमध्ये शरणपुरातल्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मराठी शाळेत येथे पार पडले. आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते `पुण्यनगरीचे मुनी' निकल मॅक्निकल. रेव्हरंड डॉ. निकल मॅक्निकल हे चर्च ऑफ स्कॉटलंडचे मिशनरी होते. डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी आपल्या `मराठी ख्रिस्ती वाङमयाचा इतिहास १८१०-१९२७ ‘’ या संपादित पुस्तकात लिहिले आहे कि मराठी आणि संस्कृत या भारतीय भाषांचा निकल मॅक्निकल यांचा दांडगा व्यासंग होता. महाराष्ट्रीय संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ त्यांच्या व्याख्यानांचे विषय होते. मॅक्निकल यांचे वास्तव्य पुण्यात असल्याने त्यांन...
Image
  पुढील नूतन वर्षारंभात सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नाशिक येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने होत आहेत. या निमित्ताने दोन्ही संमेलनांचे आयोजक लगीनघाईत असताना यानिमित्ताने गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या आणि स्वागताध्यक्षांच्या भाषणांचे मी संकलन करत आहे. मराठी `ग्रंथकारांच्या' संमेलनाबाबत पहिला विद्रोही सूर लावला होता तो महात्मा जोतिबा फुले यांनी. त्यावेळी नगरच्या अमेरिकन मराठी मिशनच्या `ज्ञानोदय' मासिकात प्रसिद्ध झालेले 'घालमोड्या दादां'ना उद्देशून लिहिलेले त्यांचे पत्र आता सर्वांना माहित आहेच. या साहित्य संमेलनापासून पहिली वेगळी चूल मांडण्याचे धाडस ख्रिस्ती साहित्य संमेलनाने १९२७ साली झालेल्या नाशिकच्या संमेलनाद्वारे केले. या १९२७ पासून सुरु झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या भाषणांचे दस्तऐवजीकरण २००१ सालच्या संमेलनापर्यंत सुनील आढाव यांनी केले आहे. त्यानंतरच्या संमेलनाध्यक्षीय भाषणांचे संकलन आता मी करत आहे. माझा हा प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात असताना दरम्यान त्यावेळचे महाराष्ट...
Image
  गोव्यात पणजी येथे `द नवहिंद टाईम्स' या इंग्रजी दैनिकात आणि नंतर छत्रपती संभाजीनगरला `लोकमत टाईम्स'मध्ये एकूण दशकभर क्राईम आणि हायकोर्ट रिपोर्टर ही बिट मी सांभाळली. तेव्हा वापरल्या गेलेल्या अनेक संज्ञांमध्ये `डायिंग डिक्लरेशन' किंवा मृत्यूपूर्व जबाब हा एक शब्दप्रयोग होता. मुख्यतः एखादी नवविवाहित महिलेचे जळीत प्रकरण असते तेव्हा तिला जाळण्यात आल़े किंवा तिने स्वतःला जाळून घेतले हे तिच्याकडून दंडाधिकाऱ्यामार्फत वदवून घेतले जाते. `डायिंग डिक्लरेशन'ला फौजदारी प्रकरणांत आगळेवेगळे महत्त्व असते. याचे कारण साधारणतः मृत्यूपूर्वी दिलेला जबाब खरा असतो असे मानले जाते. अर्थात मरणाला सामोरे जातानासुद्धा अनेक पतिव्रता महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आपण स्वतःलाच जाळून घेतले किंवा स्टोव्हचा अचानक भडका होऊन आग लागली असे म्हणत असत. याआधी श्रीरामपूरला असताना दैनिक `सकाळ' चे संस्थापक-संपादक नानासाहेब ऊर्फ ना. भि. परुळेकर यांनी मृत्युशय्येवर असताना `निरोप घेता' हे आत्मचरित्र लिहिले होते हे मला माहित होते. त्यानंतर अशाच पद्धतीने समाजवादी नेते एस. एम जोशी यांनी इस्पितळात असताना `मी...
Image
  गोव्यात म्हापशात त्या रात्री साध्या वेशात असलेले इन्स्पेक्टर मधुकर झेंडे आणि मी कदाचित समोरासमोर आलोही असेल, मात्र त्यांच्याशी काही बोलणे शक्यच नव्हते. आपल्या मुंबई पोलीस टिममधल्या चारपाच लोकांव्यतिरिक्त कुणाशीही एक शब्दसुद्धा बोलण्याच्या मनःस्थितीत ते त्यावेळी नव्हते. त्या रविवार ६ एप्रिल १९८६च्या रात्री तिथे जमलेल्या आम्हा काही मोजक्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास त्यांना अजिबात स्वारस्य नव्हते. पर्वरी येथील `हॉटेल ओ कोकेरो' येथे चार्ल्स सोबराजच्या शिताफीने मुसक्या बांधल्यानंतर म्हापसा हॉटेलातून चेक-आऊट करून सोबराजसह शक्य तितक्या लवकर गोवा सोडून मुंबई गाठण्याच्या घाईत ते होते. काल शुक्रवार दुपारी घरच्या टिव्हीवर पिक्चर सुरु झाल्यानंतर `इन्स्पेक्टर झेंडे' असे चित्रपटाचे शिर्षक झळकले आणि डोक्यात तिडीक उठली. ''इन्स्पेक्टरसाठी हेच नाव निवडण्याची काही गरज होती काय?'' असे मी मोठ्याने बोललोसुद्धा. दोनचार मिनिटे गेली आणि लक्षात आले, ``अरे हो, हा तर मधुकर झेंडे आणि चार्ल्स सोबराज यांच्यावर चित्रपट आहे !'' त्यानंतर मी टिव्हीवरुन नजर वळवली. आज...
Image
                                                                                          सिसिलिया कार्व्हालो केरळमध्ये ख्रिस्ती धर्माची दोन हजार वर्षांची परंपरा असली तरी मल्याळी साहित्यात ख्रिस्ती मल्याळी साहित्य असा काही प्रकार अस्तित्वात नाही, अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असलेल्या तामिळ भाषेत मध्ययुगीन काळापासून ख्रिस्ती धर्मगुरूंनी अभिजात दर्जाचे साहित्य निर्माण केले आहे. त्या तामिळ भाषेतसुद्धा स्वतंत्र ख्रिस्ती तामिळ साहित्य असे काही नसते. भारताच्या इतर कुठल्याही राज्यांत, प्रदेशांत असे धर्माच्या नावावर ओळखले जाणारे साहित्य नाही. गोव्यात अनेक परदेशी ख्रिस्ती धर्मगुरूंनी कोकणी आणि मराठी साहित्य समृद्ध केले त्याचप्रमाणे अनेक नीज गोंयकारांनी लिस्बन, पॅरिस आणि रोम येथे जाऊन पोर्तुगीज, फ्रेंच वगैरे भाषांच्या साहित्यात म...