
एकमेव प्रवेशद्वार पाटो ब्रिज गोव्याची राजधानी पणजी येथे चारशे-पाचशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या काही वास्तू आणि इतर बांधकाम आहेत. पोर्तुगीज राजवटीची पहिली राजधानी असलेल्या ओल्ड गोवा येथे तर त्याहून अधिक जुनेपुराणे बांधकामे आहेत. पोर्तुगिजांनीं आपली राजधानी नोवे गोवा किंवा पणजी येथे १८४३ या साली हलवली आणि त्यानंतर इथला आधीच असलेला आदिलशाहचा राजवाडा मग पोर्तुगीज इंडियाचे मुख्यालय बनला. त्यानंतर या पणजी येथे पोर्तुगीजांनी पाश्चात्य धर्तीच्या अनेक इमारती बांधल्या, पोर्तुगीज राजवटीच्या वेगवेगळ्या खात्यांची आणि संस्थांची कामकाज या इमारतींतून चालायचे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतीय लष्कर पाठवून गोवा, दमण आणि दीव पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केला आणि मग पोर्तुगीजकालीन या इमारती विविध सरकारी खात्यांची, लष्करी विभागांची कार्यालये बनल्या. मांडवीच्या तिरावरचे आदिलशाह पॅलेस अनेक वर्षे गोवा, दमण आणि दिवचें सचिवालय आणि विधानसभा भवन होते. पणजी येथे फॉन्टइनेस, कंपाल आणि अल्तिन्हो येथे सहज एक फेरफटका मारला तर पोर्तुगीजकालीन तीनशे-चारशे वर्षे जुनी असलेल्या आणि आजही अगदी सुस्थितीत अ...