Posts

Showing posts from 2021
Image
सांता क्लॉजची खरी ओळख समोरच्यांना कळली नाही, तो सस्पेन्स खूप वेळ टिकला तर त्यातली गंमत अधिक वाढते! पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे लेखक कामिल पारखे सांता क्लॉजच्या वेषात Mon , 24 December 2018 पडघम सांस्कृतिक नाताळ मेरी ख्रिसमस Merry Christmas पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी १९८५ साली लखनौत होतो. डिसेंबरची अखेर येऊ लागली, तसे मला नाताळाचे वेध लागले. पण लखनौमध्ये गोव्यासारखे ख्रिसमसचे वातावरण नव्हते. लखनौ विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टसने आयोजित केलेल्या या अभ्यासक्रमात देशातील विविध राज्यांतील पत्रकार सामील होते. गोव्यातून मी एकटाच होतो. सहभागी पत्रकारांपैकी बहुतेकांनी ख्रिस्तमसचा कधी अनुभव घेतला नव्हता. त्यामुळे लखनौत या पत्रकार मित्रांसह नाताळ साजरा करण्याचे मी ठरवले. माझ्या पत्रकार सहकाऱ्यांना नाताळचा आनंद देण्याचे, त्यांच्यासाठी सांता क्लॉज बनून त्यांना चकित करण्याचे मी ठरवले. नाताळाचे व कुठल्याही सणाचे, उत्सवाचे त्या काळात आजच्यासारखे बाजारीकरण झाले नव्हते. सांता क्लॉज...
Image
कोकणी लेखक दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार . पंतप्रधान पंडित नेहरु यांनी १९ डिसेंबर १९६१ला भारतीय फौजा पाठवून गोवा, दमण आणि दिवची पोर्तुगीज सत्तेतून मुक्तता केली. तेव्हापासुन हा प्रदेश भारतीय संघराज्यात सामिल झाला. ऐंशीच्या दशकात कोकणी भाषेचा भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्ठात समावेश करण्यात आला. अशाप्रकारे एक स्वतंत्र भाषा म्हणून कोकणी भाषेला मान्यता मिळाली. त्यानंतर कोकणी भाषेला गोव्याची अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता मिळाली. सन १९८७ ला गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला. कोकणी भाषेत हा पुरस्कार मिळवणारे दामोदर मावजो हे दुसरे साहित्यिक. याआधी रविंद्र केळेकार यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला होता. कोकणी भाषा देवनागरी, रोमन तसेच कन्नड़ लिपित लिहिली जाते. गोव्यातील ख्रिस्ती समाज रोमन लिपिचा वापर करतो तर कर्नाटकातील किनारपट्टीवर कन्नड लिपित लिहितात. सरकारी पुरस्कारसाठी मात्र देवनागरी लिपितील कोकणी साहित्याचाच विचार होती. मराठी भाषेतल्या चार साहित्यिकांना आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. वि. स. खांडेकर, वि. वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचं...
Image
पंतप्रधान मोदी यांनी रोममध्ये वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीत पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली' काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका लेखात "पंतप्रधान मोदी यांनी रोममध्ये असताना वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीत जाऊन पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली' असे लिहिले होते. 'वाकडी वाट' हा शब्दप्रयोग मुद्दाम वापरला होता. कारण ख्रिस्ती धर्माचे परमाचार्य पोप फ्रान्सिस यांची त्यांच्या राष्ट्रात जाऊन गळाभेट घेणे, तिथे फोटोग्राफरच्या साक्षीने बायबलची प्रत भक्तिभावाने कपाळाला लावणे हा पंतप्रधान मोदीजींच्या आजवरच्या कारकिर्दीच्या रुळलेल्या आणि लोकांनाही अपेक्षित असलेल्या मार्गातील प्रवास निश्चितच नव्हता. इंडियन एक्स्प्रेसने ``पंतप्रधान मोदी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांना भेटणार'' या आशयाचा मथळा असलेली बातमी त्यादिवशी पान एक वरची पहिली बातमी किंवा लिड न्युज म्हणूनच छापली होती. केवळ अत्यंत अनपेक्षित आणि त्याचबरोबर अनेक दृष्टीकोनांतून महत्त्वाची असलेल्या बातमीलाच पान एकवरची ही जागा मिळत असते हे आता पत्रकारांबरोबरच वाचकांनासुद्धा बऱ्यापैकी माहित. झाले आहे. इतर किती इंग्रजी, मर...
Image
  पंतप्रधान नरेंद्र मोदी रोमला व्हॅटिकन सिटीला पोप फ्रान्सिस यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोमला असताना थोडी वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीला जाऊन पोप फ्रान्सिस यांना जाऊन भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोमला असताना थोडी वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीला जाऊन पोप फ्रान्सिस यांना जाऊन भेटले. या घटनेला एकदम दुर्लक्षित करता येणार नाही. या भेटीत मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारतभेटीचेही आमंत्रण दिले आहे. विमानसेवा सुरु झाल्यावर जगभ्रमंतीवर निघणारे आणि इस्राएलच्या पवित्र भूमीला भेट देणारे पॉल सहावे हे पहिलेच पोप. पोप जॉन पॉल दुसरे यांनी आपल्या सत्तावीस वर्षांच्या पेपसीमध्ये विविध राष्ट्रांना आणि राष्ट्रप्रमुखांना भेटण्याचा विक्रम केला, त्याची तुलना केवळ ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्याशीच करता येईल पोप फ्रान्सिस हे पोप जॉन पॉल दुसरे त्यांच्यासारखेच हटके आणि यात्रेकरु (पिलग्रिम) पोप आहेत. ख्रिस्ती अगदी नाममात्र संख्येने असलेल्या आशियातील म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका येथे पोप फ्रान्सिस यांचे लाल गालिच्यावर स्वागत होत होते. मात्र मोदी सरकारने पोप यांच्या भारत दौऱ्यावर आ...
Image
जातीव्यवस्था आणि चातुर्वर्ण्य हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत, केवळ हिंदू धर्माचीच ती मक्तेदारी नाही… हे खरं नाही! पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे चरणजित सिंग छन्नी, बुटासिंग, बाबा पद्मनजी, रॉबर्ट डी नोबिली, पंडिता रमाबाई, ना. वा. टिळक, अमरिंदर सिंग आणि फादर फ्रान्सिस दीब्रिटो Tue , 12 October 2021 पंजाब Punjab चरणजित सिंग छन्नी Charanjit Singh Channi दलित Dalit ना. वा. टिळक Narayan Waman Tilak अमरिंदर सिंग Amarinder Singh बुटासिंग Buta Singh बाबा पद्मनजी Baba Padamji रॉबर्ट डी नोबिली पंडिता रमाबाई Pandita Ramabai फादर फ्रान्सिस दीब्रिटो Father Francis Dibrito काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये सत्ताबदल झाला. दुसऱ्या दिवशी बहुतेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवरचा मथळा पुढील आशयाचा होता – ‘पंजाबमध्ये पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री’. काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची उचलबांगडी होऊन चरणजित सिंग चन्नी यांची त्या जागी निवड करण्यात आली होती. वस्तुतः कॅप्टन अमरिंदर सिंग आणि चन्नी दोघंही धर्मानं शीख. १९५६ साली पंजाबची निर्मिती झाल्यापासून या राज्यात आतापर्यंत एकदाही बिगर-शी...
Image
  पंडिता रमाबाई : एका हाताच्या बोटांवर मोजता येईल, अशा महाराष्ट्रातील विदुषींपैकी एक उपेक्षित पण कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे पंडिता रमाबाई आणि त्यांच्यावरील ग्रंथसंपदा व टपाल तिकीट Tue , 24 August 2021 पडघम सांस्कृतिक पंडिता रमाबाई Pandita Ramabai समाजस्वास्थ्य Samajswasthya रघुनाथ धोंडो कर्वे Raghunath Dhondo Karve धोंडो केशव कर्वे Dhondo Keshav Karve इरावती कर्वे Iravati Karve दुर्गाबाई देशमुख Durgabai Deshmukh दुर्गा भागवत Durga Bhawat प्रकांड पंडित, समाजसुधारक, साहित्यिक असे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असलेल्या रमाबाईंचे हे वर्ष (एप्रिल २०२१ - एप्रिल २०२२) स्मृतिशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त या विदुषीचे खरेखुरे मूल्यमापन व्हावे, त्यांच्या चरित्राची आणि कार्याची आजच्या पिढीला ओळख व्हावी, या हेतूने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील काही व्यक्तींनी ‘पंडिता रमाबाई स्मृतिशताब्दी समिती’ स्थापन केली आहे. या शताब्दी वर्षात रमाबाईंच्या जीवन, लेखन व कार्याचे तटस्थ दृष्टिकोनातून मूल्यमापन, तसेच स्थलकालसापेक्षता लक्षात घेऊन चिकित्सा करणेदेखील आवश्यक आहे. याच ...