नुकतेच छापून झालेले माझे नवे पुस्तक `Journalism Stories From Goa and Maharashtra' विनिता देशमुख यांच्या कॉर्पोरेट ऑफिसात काल जाऊन मी दिले. बातमीदार आणि पत्रकार म्हणून माझी पूर्ण कारकीर्द ही केवळ इंग्रजी दैनिकांतली. सुरुवातीला गोव्यात The Navhind Times, त्यानंतThe Navhind Times, Times of Inia, Lokmat Times, र फक्त एक वर्षांसाठी छत्रपती संभाजीनगरात Lokmat Times, नंतर पुण्यात एक दशकभर Indian Express. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज रोडवर The Times Of India आणि अखेरीस सकाळ वृत्तमाध्यमाच्या Maharashtra Herald नंतरचे Sakal Times मध्ये तब्बल चौदा वर्षे नोकरी. तिथेच निवृत्ती. सन २००४ला शनिवारवाड्याशेजारच्या तेव्हाच्या त्या वाड्यावजा `सकाळ' संकुलात मी नोकरीला लागलो तेव्हा मी तेथे एव्हढा काळ टिकेल किंवा ते मला ठेवतील असे वाटलेही नव्हते, पण झाले ते खरे. मी मूळचा श्रीरामपूरसारख्या अस्सल निमग्रामीण परिसरातला मराठी माध्यमातला. असे असले तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नोकरी मी केवळ इंग्रजी दैनिकांत केली ते केवळ योगायोगाने वा अपघाताने असे म्हणता येईल. दहावीनंतर गोव्यात मी जे...
Posts
Showing posts from July, 2025
- Get link
- X
- Other Apps
गेली काही दिवस कर्मधर्मसंयोगाने डेक्कन जिमखाना पुन्हा एकदा माझ्या नेहेमीच्या वहिवाटीचा परिसर बनला आहे. या जागी मी आलो, इथलाच रहिवासी झालो ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी, ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस. इंडियन एक्सप्रेसला रुजू झाल्यावर इथेच ब्रिटिश कौंसिल लायब्ररीच्या (बीसीएल) च्या मागे मंथली कॉट बेसिसवर चार वर्षे राहिलो तेव्हा हॉटेल गुडलक जिवाभावाचे स्थळ बनले होते. काही महिन्यांपूर्वी वाचले होते कि हॉटेल गुडलकच्या इमारतीचे रिनोव्हेशन होणार असल्याने हे हॉटेल काही काळ बंद राहणार आहे. काल संघ्याकाळीच इथे गेलो तिथली आत बाहेरची नेहेमीची वर्दळ पाहिली तेव्हा ही घटिका आता इतकी जवळ आली अशी पुसटशी शंकाही मनात नव्हती. आज दुपारी आम्ही दोघेही इथे जात होते आणि गुडलक बंद दिसले आणि मनात चर्रर्र झाले. पण दारापाशी काहीच लिहिलेले नव्हते, थोड्या वेळाने परत तिथे आलो तेव्हा ती सूचना चारपाच ठिकाणी लिहिलेली दिसली. रिनोव्हेशनसाठी बंद आहे म्हणून. आता कळते कि अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे हे हॉटेल तात्पुरते बंद करण्यात आले आहे आता हॉटेल गुडलकच्या अनेक ठिकाणी शाखा उघडल्या आहेत, तिथे गेल्यावर या मूळ...