अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळचा कम्युनिस्ट विचारसरणीचा बालेकिल्ला.. इथले नंतर राज्यात आणि केंद्रात प्रस्थापित झालेले अनेक नेते मूळचे कम्युनिस्ट विचारधारेचे. मला आठवते ती इथली पहिली लोकसभेची निवडणूक १९७१ सालची. त्यावेळचे तेव्हाच्या कोपरगाव मतदारसंघातले सर्वांत तगडे उमेदवार होते कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड पी. बी. कडू पाटील आणि त्यांच्या विरोधात होते होतकरु तरुण उमेदवार एकनाथ विठ्ठलराव विखे पाटील. निवडणूक प्रचारादरम्यान या दोघांना त्यावेळी श्रीरामपूर येथे आमच्या `पारखे टेलर्स' दुकानासमोर मी पाहिले. कॉम्रेड कडू पाटील यांची प्रचारात आघाडी होती. इंदिराबाईंच्या `गरिबी हटाव'च्या त्या लाटेत निवडणूक अर्थात बाळासाहेब विखे जिंकले आणि त्यानंतर जिल्ह्यातला कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव ओसरत गेला, राज्यात सुद्धा. आताचा शिर्डी मतदारसंघ राखीव झाला, त्यामुळे विखे घराण्याने शेजारच्या अहमदनगर मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. तरी शिर्डी मतदारसंघात विखे चालवतील त्या उमेदवाराला भरपूर मते मिळतील अशीच स्थिती आहे. रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठ...
Posts
Showing posts from May, 2024
- Get link
- X
- Other Apps
एके काळी भारतात आणि जगातील अनेक भागांत ख्रिस्ती धर्मगुरु आणि नन्स विविध क्षेत्रांत सेवाभावी वृत्तीने कार्यरत होते. अव्वल ब्रिटिश अमदानीत तर देशातील अनेक समाजसुधारकांनी ख्रिस्ती मिशनरी लोकांनी सुरु केलेल्या शाळांत शिक्षण घेतले. पुण्यात स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत शिकलेले जोतिबा फुले हे त्यापैकी एक प्रमुख नाव. एक काळ असा होता की समाजातील अनेक क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींनी ख्रिस्ती शाळांत आणि कॉलेजात शिक्षण घेतलेले असायचे. कारण त्यावेळेस भारतात सरकारी शाळानंतर सर्वाधिक मोठ्या संख्येने चालवल्या जाणाऱ्या शाळा ख्रिस्ती संस्थांच्या असत. त्याशिवाय शहरांत आणि ग्रामीण भागांत अनेक छोटेमोठे दवाखाने ख्रिस्ती मिशनरी चालवत असत. येथे आजारी लोकांना नाममात्र खर्चात आरोग्य सेवा मिळायची. त्या काळात शिक्षण क्षेत्रांचे आणि आरोग्य सेवांचे आजच्यासारखे बाजारीकरण किंवा खासगीकरण झालेले नव्हते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील संत लूक इस्पितळ किंवा शेवगाव येथील नित्य सेवा हॉस्पिटल ही काही वानगीदाखल नावे. या शाळांचा किंवा दवाखान्याचा धर्मांतरासाठी वापर केला जातो असा सर्रा...
- Get link
- X
- Other Apps
कामिल पारखे' हे नाव कसे आहे? म्हणजे ऐकायला कसे वाटते? आपल्याकडे कुठलेही नाव ऐकल्यावर मनात तत्क्षणी काही तरंग, प्रतिक्रिया उमटतातच. कधी सकारात्मक कधी नकारात्मक .. सुरुवातीलाच सांगतो, कामिल पारखे हे नाव आजच्या गुगल जगातही अगदी आगळेवेगळे आहे, अद्वितीय की काय म्हणतात तसे आहे. काही दिवसांपूर्वी सायबर कॅफेमधल्या एका पोराने मला माझा ईमेल विचारला, मी म्हणालो माझे कामिल पारखे हे नाव आणि Gmail.com. . तर तो म्हणाला, लकी आहात नावाबाबत, आम्हा लोकांना नावासह काही आकडे टाकावे लागते तेव्हा कुठे ईमेल तयार होतो. तेव्हा पुन्हा एकदा माझ्या नावाच्या युनिकपणाची जाणिव झाली. आजही या घडीला या पृथ्वीतलावर `कामिल पारखे' या नावाची दुसरी असामी नाही, आहे की नाही गंमत? काही नावे आणि आडनावे खूपच कॉमन असतात तशांपैकी हे नाव नक्कीच नाही. नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आम्ही पारखे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातले. मात्र शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुरात माझे आईवडील चाळीसच्या दशकात स्थायिक झाले होते. या जोडप्याच्या लहान बाळाला साठीच्या दशकाच्या उंबरठ...
- Get link
- X
- Other Apps
बारामतीकर. तसे पाहिले तर आम्ही मूळचे बारामतीकर. अगदी अलीकडच्या काळापर्यंत पुणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ होते. पुणे, बारामती आणि खेड. तर या बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या पिंपरी चिंचवड शहराचा अंतर्भाव होता. गोवा सोडून मी पुण्यात तात्पुरता स्थायिक झालो, डेक्कन जिमखाना येथे रानडे इन्स्टिट्युटसमोर लॉजमध्ये मंथली कॉट बेसिसवर चांगली तीनचार वर्षे राहिलो. लग्नानंतर मात्र सेटल व्हावे लागले. जॅकलिनची नोकरी चिंचवडला म्हणून तेथेच घर घेतले आणि अशाप्रकारे आम्ही निदान लोकसभा मतदार संघापुरते बारामतीकर बनलो. त्यावेळी खेड मतदारसंघात अशोक मोहोळ, विदुरा नवले, निवृत्ती शेरकर खासदार होते, नंतर किसनराव बाणखेले खासदार बनले, पुण्यातले खासदार मंडळी तर सर्वपरिचित आहेत. आमच्या बारामती मतदारसंघात मात्र खासदारांचे नेहेमीच एकच आडनाव असायचे. फक्त पहिले नाव बदलायचे. शरद पवार, अजित पवार, पुन्हा शरद पवार. त्यांच्या विरोधात नेहेमीच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असल्याने लोकसभा निवडणुकीत मतदान कुणाला करायचे याचा विचार करण्याची कधी गरजच भासली नाही. पण एकदा ती वेळ आली. त्याआधीची ही घटना सांगतो. उन्...
- Get link
- X
- Other Apps
आता मी जो अनुभव सांगणार आहे तसा अनुभव फार कमी लोकांच्या आयुष्यात आलेला असेल. अलीकडच्या अती सुरक्षेच्या काळात तर असे अनुभव फारच दुर्मिळ. आणीबाणीच्या काळातली ही घटना. इंदिराबाईंनी घोषित आणीबाणी शिथिल करुन लोकसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या. निवडणुका पार पडल्या होत्या आणि मतदान मोजणीची वेळ आली होती. त्याकाळी देशभरातील लोकसभा निवडणुका दोनतीन टप्प्यांत होऊन लगेच मतदान मोजणी होत असे. या काळात म्हणजे १९७८ ला मी सातारा जिल्ह्यात कराड येथे जेसुईट प्री-नॉव्हिस म्हणून टिळक हायस्कूलमध्ये अकरावीत शिकत होतो. त्या आधीच घटनाक्रम आता काहीच लक्षात नाही, मात्र निवडणूक पार पडल्यानंतर त्या दिवशी अगदी भल्या पहाटेच एका ट्रकने काही लोकांसह मी कराडहून सातारा येथे मतदान मोजणी केंद्रात पोहोचलो होतो हे आठवते. हा, एक स्पष्ट आठवते. ट्रकने प्रवास करणारे आम्ही सर्व जण जनता पक्षाचे आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचे विरोधक होतो. मतदान मोजणी केंद्रात जनता पक्षाचे पाठीराखे म्हणून आमची भुमिका असणार होती. आम्ही जनता पक्षाचे पोलिंग एजंट म्हणून काम करणार होतो. आम्ही लोक कराडच्या मतदार संघातील जनत...