
पंतप्रधान मोदी यांनी रोममध्ये वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीत पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली' काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका लेखात "पंतप्रधान मोदी यांनी रोममध्ये असताना वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीत जाऊन पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली' असे लिहिले होते. 'वाकडी वाट' हा शब्दप्रयोग मुद्दाम वापरला होता. कारण ख्रिस्ती धर्माचे परमाचार्य पोप फ्रान्सिस यांची त्यांच्या राष्ट्रात जाऊन गळाभेट घेणे, तिथे फोटोग्राफरच्या साक्षीने बायबलची प्रत भक्तिभावाने कपाळाला लावणे हा पंतप्रधान मोदीजींच्या आजवरच्या कारकिर्दीच्या रुळलेल्या आणि लोकांनाही अपेक्षित असलेल्या मार्गातील प्रवास निश्चितच नव्हता. इंडियन एक्स्प्रेसने ``पंतप्रधान मोदी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांना भेटणार'' या आशयाचा मथळा असलेली बातमी त्यादिवशी पान एक वरची पहिली बातमी किंवा लिड न्युज म्हणूनच छापली होती. केवळ अत्यंत अनपेक्षित आणि त्याचबरोबर अनेक दृष्टीकोनांतून महत्त्वाची असलेल्या बातमीलाच पान एकवरची ही जागा मिळत असते हे आता पत्रकारांबरोबरच वाचकांनासुद्धा बऱ्यापैकी माहित. झाले आहे. इतर किती इंग्रजी, मर...