त्यांचा 'त्या'च्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग द नवहिंद टाइम्स पणजी, गोवा डिसेंबर ३, १९८२ त्यांचा 'त्या'च्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कामिल पारखे पणजी, डिसेंबर ३ – जुन्या गोव्यातील बॉम जिझस बॅसिलिका परिसरातील हजारो यात्रेकरूंमध्ये आज एक 'अपरिचित' यात्रेकरूंचा छोटा समूह सेंट फ्रान्सिस झेवियरच्या दर्शनाला आला होता. या छोट्या समूहाने खूप लोकांच्या कित्येक वर्षांच्या ख्रिश्चन धर्माविषयी असलेल्या धारणांना, समजुतींना धक्का दिला. हा २७ जणांचा समूह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा ह्या गावावरुन आला होता व त्याचे नेतृत्व जेसुईट धर्मोपदेशक फादर प्रभूधर आणि संताजी नावाच्या तरुणाकडे होते. त्यांपैकी बहुसंख्य कॉलेजचे विद्यार्थी होते, तर काही फक्त १७ वर्षांचे होते. दररोज सुमारे ३५ कि.मी. अंतर कापत त्यांनी १४० कि.मी.चा प्रवास केला, तो देखील चारदिवसांत, पायी! त्यांचं वेगळेपण ते कट्टर कॅथॉलिक असले तरी लोकांना ते गात असलेल्या मराठी व कोंकणी भजनांवरून जाणवत होतं. विशेष म्हणजे ते भजनं टाळांच्या साथीने म्हणत होते. हे वारकरी मराठी संत नामजप करत होते व तुकारामांचे अभंगदेखील म्हणत हो...
Posts
Showing posts from October, 2020
‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर
- Get link
- X
- Other Apps
‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर October 12, 2020 lokmarathi Camil parkhe October 12, 2020 lokmarathi Camil parkhe कामिल पारखे रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्व शैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना ‘जय ख्रिस्त’ म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी – दादांशी – बोलू लागले. बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, “पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?” माझ्या वडिलांचे श्रीरामपुरात मुख्य बाजारपेठेत सोनार लेनमध्ये ‘पारखे टेलर्स’ हे टेलरिंगचे दुकान होते. शहरातील दोन-तीन प्र...
गोव्याचा कार्निव्हल : हा उत्सव भारतीय पर्यटकांना अपरिचितच राहिला आहे!
- Get link
- X
- Other Apps
गोव्याचा कार्निव्हल : हा उत्सव भारतीय पर्यटकांना अपरिचितच राहिला आहे! पडघम - सांस्कृतिक कामिल पारखे गोव्याच्या कार्निव्हलचे एक संग्रहित छायाचित्र Wed , 12 February 2020 पडघम सांस्कृतिक कार्निव्हल Carnival गोवा Goa किंग मोमो King Momo गोवा कार्निव्हल Goa Carnival कार्निव्हल हा गंमतीदार उत्सव भारतात फक्त गोव्यातच साजरा होतो. या उत्सवाचा प्रमुख असलेला किंग मोमो पणजीमध्ये जनतेसमोर जाहीरनामा वाचून शहरात चार दिवसांचा आपला अंमल जारी करतो आणि सर्वांना आपापल्या हौसमजा पूर्ण करून घेण्याची परवानगी वा आज्ञा देतो. थोडक्यात ‘खाओ, फिरो, मजा करो’ असाच या किंग मोमोचा हुकूम असतो. त्याची जनताही या औटघटकेच्या राजाची आज्ञा (मुकाट्याने नव्हे तर) अगदी आनंदाने, हसत-खेळत पाळते. ख्रिस्ती धर्मातील चाळीस दिवसांच्या उपवासकाळाच्या म्हणजे लेंट सिझनच्या चार दिवस आधी कार्निव्हल या उत्सवाची सुरुवात होते. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवार वा अॅश वेन्सडे या दिवसापासून हा उपवासकाळ सुरू होतो आणि येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरणाच्या दिवसापर्यंत म्हणजे गुड फ्रायडेला त्याची समाप्ती हो...
भव्य दिव्य सेंट पिटर स्क्वेअर
- Get link
- X
- Other Apps
भव्य दिव्य सेंट पिटर स्क्वेअर को वाडीस? बायबलमध्ये एक कथा आहे. येशू ख्रिस्त आपल्या खांद्यावर क्रूस घेऊन जातो आहे आणि त्यावेळेस आपल्या होणाऱ्या छळापासून सुटका घेण्यासाठी रोममधून पळ काढणाऱ्या सेंट पिटरची त्याची गाठ पडते. रोमकडे निघालेल्या आपल्या प्रभूला पाहून पिटर थक्क होतो. ''दोमिनी, को वाडीस ?'' 'प्रभूं, तू कुठे चाललास ? असे तो विचारतो. ''मी पुन्हा एकदा क्रुसावर मरायला निघालो आहे!'' येशू आपल्या सर्वात लाडक्या शिष्याला सांगतो आणि सेंट पिटरला आपली चूक समजते. येशू ख्रिस्ता च्या अनुयायांची रोममध्ये होणाऱ्या छळाची पर्वा न करता तो माघारी वळतो आणि रोमन साम्राज्याच्या या राजधानीत तो हौतात्म्य कवटाळतो. लॅटिन भाषेतील 'को वाडीस' (कुठे निघालास?) हा वाक्प्रचार त्यातील गर्भित आशयामुळे अनेक भाषांत रुढ झाला आहे. (बायबलमधील जुना करार हिब्रू भाषेत तर नवा करार ग्रीक भाषेत आहे. नंतरच्या काळात बायबलची आणि चर्चची अधिकृत भाषा लॅटिन बनली.) सेंट पिटरने आणि इतर अनेक ख्रिस्ती लोकांनी रोममध्ये हौतात्म्य स्वीकारल...