पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा गोव्यातील पूर्णाकृती पुतळा आधी फोडला गेला, मग हटवला गेला, त्याची गोष्ट
पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा गोव्यातील पूर्णाकृती पुतळा आधी फोडला गेला, मग हटवला गेला, त्याची गोष्ट पडघम - साहित्यिक कामिल पारखे पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा गोव्यातील पुतळा Fri , 31 July 2020 पडघम साहित्यिक लुई वाझ डी केमॉईस Luís Vaz de Camões जॉर्ज फ्लॉयड George Floyd ब्लॅक लाइव्हज मॅटर्स Black Lives Matters काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीची मान एका श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने आपल्या गुढघ्याखाली दाबून धरल्याने त्याचा घुसमुटून मृत्यू झाला. त्यानंतर तीव्र झालेल्या ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनांतर्गत अमेरिका, युरोपमध्ये विन्स्टन चर्चिल, कोलंबस, एडवर्ड कोल्स्टन यांचे पुतळे पाडले गेले. कारण हे लोक साम्राज्यवादी वा त्याचे समर्थक होते. ३७ वर्षांपूर्वी गोव्यातही पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा पुतळाही याच कारणांवरून पाडला गेला होता. त्याची ही हकिकत... ... १. गोव्याला पर्यटक म्हणून येणारे बहुतेक सर्व जण जुन्या गोव्याला हमखास भेट देतात. कारण म्हणजे त्याचे मध्ययुगीन काळातले स्थान आणि त्या ऐतिहासिक काळ...