गोव्यातल्या सर्वात लोकप्रिय नाश्त्याच्या चमचमीत आठवणी.. Goa Bhaji Pao .
गोव्यातल्या सर्वात लोकप्रिय नाश्त्याच्या चमचमीत आठवणी... ... गोव्यात सगळीकडे नवीन पहाट उगवते ती एका विशिष्ट आवाजाने. 'पुई-पुई' यासारखा तो आवाज असतो. तुमच्या परिसरात पाववाला आल्याची ती वर्दी असते. पूर्वी ऑटोरिक्षांना हॉर्नसाठी हवेच्या दाबावर काम करणारे उपकरण असते, त्याचा गोलाकार रबरी भाग दाबला कि त्या 'पुई-पुई' असा आवाज यायचा. तेच उपकरण आपल्या सायकलच्या हँडलवर बसवून, त्यातून आवाज काढत गोव्यात हे पाववाले किंवा पोदेर घरोघरी आपल्या आगमनाची खबर देत असतात. आपल्या सायकलवर विविध प्रकारचे पाव प्लास्टिकच्या कापडांत झाकून पाववाला यावेळी येतो. पोर्तुगीज भाषेत पाववाल्याला किंवा बेकरी मालकास पोदेर म्हटले जाते. पुण्यात दुधाच्या पिशव्यांसाठी फ्लॅटच्या बाहेर ग्रिलमध्ये सकाळी पिशव्या लटकवलेल्या असतात तसे गोव्यात प्रत्येक घराच्या कुंपणाच्या दरवाजापाशी पावांसाठी पिशव्या टांगलेल्या असतात. प्रत्येक घराचा सकाळचा आणि संध्याकाळचा वेगवेगळ्या पावांचा रतीब ठरलेला असतो. कमीजास्त मागणी असेल तर आधी तसे सांगावे लागते. मागे अंजुना-वागातोर समुद्रकिनारी असलेल्या बहिणीच्या घरी सुट्टीसाठी आ...