आमची कॉम्रेडगिरी We as comrades
गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८ आमची कॉम्रेडगिरी सोमवार , १० सप्टेंबर, २०१८ कामिल पारखे कम्युनिस्टांना कॉम्रेड तर समाजवाद्यांना साथी म्हणून संबोधण्याची पद्धत १९७०च्या दशकात चांगलीच होती. त्या काळात पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या 'कॉम्रेड'गिरीच्या काही आठवणी. मी गोव्यात हायर सेकंडरीसाठी मिरामारच्या धेम्पे कॉलेजात दाखल झालो तेव्हा हिप्पी युग नुकतेच संपत आले होते. १९७०च्या दशकात गोव्यात पर्यटन आजच्याइतके वाढले नव्हते. गोवा भारत संघराज्यात सामील होऊन आताशी कुठे एक तप उलटले होते आणि आम्हाला शिकवणाऱ्या प्राध्यापकवर्गापैकी काही जण पोर्तुगीजांच्या लायसेममध्ये पोर्तुगीज भाषेत शिकलेले असल्यामुळे इंग्रजीत शिकवताना अक्षरशः: अडखळत आणि धडपडत होते. आणि याकाळात आम्हा युवकांमध्ये चळवळीची लाट पसरत होती. गोव्यात नुकत्याच स्थापना झालेल्या ऑल गोवा स्टुडन्टस युनियनने (आग्सु) त्यावेळी विद्यार्थ्याना बसच्या प्रवासासाठी निम्मे प्रवासभाडे असावे यासाठी आंदोलन सुरू केले. मला सीनियर असलेले सतीश सोनक आणि नंदकुमार कामत त्यावेळी आग्सुचे नेते होते. गोव्यात त्यावेळी फक...