हॉल ऑफ फेम - कराड येथे टिळक हायस्कुलात मी अकरावीला शिकत होतो तेव्हा तिथल्या ऑफिसाशेजारी लावलेल्या एका फलकाकडे माझे नेहेमी लक्ष जायचे. संपूर्ण महाराष्ट्रात खूप वर्षांपूर्वी दहावीच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शाळेतील एका विद्यार्थ्यांचे नाव त्यावर लिहिले होते. त्या फलकावर त्या एका नावाशिवाय खाली इतर नावे होती कि नव्हती ते आता आठवतही नाही, मात्र ते पहिले नाव अगदी लख्ख आठवते. ते नाव होते वि. स. पागे. त्यावेळी मी विद्यार्थी होतो तरी हे वि. स. पागे त्याकाळात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते हे मला माहित होते, त्यामुळेच तो फलक आणि ते नाव आतापर्यंत कायम आठवणीत राहिले. रोजगार हमी योजनेचे (रोहयो) जनक असलेल्या विठ्ठल सखाराम पागे यांनी १९६०-१९७८ ही १८ वर्षे सलगपणे विधानपरिषदेचे सभापतीपद सांभाळले होते. . त्या काळात केंद्रीय मंत्री म्हणून महत्त्वाची खाते सांभाळणारे यशवंतराव चव्हाण हे सुद्धा याच टिळक विद्यालयाचे विद्यार्थी. त्यांचा शाळेत कुठेही नामफलक नसला तरी शाळेच्या आवारात यशवंतरावांचा एक अर्धपुतळा होता. ते शैक्षणिक साल होते १९७६-७७, काळ आणीबाणीचा ह...
Posts
Showing posts from September, 2024