सत्ताबदल भारतात अनेक वर्षे केंद्रात आणि सर्व राज्यांत काँग्रेस पक्षाची सत्ता होती. काँग्रेसच्या या निरकुंश सत्तेला पहिला जोरदार धक्का बसला तो १९६७ साली. .

त्यानंतर देशात सर्वांत मोठा सत्ताबदल झाला तो १९७७ साली, इंदिराबाईनीं आणीबाणी शिथिल करून निवडणूका घेतल्या तेव्हा.
त्यावेळी मी केंद्रीय मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या कराड शहरात अकरावीला होतो. आणीबाणीपूर्व काळ, आणीबाणीचा काळ मी जसा अनुभवाला तसा आणिबाणीत्तोर काळही मी अनुभवला.
सत्ताबदल कसा होतो हे त्यावेळी मी पहिल्यांदा अनुभवले. (नंतर पत्रकार म्हणून अनेक निवडणुका अगदी जवळून बघितल्या.)
त्यावेळच्या १९७७ लोकसभा निवडणुकात कॉग्रेस पक्षाला पहिल्यांदाच जबर धक्का बसला.
दक्षिण भारतात महाराष्ट्राने काँग्रेसविरोधी लाट काही प्रमाणात थोपवली. राज्यातील एकूण ४८ जागांपैकीं निम्म्या जागा काँग्रेस पक्षाने गमावल्या
महाराष्ट्रात कोंग्रेसच्या या पराभवाचे एक महत्त्वाचे कारण काही अराजकीय व्यक्तीनीं घेतलेल्या सक्रिय भूमिका होत्या.
त्याआधी एकदोन वर्षे इचलकरंजी आणि नंतर कराडला मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. पन्नासाव्या इचलकरंजी संमेलनाचे पु, ल, देशपांडे अध्यक्ष
आणि नंतरच्या कराडच्या संमेलनाच्या अध्यक्ष दुर्गा भागवत होत्या.
ही दोन्ही संमेलने महाराष्ट्रात गाजली तशी आतापर्यंत इतर कुठलीही गाजली नाही.
आणिबाणी असतानासुद्धा
निवडणूक कार्यक्रम १९७७ च्या फेब्रुवारीत जाहीर झाला आणि हे दोन्ही साहित्य संमेलनाध्यक्ष चक्क शहराशहरांत, गावोगावी जाहीर सभांतून भाषणे करू लागले.
या दोघा साहित्यिक आणि बिगरराजकीय व्यक्तीनीं राज्यात निदान शहरी भागांत राजकीय मतपरिवर्तन करण्यास फार मोठी मोलाची कामगिरी केली.
आणिबाणीकाळात मौन धारण केलेल्या प्रसारमाध्यमांनी त्या निवडणुकीच्या काळात पूर्णतः काँग्रेसविरोधी आणि जनता पक्षाला अनुकूल अशी भूमिका घेतली होती.
मुंबईत राम जेठमलानी आणि सुब्रह्मण स्वामीसह जनता पक्षाचे इतर उमेदवार निवडून आले, पुण्यात मोहन धारिया आणि बारामतीत संभाजीराव काकडे.
त्यानंतरचा मोठा सत्ताबदल अडीच वर्षांतच झाला.
लोकांनीं इंदिराबाईना पुन्हा आणि आधीपेक्षाही अधिक जागा घेऊन सत्तेवर आणले.
प्रसारमाध्यमांची यावेळेस सुद्धा मौल्यवान भूमिका होतीच.
राजीव गांधीची काँग्रेस १९८९ला पराभूत झाल्यावर जनता दलाचा अल्पकालीन प्रयोग झाला. पी व्ही नरसिंह राव यांच्यानंतर पुन्हा जनता दल सरकार झाले. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने देशात काही काळ राजकीय स्थिरता पुरवली.
मात्र `शायनिंग इंडिया' वातावरण असूनसुद्धा जनतेने सोनिया गांधींच्या काँग्रेसला सत्तेवर दहा वर्षांसाठी आणले.
हा सत्ताबदल सर्वांसाठी - अगदी काँग्रेस पक्षासाठीसुद्धा - अनपेक्षित होता.
पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या फेरीत अनेक लोक आंदोलने झाली.
त्याशिवाय सरकारविरोधी जनमत करण्यात प्रसारमाध्यमे आघाडीवर होती.
भाजपने २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवून सरकार स्थापन केले.
राज्यांत आणि देशात वेळोवेळी सत्ताबदल किंवा सत्तेत पुनरागमन होण्यासाठी अशा अनेक बाबी महत्त्वाच्या ठरतात.
काही बाबी अगदी उघड असतात, काही सुप्त असतात.
Camil Parkhe,

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

A day at Mother Teresa’s Home for Destitutes