नूतन वर्षाचा आरंभ. गोव्यात मी शिकत असताना तिथल्या कॅथोलिक म्हणजे किरिस्ताव लोकांसाठी तीन दिवस किंवा फेस्त खूप महत्त्वाचे असायचे. हे तीन फेस्त म्हणजे २५ डिसेंबरचा ख्रिसमस, सेंट फ्रान्सिस झेव्हियरचा तीन डिसेंबरला येणारा आणि पब्लिक हॉलिडे असणारा फेस्त आणि 31st डिसेंबरची रात्र म्हणजेच नूतन वर्षाचा आरंभ. तर पणजीतल्या The Navhind Times या इंग्रजी दैनिकात मी बातमीदार होतो तेव्हाची ही गोष्ट. आमच्या या इंग्रजी दैनिकात अनेक कामगार लायनो मशिन ऑपरेटर, फोरमन, वगैरे ख्रिस्ती होते आणि या पेद्रु, मिंगेल, कॅजिटन, रिबेलो वगैरे मंडळींना ख्रिसमसची २५ डिसेंबरला मध्यरात्री होणाऱ्या प्रार्थनाविधीसाठी सुट्टी द्यावी अशी मागणी असायची. या दिवशी गोव्यात इंग्रजी दैनिकातील जाहिराती वगैरे आर्थिक बाबी विचारात घेता हे शक्य नसायचे. .. मग या सर्व कामगारांना तडजोड म्हणून ३१ डिसेंबरच्या न्यु इयर बॉलला म्हणजे डान्सला हजेरी लावण्यासाठी पाने लवकर लावून जाण्याची मुभा असे आणि १ जानेवारी रोजी The Navhind Times आणि मराठी जुळे दैनिक 1नवप्रभा' कामगारांना चक्क सुट्टी असायची. . नववर्षाला बंद असणारे द नवहिंद टाइम...
Posts
Showing posts from January, 2024