ख्रिस्ती समाज : महाराष्ट्रातला आणि देशातल्या अनेक भागांतील ख्रिस्ती समाज फारच सोशिक, सहनशील आणि शांतताप्रिय समजला जातो. 'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा' या बाबासाहेबांच्या संदेशातील शिकण्याबाबत या समाजाने मनावर घेतले तरी बाकी दोन बाबतींत आनंदीआनंद आहे. या समाजावर अन्याय झाला, खूपच गळ्यापाशी आले तरच हा समाज रस्त्यावर येतो, मेणबत्ती पेटवून आणि शांतता मोर्चा घेऊन. महाराष्ट्रातील अनेक शहरांत पुष्कळदा आंबेडकरवादी संघटना आणि त्यांचे नेते त्यांना पाठबळ देण्यासाठी पुढे येत असतात. ख्रिस्ती समाज सामाजिक चळवळीपासून स्वतःला नेहेमी चार हात दूर ठेवत असला तरीसुद्धा. सुगावा प्रकाशनाचे प्रा विलास वाघ सर मला म्हणायचे, ``कामिल, तुमचे लोक फारच शांत, `एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे कर' हा येशूचा संदेश तुम्ही लोकांनी फारच मनावर घेतलाय !'' मला आठवते माझ्या लहानपणी खूप वर्षांपूर्वी हा समाज रस्त्यावर आला होता ते खासदार ओ पी त्यागी यांनी आणलेल्या धर्मांतर स्वातंत्र्य (म्हणजेच धर्मांतरविरोधी) विधेयकाला विरोध करण्यासाठी. (आता हा कायदा प्रॅक्टिकली देशात सगळीकडे अंमलातही आला आहे ) ...
Posts
Showing posts from July, 2023