
महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारसरणी देशात आणि राज्यात आज काहीही परिस्थिती असली तरी महाराष्ट्रात आजही महात्मा फुले, शा\'हू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रागतिक वारसा चालू आहे याचा प्रत्यय काल आला. महाराष्ट्रात वर्षांतून अनेक शहरांत काही ठराविक दिवशी प्रागतिक विचारसरणीच्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते, त्यापैकी एक दिवस म्हणजे सहा डिसेंबर काल होता. कोरोना काळात मोठा खंड पडल्यानंतर काल पहिल्यांदाच पुन्हा एकदा या पुस्तक महोत्सवात गेलो आणि खूप बरं वाटलं. महाराष्ट्र देशी वेळोवेळी होणाऱ्या विविध राज्यस्तरीय, प्रादेशिक आणि इतर साहित्य संमेलनात भरपूर पुस्तक विक्री होते. पण केवळ महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारसरणीला वाहिलेल्या ग्रंथाची आणि पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते ती ठिकाणे आणि दिवस विशिष्ट आहेत. हे दिवस म्हणजे एप्रिल बाबासाहेबांची १४ एप्रिलची जयंती, दसरा किंवा नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचे आपल्या अनुयायांबरोबर नागपूरला दीक्षाभूमीवर झालेले धर्मांतर, आणि सहा डिसें...