ग. दि. माडगूळकर गेली अनेक वर्षे पुणे मुंबई महामार्ग माझ्या रोजच्या वहिवाटीचा रस्ता राहिलेला आहे. वाकडेवाडी येथे सिटी बस स्टॉपवर उतरले की मग रस्ता ओलांडून आधी फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या `टाइम्स ऑफ इंडिया' आणि त्यानंतर `साखर संकुल'पाशी असलेल्या `सकाळ टाइम्स' या माझ्या कार्यालयाची वाट धरायची हा माझा नेहमीचा शिरस्ता. रस्ता ओलांडला की माझी नजर आपसूक तिथल्या बैठ्या प्रशस्त कौलारु घराकडे जायची, आजही जाते. मी कितीही घाईत असलो, अगदी घड्याळाच्या काट्याशी शर्यत चालू असली तरी एक नजर त्या वास्तूकडे जातेच. सावकाश चालत असलो तर मग त्या बंगलीच्या आजूबाजूच्या जागांकडे नीट पहिले जाते, बंद दारे आणि खिडक्या, कौलांवर साचलेली झाडांची सुकलेली पाने, पार्किंगमधली वाहने याकडे नीट लक्ष जाते. यापैकी कधीही न चुकता पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे वास्तूचा `पंचवटी' हा नामफलक आणि तिथे अगदी प्रथमदर्शनी असणारा तो छोटासा नीलफलक आणि त्यावरची ती अक्षरे. '' पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती - `गीतरामायण'कार ग. दि. माडगूळकर (१९१९-१९७७) येथे राहत होते (१९५३-१९७७). '' खूप वर्षांपूर्वी एकद...
Posts
Showing posts from July, 2022