श्रीरामपुरात आमची ती चाळ बहुजातिय आणि बहुधर्मिय होती श्रीरामपुरात आम्ही राहायचो ती चाळ बहुजातिय आणि बहुधर्मिय होती. आमच्या कुडाच्या घराला एका भिंतीला लागून आणि समोर अशी दोन मुसलमान घरं होती. दुसऱ्या भिंतीला लागून मराठा जातीचं घर तर समोर ओळीने तीन घरं माळी कुटुंबाची होती. दुसऱ्या एका टोकाला आणखी एक मुसलमान घर होतं. थोड्या अंतरावर असलेल्या एकमजली इमारतीत इतर जातींतली आणि मारवाडी समाजाची घरं होती तर चाळीच्या अगदी शेवटच्या टोकाला दगडी बांधकामाची बैठी घरं होती. चार दशकांपूर्वी श्रीरामपूर सोडून मी गोव्याला गेलो तरी मला ती सगळी घरं, तिथली कुटुंबे आणि या सर्व शेजाऱ्यांचे आपापसांतले व्यवहार अजूनही ठळकपणे आठवतात. लहानपणी मला आमच्या या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या वेगळ्यापणाची जाणिव झाली ती त्या घरांतल्या बायांच्या कपाळांवरुन. माझी आई दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर कुंकवाचा करंडा समोर ठेवून आधी कपाळावर गोल मेण लावायची आणि त्यानंतर त्या गोलावर कुंकू लावायची. मेणामुळे बहुधा कुंकू कपाळावर घट्ट राहायचे. समोरच्या माळी घरांतल्या सगळ्या बाया मात्र कपाळावर मध्यभागी कुंकवाची आडवी बारीकशी चिर लावायच्य...
Posts
Showing posts from February, 2022