पत्रकारितेचा श्रीगणेशा

सर, आर यु एम्प्टी नाऊ ?" माझ्या या प्रश्नावर गोव्यातील मिरामारच्या धेम्पे कॉलेजमधील त्या स्टाफ रुममध्ये एकदम शांतता पसरली. एकदोन महिला शिक्षकांनी टेबलावरील आपली पुस्तके उचलून ताबडतोब दाराकडे वाटचाल केली. बाकीच्यांनी आपसातील संभाषण थांबवून क्षणभर माझ्याकडे रोखून पाहून लगेचच माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे दाखवत समोरचे वृत्तपत्र चाळण्यास सुरुवात केली. ज्यांना मी हा प्रश्न विचारला ते प्राध्यापक अफ़ॉन्सो तसे ज्येष्ठ शिक्षक असल्याने स्टाफ रूममधील कुणीही या प्रश्नावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले होते. प्राध्यापक अफ़ॉन्सो यांनी मात्र प्रसंगावधान राखत त्यांना मी विचारलेला हा अवघड प्रश्न अगदी कुशलतेने हाताळला होता. ''यस जॉन, आय एम फ्री नाऊ... टेल मी, व्हाट डू यु वॉन्ट ?" त्यांनी लगेचच मला प्रतिसाद दिला होता. त्यांच्या त्या उत्तराने कॉलेजच्या त्या स्टाफ रुममध्ये माझ्या प्रश्नानंतर एकदम सन्नाटा का पसरला होता हे मला लगेच कळाले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या स्टाफ रुममधील उपप्राचार्य आणि रसायनशास्त्राचे विभागप्रमुख साखरदांडे सर, इंग्रजीच्या शिक...