Posts

Image
हॉल  ऑफ फेम  -  कराड येथे टिळक हायस्कुलात मी अकरावीला शिकत होतो तेव्हा तिथल्या ऑफिसाशेजारी लावलेल्या एका फलकाकडे माझे नेहेमी लक्ष जायचे. संपूर्ण महाराष्ट्रात खूप वर्षांपूर्वी दहावीच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शाळेतील एका विद्यार्थ्यांचे नाव त्यावर लिहिले होते. त्या फलकावर त्या एका नावाशिवाय खाली इतर नावे होती कि नव्हती ते आता आठवतही नाही, मात्र ते पहिले नाव अगदी लख्ख आठवते. ते नाव होते वि. स. पागे. त्यावेळी मी विद्यार्थी होतो तरी हे वि. स. पागे त्याकाळात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते हे मला माहित होते, त्यामुळेच तो फलक आणि ते नाव आतापर्यंत कायम आठवणीत राहिले. रोजगार हमी योजनेचे (रोहयो) जनक असलेल्या विठ्ठल सखाराम पागे यांनी १९६०-१९७८ ही १८ वर्षे सलगपणे विधानपरिषदेचे सभापतीपद सांभाळले होते. . त्या काळात केंद्रीय मंत्री म्हणून महत्त्वाची खाते सांभाळणारे यशवंतराव चव्हाण हे सुद्धा याच टिळक विद्यालयाचे विद्यार्थी. त्यांचा शाळेत कुठेही नामफलक नसला तरी शाळेच्या आवारात यशवंतरावांचा एक अर्धपुतळा होता. ते शैक्षणिक साल होते १९७६-७७, काळ आणीबाणीचा होता आणि पंतप्र
Image
  फ्रान्सिस न्यूटन सोझा मुंबईतल्या सेंट झेव्हियर्स स्कूल या एका नावाजलेल्या शाळेतील मुलांच्या मुतारीत काही अश्लील चित्रे रेखाटलेली दिसून आली आणि हे प्रकरण शाळेच्या उपप्राचार्यांपर्यंत पोहोचले. ही आताची नाही, खूप जुनी, स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना आहे. सेंट झेव्हियर्स हायस्कूल ही जेसुईट फादरांची संस्था. त्याकाळात ही शाळा स्पॅनिश जेसुईट्स चालवत होते. जेसुइटस फादर्स शिस्तीबाबत किती कडक असतात हे सांगायलाच नको. या शाळेतला तेरा वर्षांचा एक विद्यार्थी चित्रकलेत पारंगत होता आणि त्याचे हे कसब जेसुईट फादरांनाही चांगले माहित होते. त्यामुळे जेव्हाजेव्हा मुतारींत अशी काही रेखाटने यायची तेव्हातेव्हा या मुलावर कायम संशय असायचा. यावेळीही असेच झाले होते. साहजिकच त्या मुलाला - फ्रान्सिस न्यूटन सोझा त्याचे नाव - बोलावण्यात आले. मुतारीतली ही अश्लील भित्तीचित्रे म्हणजे मुलांमुलींच्या अवयवांची रेखाटणी होती. Anatomical designs मात्र त्या मुलाने यासंदर्भात त्याच्यावर केलेले आरोप पूर्णतः मान्य केले नाही अथवा फेटाळलेसुध्दा नाही. त्या मुलाचा याबाबतीतले स्पष्टीकरण किंवा बचाव मात्र धक्कादायक होता. ``मुत
Image
मराठी ई-बुक्स या दोन घटना लागोपाठ घडल्या. पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या जेसुईट फादरांच्या `स्नेहसदन' येथे `निरोप्या' मासिकाच्या (वय अवघे १२० वर्षे ) ऑफिसात गेलो होतो. तेथून बाहेर पडल्यावर समोरच असलेल्या `मॅजेस्टिक' बुक स्टॉलमध्ये गेलो. माझा हा नेहमीचा शिरस्ता आहे. पुस्तक घ्यायचे नाही, असा दुसरा शिरस्त्याचा निर्धार असतानाही शेवटी खरेदी ही झालीच. गोविंद तळवलकर यांचे `पुष्पांजली' खंड दुसरा हे पुस्तक बॅगेत टाकून आलो आणि परतीच्या मेट्रो प्रवासात वाचायला सुरुवातही केली. `महाराष्ट्र टाइम्स'मध्ये १९८० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या मृत्युलेखांचे हे संकलन आहे. काही ठराविक, मला परिचित आणि आवडीच्या क्षेत्रांतील व्यक्तींवर असलेलेच लेख वाचायचा उद्देश होता. त्यामुळे एका परदेशी दांपत्याविषयी असलेला लेख टाळून मी पुढील लेख वाचत गेलो. थोड्या वेळाने पुन्हा त्याच लेखावर नजर गेली आणि पहिली ओळ वाचताच थबकलो. तो लेख विल ड्युरंट आणि त्यांची पत्नी एरीयल ड्युरंट यांच्याविषयी होता. विल ड्युरंट यांनी लिहिलेल्या `हिस्टरी ऑफ फिलॉसॉफी' या जाडजूड ग्रंथाची गोव्यात शिकताना मी अक्षरशः पारायणे केल
Image
  अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळचा कम्युनिस्ट विचारसरणीचा बालेकिल्ला.. इथले नंतर राज्यात आणि केंद्रात प्रस्थापित झालेले अनेक नेते मूळचे कम्युनिस्ट विचारधारेचे. मला आठवते ती इथली पहिली लोकसभेची निवडणूक १९७१ सालची. त्यावेळचे तेव्हाच्या कोपरगाव मतदारसंघातले सर्वांत तगडे उमेदवार होते कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड पी. बी. कडू पाटील आणि त्यांच्या विरोधात होते होतकरु तरुण उमेदवार एकनाथ विठ्ठलराव विखे पाटील. निवडणूक प्रचारादरम्यान या दोघांना त्यावेळी श्रीरामपूर येथे आमच्या `पारखे टेलर्स' दुकानासमोर मी पाहिले. कॉम्रेड कडू पाटील यांची प्रचारात आघाडी होती. इंदिराबाईंच्या `गरिबी हटाव'च्या त्या लाटेत निवडणूक अर्थात बाळासाहेब विखे जिंकले आणि त्यानंतर जिल्ह्यातला कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव ओसरत गेला, राज्यात सुद्धा. आताचा शिर्डी मतदारसंघ राखीव झाला, त्यामुळे विखे घराण्याने शेजारच्या अहमदनगर मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. तरी शिर्डी मतदारसंघात विखे चालवतील त्या उमेदवाराला भरपूर मते मिळतील अशीच स्थिती आहे. रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठ
Image
एके काळी भारतात आणि जगातील अनेक भागांत ख्रिस्ती धर्मगुरु आणि नन्स विविध क्षेत्रांत सेवाभावी वृत्तीने कार्यरत होते. अव्वल ब्रिटिश अमदानीत तर देशातील अनेक समाजसुधारकांनी ख्रिस्ती मिशनरी लोकांनी सुरु केलेल्या शाळांत शिक्षण घेतले. पुण्यात स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत शिकलेले जोतिबा फुले हे त्यापैकी एक प्रमुख नाव. एक काळ असा होता की समाजातील अनेक क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींनी ख्रिस्ती शाळांत आणि कॉलेजात शिक्षण घेतलेले असायचे. कारण त्यावेळेस भारतात सरकारी शाळानंतर सर्वाधिक मोठ्या संख्येने चालवल्या जाणाऱ्या शाळा ख्रिस्ती संस्थांच्या असत. त्याशिवाय शहरांत आणि ग्रामीण भागांत अनेक छोटेमोठे दवाखाने ख्रिस्ती मिशनरी चालवत असत. येथे आजारी लोकांना नाममात्र खर्चात आरोग्य सेवा मिळायची. त्या काळात शिक्षण क्षेत्रांचे आणि आरोग्य सेवांचे आजच्यासारखे बाजारीकरण किंवा खासगीकरण झालेले नव्हते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील संत लूक इस्पितळ किंवा शेवगाव येथील नित्य सेवा हॉस्पिटल ही काही वानगीदाखल नावे. या शाळांचा किंवा दवाखान्याचा धर्मांतरासाठी वापर केला जातो असा सर्रा
Image
  कामिल पारखे' हे नाव कसे आहे? म्हणजे ऐकायला कसे वाटते? आपल्याकडे कुठलेही नाव ऐकल्यावर मनात तत्क्षणी काही तरंग, प्रतिक्रिया उमटतातच. कधी सकारात्मक कधी नकारात्मक .. सुरुवातीलाच सांगतो, कामिल पारखे हे नाव आजच्या गुगल जगातही अगदी आगळेवेगळे आहे, अद्वितीय की काय म्हणतात तसे आहे. काही दिवसांपूर्वी सायबर कॅफेमधल्या एका पोराने मला माझा ईमेल विचारला, मी म्हणालो माझे कामिल पारखे हे नाव आणि Gmail.com. . तर तो म्हणाला, लकी आहात नावाबाबत, आम्हा लोकांना नावासह काही आकडे टाकावे लागते तेव्हा कुठे ईमेल तयार होतो. तेव्हा पुन्हा एकदा माझ्या नावाच्या युनिकपणाची जाणिव झाली. आजही या घडीला या पृथ्वीतलावर `कामिल पारखे' या नावाची दुसरी असामी नाही, आहे की नाही गंमत? काही नावे आणि आडनावे खूपच कॉमन असतात तशांपैकी हे नाव नक्कीच नाही. नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आम्ही पारखे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातले. मात्र शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुरात माझे आईवडील चाळीसच्या दशकात स्थायिक झाले होते. या जोडप्याच्या लहान बाळाला साठीच्या दशकाच्या उंबरठ