Posts

Showing posts from June, 2024
Image
  फ्रान्सिस न्यूटन सोझा मुंबईतल्या सेंट झेव्हियर्स स्कूल या एका नावाजलेल्या शाळेतील मुलांच्या मुतारीत काही अश्लील चित्रे रेखाटलेली दिसून आली आणि हे प्रकरण शाळेच्या उपप्राचार्यांपर्यंत पोहोचले. ही आताची नाही, खूप जुनी, स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना आहे. सेंट झेव्हियर्स हायस्कूल ही जेसुईट फादरांची संस्था. त्याकाळात ही शाळा स्पॅनिश जेसुईट्स चालवत होते. जेसुइटस फादर्स शिस्तीबाबत किती कडक असतात हे सांगायलाच नको. या शाळेतला तेरा वर्षांचा एक विद्यार्थी चित्रकलेत पारंगत होता आणि त्याचे हे कसब जेसुईट फादरांनाही चांगले माहित होते. त्यामुळे जेव्हाजेव्हा मुतारींत अशी काही रेखाटने यायची तेव्हातेव्हा या मुलावर कायम संशय असायचा. यावेळीही असेच झाले होते. साहजिकच त्या मुलाला - फ्रान्सिस न्यूटन सोझा त्याचे नाव - बोलावण्यात आले. मुतारीतली ही अश्लील भित्तीचित्रे म्हणजे मुलांमुलींच्या अवयवांची रेखाटणी होती. Anatomical designs मात्र त्या मुलाने यासंदर्भात त्याच्यावर केलेले आरोप पूर्णतः मान्य केले नाही अथवा फेटाळलेसुध्दा नाही. त्या मुलाचा याबाबतीतले स्पष्टीकरण किंवा बचाव मात्र धक्कादायक होता. ``मुत
Image
मराठी ई-बुक्स या दोन घटना लागोपाठ घडल्या. पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या जेसुईट फादरांच्या `स्नेहसदन' येथे `निरोप्या' मासिकाच्या (वय अवघे १२० वर्षे ) ऑफिसात गेलो होतो. तेथून बाहेर पडल्यावर समोरच असलेल्या `मॅजेस्टिक' बुक स्टॉलमध्ये गेलो. माझा हा नेहमीचा शिरस्ता आहे. पुस्तक घ्यायचे नाही, असा दुसरा शिरस्त्याचा निर्धार असतानाही शेवटी खरेदी ही झालीच. गोविंद तळवलकर यांचे `पुष्पांजली' खंड दुसरा हे पुस्तक बॅगेत टाकून आलो आणि परतीच्या मेट्रो प्रवासात वाचायला सुरुवातही केली. `महाराष्ट्र टाइम्स'मध्ये १९८० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या मृत्युलेखांचे हे संकलन आहे. काही ठराविक, मला परिचित आणि आवडीच्या क्षेत्रांतील व्यक्तींवर असलेलेच लेख वाचायचा उद्देश होता. त्यामुळे एका परदेशी दांपत्याविषयी असलेला लेख टाळून मी पुढील लेख वाचत गेलो. थोड्या वेळाने पुन्हा त्याच लेखावर नजर गेली आणि पहिली ओळ वाचताच थबकलो. तो लेख विल ड्युरंट आणि त्यांची पत्नी एरीयल ड्युरंट यांच्याविषयी होता. विल ड्युरंट यांनी लिहिलेल्या `हिस्टरी ऑफ फिलॉसॉफी' या जाडजूड ग्रंथाची गोव्यात शिकताना मी अक्षरशः पारायणे केल