Posts

Showing posts from December, 2023
Image
  श्रीरामपूरला सोमैया हायस्कूलमध्ये आठवीनववीत शिकत असताना रविंद्र धुप्पड हा माझा अगदी जवळचा मित्र होता. आम्हा दोघांत काहीही समान धागे नसताना आम्ही दोघे इतके जवळचे मित्र कसे बनलो याचे आज या क्षणाला आठवत नाही, मात्र त्याबद्दल आश्चर्य नक्कीच वाटते. मी आमच्या शाळेजवळ राहणारा तर धुप्पड संगमनेर रोडवर चौगुले इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणारा. त्याच्यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदा इमारतीत फ्लॅट कसा असतो हे पाहिले. निळ्या रंगाचा लँडलाईन फोनसुद्धा पहिल्यांदा मी धुप्पडच्या घरात पाहिला, त्या फोनची रिंगटोन ऐकली. पुढचे आणि मागचे असे दोन दारे असलेल्या आमच्या घरात धुप्पडचा इथून तिथे सगळीकडे वावर असायचा. आमच्या घरातील सर्वांशी म्हणजे दादांशी, बाईशी, सगळ्या भाऊ बहिणी आणि वहिनी यांच्याशी त्याचा मराठीत चांगला संवाद असायचा. आमच्या स्वयंपाकघरात लाकडी भूशाच्या शेगडीवरच्या पातेल्यांत काय शिजते आहे याचीही त्याला पूर्ण कल्पना असायची, पण आमच्या संबंधात त्यामुळे काही बाधा आली नाही. माझा सर्वांत थोरला भाऊ फ्रान्सिस धुप्पडला त्याच्या घरच्या नावाने `किले' म्हणूनच हाक मारायचा. शाळेतल्या इतर मित्रांप्रमाणे आम्ह...