गोपाळराव जोशी .. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास गोपाळराव जोशी हे नाव वगळून पूर्ण होऊच शकत नाही . आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी मिळवणाऱ्या डॉक्टर होणाऱ्या हिंदुस्थानातल्या पहिल्या महिला आनंदीबाई जोशी यांचे पती म्हणून गोपाळराव जोशी ओळखले जात असले तरी ही त्यांची पूर्ण ओळख नाही . इतिहासात मात्र हे पात्र नकारात्मक दृष्टिकोनातून, त्यांच्या विविध अवगुणांवर बोट ठेवून रंगवले गेले आहे . एक इरसाल , विक्षिप्त हेकेखोर व्यक्ती, आपल्या बायकोने शिकावं, डॉकटर व्हावं म्हणून त्यांचा खूप छळ करणारा नवरा , पुण्यातल्या आणि मुंबईतल्या भल्याभल्या लोकांना आपल्या जेरीस आणणारा पण अत्यंत बुद्धिमान असणारा गोपाळराव जोशी अगदी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे . वर उल्लेख केलेली अनेक स्वभाववैशिष्ट्ये गणपतरावांच्या जीवनातील विविध प्रसंगांतून दिसून येतात . श्री ज. जोशी यांनी आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी .. यांच्या जीवनांवर लिहिलेली ` आनंदी गोपाळ’ ही कादंबरी बरीच गाजली . मात्र गोपाळराव यांच्या...
Posts
Showing posts from March, 2023
- Get link
- X
- Other Apps
आज थोडं विषयांतर, थोडं स्मरणरंजन आणि little Narcissism..... या सहस्रकाच्या सुरुवातीला त्यावेळी नव्यानेच सुरु होणाऱ्या `टाइम्स ऑफ इंडिया'च्या पुणे आवृत्तीत रुजू झालो. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी म्हणजे डेक्कन जिमखान्यात ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीच्या (बीसीएल) च्या मागे सडाफटिंग असलेला मी राहायचो आणि त्यावेळी कॅम्पात अरोरा टॉवरमध्ये असलेल्या इंडियन एक्सप्रेसच्या कार्यालयात मी येथून जायचो. बीसीएल समोरच असलेल्या `टाइम्स ऑफ इंडिया'त लागलो तेव्हा ( लग्नानंतर ! ) थेट चिंचवडहून मी इथं यायचो. त्यावेळी टाइम्सची ही इमारत अगदी नवीकोरी होती, शिवाजीनगरच्या बैठ्या इमारतीतून कार्यालय नुकतेच स्थलांतरित झाले होते. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून पालखीची मिरवणूक आम्ही पाहायचो, संत ज्ञानेश्वरांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन इथून अगदी व्यवस्थित व्हायचे, हे आजही आठवते. तसे टाइम्सचे माझे संबध अगदी १९९१ च्या पुणे प्लस पासूनचे. पण हे सर्व डिटेल्स नंतर कधीतरी. परवा एका कामानिमित्त इथं गेलो होतो, राहवले नाही म्हणून . म. टा. च्या एका तरुण पत्रकाराला विन...