Posts

Showing posts from May, 2022
Image
  गोमंतकातील शहरांत आणि गावागावांत गणेशोत्सव उत्साहात By कामिल पारखे सकाळ    Published on : 27 August 2020, 7:31 pm A+ A- Camil Parkhe Writes Article About Ganeshotsav Goa  गणपती उत्सव हा गोव्यातील लोकांचा एक प्रमुख सण. मुंबईत आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यांत राहणाऱ्या गोयंकरांना ऑगस्ट अखेरीस आपल्या घरांकडे जाण्याचे वेध लागतात ते आपल्या घरच्या गणपती उत्सवात  सहभागी होण्यासाठी. यावर्षी कोरोनामुळे जगभर लोकांच्या प्रवासावर, हिंडण्याफिरण्यावर बंधने आली आहेत. असे असले तरी मुंबई-पुण्यातील आणि इतर शहरांतील अनेक गोमंतकिय गणपती बाप्पांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विमानाने, खास वाहने करुन, ईपास आणि आवश्यक ती सर्व वैद्यकिय कागदपत्रांची पूर्तता करुन आपापल्या घरी पोहोचली आहेत. यापैकी काही जणांना स्वतःच्या घरातच काही दिवस विलगीकरणात राहावे लागले होते. मात्र आपल्या वार्षिक धार्मिक उत्सवात हजर राहण्यासाठी हे सर्व सोपस्कार यांनी पूर्ण केले आहेत. पुण्यातला इंग्रजी दैनिकातील अलिकडेच लग्न झालेला माझा एक पत्रकार सहकारी आपल्या बायकोच्या माहेरी गोव्यात कोरतालिम येथे गणपती उत...