गेल्या पाच दशकांतील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवणी
गेल्या पाच दशकांतील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवणी पडघम - देशकारण कामिल पारखे इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, काँग्रेस आणि भाजप Sat , 06 April 2019 पडघम देशकारण लोकशाही निवडणुका इंदिरा गांधी राजीव गांधी पी. व्ही. नरसिंहराव अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे शरद पवार Sharad Pawar देशातील सार्वत्रिक निवडणुकांचा मी सर्वप्रथम अनुभव घेतला तो बांगलादेश मुक्तीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७१ साली निवडणुका लढवल्या तेव्हा. कोपरगाव लोकसभा मतदारसंघात डाव्या पक्षाच्या पी. बी. कडू यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे एकनाथ विठठलराव विखे उभे होते. अहमदनगर जिल्हा त्या काळात डाव्यांचा बालेकिल्ला होता. सुरुवातीला नवखे उमेदवार असलेल्या विखेंनी अखेरीस निवडणुकीत बाजी मारली. याचे कारण इंदिरांच्या नेतृत्वाखाली गाय-वासरू चिन्ह असलेल्या नवकाँग्रेस पक्षानं संपूर्ण देशात संघटना काँग्रेसच्या बैलजोडीला, जनसंघाच्या पणतीला, डाव्यांच्या लाल बावट्याला आणि इतर पक्षांना निवडणुकीत धूळ चारली होती. ‘गाय-वास...