Posts

Showing posts from October, 2025
Image
  गोव्यात पणजी येथे `द नवहिंद टाईम्स' या इंग्रजी दैनिकात आणि नंतर छत्रपती संभाजीनगरला `लोकमत टाईम्स'मध्ये एकूण दशकभर क्राईम आणि हायकोर्ट रिपोर्टर ही बिट मी सांभाळली. तेव्हा वापरल्या गेलेल्या अनेक संज्ञांमध्ये `डायिंग डिक्लरेशन' किंवा मृत्यूपूर्व जबाब हा एक शब्दप्रयोग होता. मुख्यतः एखादी नवविवाहित महिलेचे जळीत प्रकरण असते तेव्हा तिला जाळण्यात आल़े किंवा तिने स्वतःला जाळून घेतले हे तिच्याकडून दंडाधिकाऱ्यामार्फत वदवून घेतले जाते. `डायिंग डिक्लरेशन'ला फौजदारी प्रकरणांत आगळेवेगळे महत्त्व असते. याचे कारण साधारणतः मृत्यूपूर्वी दिलेला जबाब खरा असतो असे मानले जाते. अर्थात मरणाला सामोरे जातानासुद्धा अनेक पतिव्रता महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आपण स्वतःलाच जाळून घेतले किंवा स्टोव्हचा अचानक भडका होऊन आग लागली असे म्हणत असत. याआधी श्रीरामपूरला असताना दैनिक `सकाळ' चे संस्थापक-संपादक नानासाहेब ऊर्फ ना. भि. परुळेकर यांनी मृत्युशय्येवर असताना `निरोप घेता' हे आत्मचरित्र लिहिले होते हे मला माहित होते. त्यानंतर अशाच पद्धतीने समाजवादी नेते एस. एम जोशी यांनी इस्पितळात असताना `मी...