सांता क्लॉजची खरी ओळख समोरच्यांना कळली नाही, तो सस्पेन्स खूप वेळ टिकला तर त्यातली गंमत अधिक वाढते! पडघम - सांस्कृतिक कामिल पारखे लेखक कामिल पारखे सांता क्लॉजच्या वेषात Mon , 24 December 2018 पडघम सांस्कृतिक नाताळ मेरी ख्रिसमस Merry Christmas पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी १९८५ साली लखनौत होतो. डिसेंबरची अखेर येऊ लागली, तसे मला नाताळाचे वेध लागले. पण लखनौमध्ये गोव्यासारखे ख्रिसमसचे वातावरण नव्हते. लखनौ विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टसने आयोजित केलेल्या या अभ्यासक्रमात देशातील विविध राज्यांतील पत्रकार सामील होते. गोव्यातून मी एकटाच होतो. सहभागी पत्रकारांपैकी बहुतेकांनी ख्रिस्तमसचा कधी अनुभव घेतला नव्हता. त्यामुळे लखनौत या पत्रकार मित्रांसह नाताळ साजरा करण्याचे मी ठरवले. माझ्या पत्रकार सहकाऱ्यांना नाताळचा आनंद देण्याचे, त्यांच्यासाठी सांता क्लॉज बनून त्यांना चकित करण्याचे मी ठरवले. नाताळाचे व कुठल्याही सणाचे, उत्सवाचे त्या काळात आजच्यासारखे बाजारीकरण झाले नव्हते. सांता क्लॉज...
Posts
Showing posts from December, 2021
- Get link
- X
- Other Apps
कोकणी लेखक दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार . पंतप्रधान पंडित नेहरु यांनी १९ डिसेंबर १९६१ला भारतीय फौजा पाठवून गोवा, दमण आणि दिवची पोर्तुगीज सत्तेतून मुक्तता केली. तेव्हापासुन हा प्रदेश भारतीय संघराज्यात सामिल झाला. ऐंशीच्या दशकात कोकणी भाषेचा भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्ठात समावेश करण्यात आला. अशाप्रकारे एक स्वतंत्र भाषा म्हणून कोकणी भाषेला मान्यता मिळाली. त्यानंतर कोकणी भाषेला गोव्याची अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता मिळाली. सन १९८७ ला गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला. कोकणी भाषेत हा पुरस्कार मिळवणारे दामोदर मावजो हे दुसरे साहित्यिक. याआधी रविंद्र केळेकार यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला होता. कोकणी भाषा देवनागरी, रोमन तसेच कन्नड़ लिपित लिहिली जाते. गोव्यातील ख्रिस्ती समाज रोमन लिपिचा वापर करतो तर कर्नाटकातील किनारपट्टीवर कन्नड लिपित लिहितात. सरकारी पुरस्कारसाठी मात्र देवनागरी लिपितील कोकणी साहित्याचाच विचार होती. मराठी भाषेतल्या चार साहित्यिकांना आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. वि. स. खांडेकर, वि. वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचं...