Posts

Image
  कामिल पारखे' हे नाव कसे आहे? म्हणजे ऐकायला कसे वाटते? आपल्याकडे कुठलेही नाव ऐकल्यावर मनात तत्क्षणी काही तरंग, प्रतिक्रिया उमटतातच. कधी सकारात्मक कधी नकारात्मक .. सुरुवातीलाच सांगतो, कामिल पारखे हे नाव आजच्या गुगल जगातही अगदी आगळेवेगळे आहे, अद्वितीय की काय म्हणतात तसे आहे. काही दिवसांपूर्वी सायबर कॅफेमधल्या एका पोराने मला माझा ईमेल विचारला, मी म्हणालो माझे कामिल पारखे हे नाव आणि Gmail.com. . तर तो म्हणाला, लकी आहात नावाबाबत, आम्हा लोकांना नावासह काही आकडे टाकावे लागते तेव्हा कुठे ईमेल तयार होतो. तेव्हा पुन्हा एकदा माझ्या नावाच्या युनिकपणाची जाणिव झाली. आजही या घडीला या पृथ्वीतलावर `कामिल पारखे' या नावाची दुसरी असामी नाही, आहे की नाही गंमत? काही नावे आणि आडनावे खूपच कॉमन असतात तशांपैकी हे नाव नक्कीच नाही. नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आम्ही पारखे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातले. मात्र शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुरात माझे आईवडील चाळीसच्या दशकात स्थायिक झाले होते. या जोडप्याच्या लहान बाळाला साठीच्या दशकाच्या उंबरठ
Image
बारामतीकर. तसे पाहिले तर आम्ही मूळचे बारामतीकर. अगदी अलीकडच्या काळापर्यंत पुणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ होते. पुणे, बारामती आणि खेड. तर या बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या पिंपरी चिंचवड शहराचा अंतर्भाव होता. गोवा सोडून मी पुण्यात तात्पुरता स्थायिक झालो, डेक्कन जिमखाना येथे रानडे इन्स्टिट्युटसमोर लॉजमध्ये मंथली कॉट बेसिसवर चांगली तीनचार वर्षे राहिलो. लग्नानंतर मात्र सेटल व्हावे लागले. जॅकलिनची नोकरी चिंचवडला म्हणून तेथेच घर घेतले आणि अशाप्रकारे आम्ही निदान लोकसभा मतदार संघापुरते बारामतीकर बनलो. त्यावेळी खेड मतदारसंघात अशोक मोहोळ, विदुरा नवले, निवृत्ती शेरकर खासदार होते, नंतर किसनराव बाणखेले खासदार बनले, पुण्यातले खासदार मंडळी तर सर्वपरिचित आहेत. आमच्या बारामती मतदारसंघात मात्र खासदारांचे नेहेमीच एकच आडनाव असायचे. फक्त पहिले नाव बदलायचे. शरद पवार, अजित पवार, पुन्हा शरद पवार. त्यांच्या विरोधात नेहेमीच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असल्याने लोकसभा निवडणुकीत मतदान कुणाला करायचे याचा विचार करण्याची कधी गरजच भासली नाही. पण एकदा ती वेळ आली. त्याआधीची ही घटना सांगतो. उन्
Image
  आता मी जो अनुभव सांगणार आहे तसा अनुभव फार कमी लोकांच्या आयुष्यात आलेला असेल. अलीकडच्या अती सुरक्षेच्या काळात तर असे अनुभव फारच दुर्मिळ. आणीबाणीच्या काळातली ही घटना. इंदिराबाईंनी घोषित आणीबाणी शिथिल करुन लोकसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या. निवडणुका पार पडल्या होत्या आणि मतदान मोजणीची वेळ आली होती. त्याकाळी देशभरातील लोकसभा निवडणुका दोनतीन टप्प्यांत होऊन लगेच मतदान मोजणी होत असे. या काळात म्हणजे १९७८ ला मी सातारा जिल्ह्यात कराड येथे जेसुईट प्री-नॉव्हिस म्हणून टिळक हायस्कूलमध्ये अकरावीत शिकत होतो. त्या आधीच घटनाक्रम आता काहीच लक्षात नाही, मात्र निवडणूक पार पडल्यानंतर त्या दिवशी अगदी भल्या पहाटेच एका ट्रकने काही लोकांसह मी कराडहून सातारा येथे मतदान मोजणी केंद्रात पोहोचलो होतो हे आठवते. हा, एक स्पष्ट आठवते. ट्रकने प्रवास करणारे आम्ही सर्व जण जनता पक्षाचे आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचे विरोधक होतो. मतदान मोजणी केंद्रात जनता पक्षाचे पाठीराखे म्हणून आमची भुमिका असणार होती. आम्ही जनता पक्षाचे पोलिंग एजंट म्हणून काम करणार होतो. आम्ही लोक कराडच्या मतदार संघातील जनता पक
Image
  Sorpotel  गोव्यात पणजीला हायर सेकंडरी आणि पदवीचे शिक्षण घेताना आमच्या हॉस्टेलात ही प्रथा होती. दरदिवशी आमच्या हॉस्टेलात किचनमध्ये भरपूर ओला आणि सुका कचरा निर्माण होई तो सिंकच्या खाली असलेल्या एका मोठ्या डब्यात जमा होई. दररोज रात्री नवाच्या आसपास आमची जेवणे उरकल्यावर शेजारच्या एका घरातली लोक हा गच्च भरलेला डबा नेत आणि त्याजागी दुसऱ्या दिवसासाठी मोकळा डबा ठेवत. या डब्यात रोज गोळा होणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या, फळांच्या आणि इतर साली, उरलेला भात, पाव वगैरे अन्नधान्य तो शेजारी आपल्या पिगरीत असलेल्या डुकरांना खाऊ घालत असे. पिगरी म्हणजे डुकरे पोसतात ती जागा. त्याकाळी गोव्यात सगळीकडे डुकरे दिसायची. गोवा आणि डुकरे एक अविभाज्य संबंध होता. मारिओ मिरांडा यांचे गोव्यासंबंधीचे कुठलेही व्यंगचित्र शेपूट वळवळणारे डुक्कर दाखविल्याशिवाय पूर्ण होत नाही, त्याचे हे कारण. घरांघरांतून असे भरपूर उरलेले अन्नधान्य वगैरे खाद्यपदार्थ डुकरांसाठी रोज मिळत असे. यात अर्थात कुठल्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण नसायची. अपवाद एकच. वर्षांतून दोनदा म्हणजे डिसेंबरात ख्रिसमसला आणि मार्च-एप्रिलमध्ये ईस्टर फेस्ताला आम्ह
  `हा, तर आज तुमच्यापैकी किती  जणांनी उपवास केला आहे ?''   प्रवचन करणाऱ्या धर्मगुरुंनी अचानक हा प्रश्न  केला अन देवळात एकदम शांतता पसरली.  तशीही जगभरच्या आमच्या सर्वच देवळांत हजारोंचा समुदाय असला तरी तशी शांतता असतेच,  ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्राचे उत्तम नमुने असलेल्या आणि त्यामुळे आता केवळ पर्यटन  वास्तू ठरलेल्या युरोपातील अनेक देवळे अर्थात याला पूर्ण अपवाद.  व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिकातील सर्वाधिक अतिपवित्र मानलेल्या सिस्टाईन चॅपलमध्ये पर्यटकांचा असाच गोंगाट मी अनुभवला आहे.  मायकल अँजेलोच्या ती जगप्रसिद्ध छतावरील आणि भिंतीवरील चित्रे पाहताना न राहवून मीसुद्धा त्या कोलाहलात सामील झालो होतो.  तर धर्मगुरुंनी तो प्रश्न विचारला तेव्हा काही काळ  शांतता पसरली आणि केवळ दोनचार हात वर झाले.  ही खूपच आश्चर्याची गोष्ट होती.  कारण हा प्रश्न विचारला गेला तो कालचा दिवस होता ऍश वेन्सडे, भस्म किंवा राखेचा बुधवार.  चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची या दिवसापासून सुरुवात होते आणि गुड फ्रायडेला त्याची समाप्ती होती.  या  चाळीस दिवसांत अर्थात वेगळ्या अर्थाने पवित्र असणाऱ्या रविवारचा समावेश
Image
  Lalita Pawar: कजाग खलनायिकी भूमिकेमागे दडलेली मायाळू आई मराठी-हिंदी चित्रपटात काम करून देशातील लोकामंध्ये आपली खास प्रतिमा निर्माण करणारी एका प्रतिभावंत अभिनेत्री ललिता पवार  मनोरंजन Lalita Pawar Death Anniversary  esakal कामिल पारखे Updated on:  24 February 2023, 9:51 am Lalita Pawar Death Anniversary :  त्या दिवशी मुलाखत घेण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा खरे म्हटले तर मला धडकीच भरली होती. मुलाखत घेण्यासाठी वा पत्रकार परिषदेला जाताना असे सहसा कधी होत नाही. पत्रकार परिषद घेणारी एखादी व्यक्ती खवचट असते. एखादा अडचणीचा प्रश्न विचारला तर उत्तर देण्याऐवजी प्रश्नकर्त्याचा अपमान करण्याची तिची सवय असते. पण त्यामुळे पत्रकारांनी घाबरून जाण्याचे कारण नसते. त्या दिवशी मी ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार होतो, त्या व्यक्तीच्या माझ्या आणि एकूण समाजमानसात असलेल्या प्रतिमेमुळे ही भीती निर्माण झाली होती. कारण युनिक फीचर्ससाठी मी ज्यांची मुलाखत घेण्यासाठी चाललो होती, ती व्यक्ती होती ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार. ही घटना असेल १९९२च्या दरम्यानची. आदल्या दिवशी मी ललिता पवार यांच्याशी फोनवर बोलून मुलाखतीची वेळ ठरव